Friday, 18 October 2019

महाराष्ट्राच्या इतिहासात आणि वर्तमानकाळात माणसा इतकच काही ऐतिहासिक गादीला आणि काही राजकीय खुर्चीला खूप मानाचा मान आहे. कारण त्यावर विराजमान होणारी व्यक्ती हि असामान्य आहे. ऐतिहासीक गादी बद्दल काय बोलावं त्यासाठी अनेक इतिहासकार हे लिहून बसलेत अनेक इतिहासकार लिहीत आहेत. मतदानाचा हक्क बाजवांताना राज्यात खास करून मुंबई प्रांतात दोन राजकीय खुर्च्यांचं मला जास्त जवळीक वाटते. ते दोन खुर्ची तरुणांच्या रक्तालाच गरम ठेवत नाही तर महाराष्ट्रातल्या  प्रत्येकाना तरुण बनवते आणि लढायला  प्रेरणा देते. आज ह्या दोनी खुर्च्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत . एक मातोश्री आणि दुसरे कृष्णकुंज. आजही अनेक कार्यकर्ते ह्या दोन खुर्च्यांना देवहऱ्यातील देवा इतकच पूजतात. राजकारणात सर्व राजकीय नेत्यांना तसेच राज्यातील सामान्य माणसांना पाहिजे तेव्हा आकर्षित करून घेण्याची ताकद ह्या दोन खुर्च्यात आहेत. आज जरी हे दोन खुर्च्या विरोधात असतील तरी एक मराठी माणूस म्हणून आमच्या अपेक्षा इथेच रेंगाळतायत.

सचिन कृष्णा तळे 

Wednesday, 16 October 2019

करू मतदान राज्यासाठी

नेत्यांची ती संपत्ती मोठी
नेत्यांनी कमावली कोटी

चार चाकी अनेक बंगले
स्वप्ने मात्र नसतात छोटी

निवडणुकीचा काळ येता
पाच वर्षांनी घेतील भेटी

फिरतील मग गल्लो गल्ली
सोबत घेऊन चार टाळकी

विकासाच्या मारू थापा
देऊ थोडी वचने खोटी

निवडून येतो नेता तेव्हा
का रे होते मतांची माती

मतदारांनो घ्या काळजी
तुमची आमची समाजाची

नेते आहे सेवक आपले 
हीच आहे खरी लोकशाही

नको पैसा नको लालच
योग्य तीच निवड व्हावी

मतदानाने राज्य घडवू
करू मतदान राज्यासाठी

- सचिन कृष्णा तळे
७७०९०९९६४६
कात्रज , पुणे 



Thursday, 10 October 2019

प्रत्येक ओळीवर जीव गुदमरतो आता

प्रत्येक ओळीवर जीव गुदमरतो आता
लिखाण थांबावस वाटत
विचारांची लढाई आता नकोशी वाटते
कारण विचाराने इथे कोणीच बोलत नाही
इथे विचाराने कोणीच चालत नाही
इथे विचार फक्त नेत्यांचे असतात
इथे विचार फक्त पक्षाचे असतात
इथे सत्तेची हवा आणि फसवेगिरी
इथे घरोघरी राजकीय वैरी
आक्रोश करावा कोणी
जनतेनी कि भरसभेतून नेत्यांनी ?


सचिन तळे
७७०९०९९६४६







झाडांसोबत प्रगतीचा , इतिहास आपला हवा


झाडांसोबत प्रगतीचा , इतिहास आपला हवा

माणसांची गर्दी, उंच इमारती आणि सिमेंट जंगल म्हणजे आपली मुंबई. ह्याच चंदेरी स्वप्नांनाच्या मुंबईत आहे आरे कॉलनी म्हणजे मुंबईकरांचं ऑक्सिजन. लहान पणी आरे कॉलनी म्हणजे आम्हा मुंबईकरांसाठी छोटं काश्मीर.  चित्रपट सृष्टीतलं एक छोटीशी चित्र नगरी. जी आता भलतीच मोठी झालीय आणि त्याचा पसारा ह्याच आरे कॉलनीत दिवसानुदिवस वाढत आहे. आज हि आठवतंय वडिलांसोबत छोटं काश्मीर ला जाण्यासाठी धरलेला हट्ट. सुट्टीत आरे कॉलनीत मित्रांसोबत चे ते दिवस आणि आरे कॉलनीत आरे ह्यांची थंड लस्सी. गर्दीतून झाडांच्या कुशीत वसलेलं हे एक छोटंसं भूभाग आज खूप चर्चेत आलंय. बिबट्यामुळे अधूनमधून आरे हा भाग चर्चेत होताच पण आज राजकीय आणि सामाजिक ह्या दोन्ही बाजूनी आरे चर्चेचा भाग ठरला आहे. एकीकडे ३३ कोटी झाडे लावले असे सरकार सांगतय आणि दुसरीकडे विकासाच्या कामासाठी मुंबईतले आरे मधील झाडे तोडली जातायत. आणि हि झाडे काही वर्षांसापूर्वीची नसून खूप जुनी आणि मोठी आहेत . त्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमी काही सामाजिक संस्था तर काही राजकीय पार्टी ह्या कार्यवाही विरोधात पुढे सरसासवली . तर काही ह्यांच्या समर्थानात पुढे आली आहे. विकासाला कधीच कोणाचा विरोध नसावा पण विकास हा सुद्धा निसर्गाला धरून आणि निसर्गाच्या नियमात असावा. फक्त आरे नाही तर आपले गाव खेडे आणि गावाकडून शहराकडे नव्याने जन्म घेणारी स्मार्ट सिटी. ह्या सर्वांवर आपलं लक्ष्य हवं.

जगण्यासाठी काय हवे, काय हवे वसुंधरेला
हिरवळ क्रांती चोहीकडे, पाना फुलांची काया


हवा, पाणी, प्रकाश कोण देई मूलभूत गरजा
निर्मात्याने काय दिले, ते डोळे उघडून पहा


त्या निर्मात्याने आपल्याला काय दिले आहे ते आज डोळे उघडून पाहण्याची नितांत गरज आहे मित्रानो . त्याने जे काही निर्माण केलय ते आपल्यासाठी , त्या मुक्याप्राणांसाठी तर जीवसृष्टी जगवण्यासाठी आहे. त्या दैवी शक्तीने जागृत असलेल्या ह्या अद्भुत अश्या निसर्गावर जितका हक्क आपण गाजवतो, त्याहून जास्त हक्क हा त्या वन्य प्राणींचा देखील आहे हे विसरू नये. त्याने माणसाला घडण्यासाठी धर्म दिला, राहण्यासाठी देश समाज दिला, तर जगण्यासाठी निसर्ग दिला आहे. त्याच निसर्गाच्या गाभाऱ्यातून वर्षानुवर्षांपासून आपण फक्त घेतच आलो आहोत. त्याच्या साह्यानेच तर आपण प्रगत झालो. त्या निसर्गाने आजपर्यंत मानव जातीस भरपूर दिलं आणि देत ही आहे. त्याने कधीच माघार घेतली नाही. माणसाच्या मूलभूत गरजा हवा , पाणी , प्रकाश कोणामुळे आणि कोणत्या दैवी कार्याने आपल्याला मिळते हे सांगण्यात वेळ दडवता ते आपल्या पुढील भविष्यात जन्मणाऱ्या पिढीसाठी निरंतर कसे राहील त्यासाठी विचार कार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी समाज प्रबोधन करून लोकांपर्यंत पोहचून कार्यास गती त्या गतीतीतून एकतेतून निसर्ग संवर्धन करणे काळाची गरज आहे. त्यासाठी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत , रंक पासून ते श्रेष्ठांपर्यंत सगळ्यांनी आपले योगदान दिलेच पाहिजे. निसर्गाला पुजून निसर्गाची सेवा करणे म्हणजेच आपल्या देवाशी, देशाशी त्या निर्मात्याशी एकनिष्ठ राहणे. माणसाने चंद्रावर जरी पाय ठेवले तरी तो हवा , पाणी आणि प्रकाश शिवाय जगू शकत नाही आणि हेच कडू सत्य माणसाने स्वीकारले पाहिजे . निसर्गाशिवाय दुसरा कोणता ही पर्याय मानवासाठी नाही. निसर्गाचे नियम आपण जागोजागी तोडतोय , मिळेल तिथे आपण निसर्ग प्रेमींचे खच्चीकरण करतोय. तरीही एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज ही कित्येक तरुण आणि सामाजिक संस्था आपापल्या परीने निसर्ग जपण्यास कार्यरत अन कटिबद्ध आहेत.
मातीमधुनी जन्म त्याचा, तोच आपुली छाया          
गाव वस्ती शहर सगळे त्याचाच आहे पसारा


दुष्काळात का आठवतो ,कुठे विसावतो प्रेमात
त्याच्या नसण्याने, काय शोधतो आपण उन्हात

देशातल्या तसेच राज्यातल्या काही भागात दुष्काळ हा बारमाही आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या आणि त्यांना मिळणारा कमी भाव . पाणी नाही म्हणून उद्योग कारखाने नाही शेती नाही गावात गावकरी नाही. ओसाड पडत चाललेली गाव अन नद्या. महागाई , रोजगार बेरोजगार, विरोधी पक्षांचे  आरोप प्रत्यारोप , गोंधळ , मोर्चे अश्या अनेक प्रश्नांना सरकार ला तोंड द्यावं लागतंय .  तरीही सरकार आपल्या परीने पर्यावरण वाचवण्यास प्रयत्न करत  आहे . राज्यात ५० कोटी वृक्ष लावण्यासाठी सरकारने हरितसेना स्थापन केली. पाणी फाऊंडेशन च्या मदतीने राज्यातल्या प्रत्येक गावात स्पर्धा राबवून कलाकारांच्या साह्याने जे कार्य जे निसर्ग सेवा चालू आहे ती खऱ्या अर्थाने दखलपात्र आहे.  " तुफान आलय " च्या व्यासपीठावर अनेक शहरी नागरिकांनी गावाकडे श्रमदान केले.  शहरात काय नि गावात काय ? उन्हाचे चटके जेव्हा लागतात तेव्हा आपली पायवाट ही त्या झाडांच्या शोधातच निघते. आपल गाव म्हंटल तर शेती डोंगर नद्या पाखरांची अन माणसांची. आपली वस्ती आणि आपले शहर म्हंटल तर त्या निसर्गाची देणगी माणसांसाठी मनुष्याच्या सुखासाठी.  धावपळीच्या युगात मनशांती साठी आपण निसर्गाच्याच सानिध्यात राहायला पसंद करतो . आता फार्म हाऊस ची गरज ही भासू लागली आहे. प्रेमात असो की उन्हात झाडाच्या सावली खाली जो आनंद मिळतो तो इतर कुठे आहे का ?  ज्या प्रमाणे मनुष्यास भावना आहे , जीव आहे , वाढ आहे , संवेदना आहे त्या प्रमाणे झाडाना देखील आहे. फक्त त्यांना व्यक्त होता येत नाही . आपण व्यक्त होऊ शकतो आणि सहकार्य करू शकतो. झाडांना वाचवू शकतो.

झाडावरचे एक एक घाव अन जखमा जाऊन पहा
मुक्याने सोसले किती, खरा देव कोणता शोधा


मोठया प्रमाणात निसर्ग आणि झाडे जपणारा आपला देश हा अनेक औषधी वनस्पतींनी समृध्द आहे. शहरीकरणाच्या नादात जरी आपण खूप मोठ्या चुका केल्या तरी ही भारत आयुर्वेदासाठी आणि पर्यावरण रक्षणास पुढे होता आणि पुढे असेल हि . लाजाळू च्या झाडाला स्पर्श करता त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवते. म्हणजे झाडांना व्यक्त होता येत. मग जेव्हा आपण आपल्या सोयी साठी त्या झाडांची कत्तल करतो त्यांच्या अंगावर खिळे ठोकून आपल्या जाहिराती करतो. तेव्हा त्यांना ही त्रास होत असेल ना ? जर झाडांना संवेदना आहे तर १०१ टक्के त्यांना त्रास होतो फक्त आवाज नसतो .  प्राचीन काळापासून आपल्याकडे वृक्षपूजा होत आली आहे . आपल्या संस्कृतीत झाडांना विशेष महत्व आहे.  अभंगात जगतगुरु तुकाराम महाराज ह्यांनी ही  "‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरेझाडांचे हे महत्व पटवून सांगितले होते. वृक्ष लावणे सोपे परंतु वृक्ष जगवणे आणि त्याची जतन करणे हे अवघड आहे . केवळ दिखाव्यापुरतं वृक्षारोपण करून बातमी लावून घराच्या चार भिंतीत आरामात झोप घेणारे आपल्या कडे खूप आहेत. परंतु त्याच झाडांसाठी तळमळणाऱ्या लोकांची संख्या मात्र त्या मानाने खूप कमी आहे. पुढील येणारी भीषण परिस्तिथी जाणून आता तरी वृक्षांबाबत आपण जागृत झालो पाहिजे. निसर्गाचा फटका जेव्हा बसतो तेव्हा त्याचा होणारा आवाज हा मात्र आपल्या पुढील सात पिढीपर्यंत गुंजतो .


शेतात रानात वनात आणि डोंगर दऱ्या खोऱ्यात
निरोगी आयुष्याची ही संजीवनी आपल्या हातात

झाडे जगवा झाडे लावा, खरी श्रीमंती ही जपा
झाडांसोबत प्रगतीचा , इतिहास आपला हवा


सचिन कृष्णा तळे
७७०९०९९६४६
तिरुपती निवास , लेन नंबर
सुखसागर भाग
कात्रज पुणे ४६ 


Thursday, 26 September 2019

शांत हो घना

शांत हो घना हि वंदना
असंख्य झाल्या वेदना

पाणी आणि पाणीच पाणी
मोडला माणसांचा कणा

वाहून गेली घर दार नि
वाहून गेला स्वप्नांचा थवा

गाव ओले शहर ओले
हा ओलावा रे सोसेना

उधळला तू वाऱ्यासंग
घेऊन मृत्यूचा सापळा

अंधारातच खेळ तुझा
काय मनी तुझ्या सांगना

भीती तुझ्या विजांची
त्या घरतरल्या पाखरांना

ऐकणा घना हि वंदना
आभाळातल्या देवा


सचिन कृष्णा तळे
७७०९०९९६४६


“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale