Tuesday, 12 June 2018

आपल्याच देश बांधवासाठी

भरकटलेल्या पाखरांना आज आवरा ना कोणीतरी 
फेसबुक वरील गप्पा नाक्यावर रंगवा ना कोणीतरी 

शाळा कॉलेज चा कट्टा अन मैदानी खेळ ते सारे 
दोन शब्द प्रेमाचे समोर जरा ऐकवा ना कोणीतरी

पुरे झाले दंगे पुरे झाले मोर्चे पुरे ते धार्मिक वारे 
तुझ्या माझ्यातला माणूस दाखवा ना कोणीतरी 

कसली भाषणे तुमची कसली ती सभा लोकांची 
प्रचाराचे झेंडे कार्याने सत्याने मिरवा ना कोणीतरी 

पुण्यासाठी नाही आपल्याच देश बांधवासाठी 
गरिबांच्या  मुखात थोडं भरवा ना कोणीतरी 

देशाच्या सीमेवरती आणिक अंतर्गत वादामधी 
आतंकी समाज कंठकांची जिरावा ना कोणीतरी 

वासनांची भूक मिटवताना अन वारसा जपताना 
हर घरा घरात आई बहिणी जगवा ना कोणीतरी 

जगात सुंदर असा एकमेव देव देश धर्म आपला 
त्या देशाची प्रतिमा हृदयात ठेवा ना कोणीतरी 

सचिन कृष्णा तळे 
कात्रज , पुणे 
७७०९०९९६४६

Friday, 8 June 2018

पहिली पायरी



माउली समान नारी असते 
मर्यादा तिची पायरी असते 

विसरू नका हे मित्रानो ! 
सृष्टी तिच्याच पदरी असते 

सुंदर देखणी लावण्यवती 
रूपाने तीच साजरी असते 

ताई.. आई आणि सखी.. 
नात्याची ती घागरी असते 

प्रेम राग आणिक माया 
अशी एक नगरी असते 

कष्टाची सुख दुःखांची 
नारी एक शायरी असते 

असते ती जेव्हा सोबत 
तेव्हा कुठे भाकरी असते 

घराला घरपण देणारी 
पहिली पायरी नारी असते 


सचिन कृष्णा तळे 
कात्रज पुणे 



Thursday, 7 June 2018

ओली माती दारोदारी


पाऊस ओला, माणूस ओला, ओली सर घरोघरी  
आंगण ओले, पैंजण बोले, ओली माती दारोदारी 

क्षणात हिरवळ, क्षणात भुरळ, क्षणात ढगांची वर्दी 
गार वारा, नदीचा किनारा, वाहत राहावे गावोगावी 

झाडांची पाने, पक्षांची घरटे, झुंजणारी झोपडी ती 
शेतात पाणी, रस्त्यात पाणी, चोहीकडे पानिपाणी 

शाळेची सुट्टी, पावसाची मस्ती, गरमागरम भजी 
विजांची कडकड, धरणांची गडबड, थोडीथोडी

मातीचा गंध, प्रीतीचा बंध , स्पर्शाची जादू सारी 
सहवासाची, प्रेमाची, पावसातच मिळे गोडगोडी 

कुठे गप्पागोष्टी, कुठे गाणी, कुठे कवितांच्या ओळी 
कुठे श्रावण, कुठे पावन, निसर्गाच्या अवतीभवती 

कुठे रडू, कुठे हसू, कुठे सुखदुःखाची बातमी 
शेतकऱ्यांची, कामगारांची, परीक्षाच ही वेळोवेळी 


सचिन कृष्णा तळे 
पुणे , कात्रज 




“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale