Friday, 12 April 2024

नमस्कार पुणेकर हो ...

 


नमस्कार पुणेकर हो ...

 

कदाचित तुम्ही मला ओळखलं नसावं. मी तुमच्या आसपास च राहतो. अगदी शेजारीच. तसा मी अनोळखीच तुमच्यासाठी. पण तुमच्या सारखाच एक सर्वसाधारण मतदार आहे मी. ह्या पुण्याचा नागरिक आहे मी. खूप दिवसांपासून तुमच्याशी सवांद साधायचा होता. अखेर आज ती संधी मिळाली. देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. लोकशाहीचा हा उस्तव आपल्या हक्काचा उस्तव. अश्या आनंदाच्या प्रसंगी आपल्याला शुभेच्छा रुपी पत्र लिहिण्याचा छोटासा प्रयत्न.

 

तसं पाहिलं तर पुण्याचा अभिमान फक्त पुणेकरांना नाही तर पुण्यात स्थायिक झालेल्या सगळ्यांना आहे. पुणे आता सदाशिव पेठे पुरत राहिला नाही. पुण्यात काय नाही असा प्रश्नच येत नाही. निसर्ग आहे, स्वराज्याचे किल्ले आहेत, संस्कृती अन सभ्यता आहे, देवाची आळंदी आहे, डोंगर अन धरणे आहेत, शिक्षण अन उद्योग अन नोकरी आहे अन राजकारण देखील आहे. पुण्यात एकदा वास्तव करणारा कायमचा पुण्याचा होतो कारण पुण्यात शांतता आहे. अशी ओळख देशभर असणाऱ्या या पुण्याचं नेतृत्व करणारी मंडळी देखील त्याच ताकदीचे हवेत असं मला वाटत.

 

गेल्या काही वर्षात पुण्यात अमूलाग्र बदल झाला आहे. पुणेकरांच्या सेवेत मेट्रो आली, चांदणी चौक चा नकाशा पूर्ण पणे बदलला गेला. पुणे अंतर्गत रस्ते कोंडी दूर करण्यासाठी जोरदार पर्यंत चालू आहेत. पुणे महानगरपालिकेत अनेक गावांचा समावेश देखील झाला. पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी प्रशाशन अन स्थानिक अधिकारी प्रयत्नशील दिसत आहेत. सगळीकडे आनंदीआनंद आहे ? खरचं सगळीकडे आनंदी आनंद आहे का हो ? पुण्याचं रुपडं बदलून गेलं यात शंका नाही. पुणे शहर हात पाय पसरत चालाय. शेतजमीनीवर मोठमोठाली इमारती उभी राहत आहेत. गर्दीत मुंबई जशी गुदमरली तसं पुण्याची हालत होऊ नये बस इतकचं. मुंबईची मिठी नदी सारखी पुण्याची मुळा मुठा तीच अस्तित्व पार विसरून डबक्यात रूपांतरित झाली हो. पुण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला तर काय होऊ शकत याचा अनुभव देखील पुणेकरांनी घेतला आहे. पाणी जाण्यासाठी हवं तसं मार्ग मिळत नाहीय हेच खरं आहे. शनिवार वाडा इतिहासाची साक्ष न राहता पर्यटन स्थळ झालय आणि पाण्यातला आपला सारसबाग गणपती प्रेम युगलांना गप्पा मारण्याचे ठिकाण.

 

छोटे रस्ते अन वाहनांची वाढलेली संख्या. त्यातून वायू अन ध्वनी प्रदूषण. हि सुद्धा पुण्याची नवीन ओळख होत चाली आहे. पर्वती च्या पायथ्याशी अनधिकृत झोपडपट्ट्या सहज पोहचल्या. या झोपड्याना पाणी, वीज अन सर्व सुविधा देखील मिळत आहे. का, कारण या प्रत्येक घरातून मतदान मिळणार आहे. पर्वतीचा डोंगर या झोपडपट्ट्यानी वेढला गेला त्याला कोण जवाबदार ?

 

धारणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यात धरणातील पाणी कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा होऊ लागला आहे. अनेक टँकर लॉबी ही बोरवेलचे पाणी उपसून तळ्यात जमा करून ते पाणी टँकरच्या मध्यमान्यतून सोसायट्यांना विकले जात आहे. काही नागरिकांनी नो वॉटर, नो वोट असे पोस्टर्स लावून मतदानावर बहिष्कार टाकला आहे. असो ...

 

ह्या सारखे अनेक प्रश्न सध्या पुणेकरांना पडला असेलच. यासाठी पुण्याचे नेतृत्व करणारी मंडळी हि पुण्यावर प्रेम करणारी असायला हवं. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला अश्याच खासदाराची निवड करायची आहे जो ह्या प्रश्नांना उत्तर शोधून पुण्याच्या विकासात भर घालेल. त्यामुळे मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा. खडकवासला, चास-कमान, भामा-आसखेड, पवना, निरा डावा आणि उजवा कालवा, कुकडी, घोड प्रकल्प येथील पाणी वाटपाचे नियोजन करणार नेतृत्व आपल्याला हवं. तुमचं एक मत पुण्याचा नकाशा बदलू शकतो. पुन्हा एकदा तुम्हाला या लोकशाहीच्या उस्तवाला शुभेच्छा.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

Wednesday, 3 April 2024

मोदी सरकारची दहा वर्षातील दहा महत्वपूर्ण कार्य

 

मोदी सरकारची दहा वर्षातील दहा महत्वपूर्ण कार्य

 


"भारतीय राजकारणात अमुलाग्र बदल घडवून आणू" असं जनतेला आश्वासनं देत बहुमतानं भाजप सरकार सन २०१४ साली सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर पंत्रप्रधान मोदी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले त्यात काही यशस्वी झाले तर काही फसले. काही निर्णयांचे कौतुक झाले तर काहींवर टीका. या दहा वर्षात विरोधकांच्या मनात धडकी भरवत त्यांना रस्त्यावर मोर्चे काढण्यास भाग पाडले तर देशासह देशाबाहेरील अनेक देशात भारताची एक नवी ओळख देखील मोदींनी निर्माण केली यात शंका नाही. २०१४ च्या निवडणुकीत अच्छे दिन आनेवाले है, हम मोदीजी को लानेवाले है, अबकी बार मोदी सरकार सारख्या लोकप्रिय घोषणा त्या काळात अत्यंत लोकप्रिय ठरल्या. मोदींच्या लाटेत अनेक खासदारही निवडून आलेले पाहायला मिळाले. त्यानंतर असाच विश्वास जनतेनं पुन्हा मोदींवर दाखवला आणि सन २०१९ मध्ये पुन्हा मोदी सरकार स्थापन झालं. मोदींनी जे उपक्रम राबवले त्यावर उलट-सुलट टिपण्ण्याही झाल्या पण भारतीय राजकारणात हे उपक्रम युनिक म्हणून गणले गेले. ज्या राम मंदिराची वाट पाहत होतो त्या मंदिराची पायरी चढत आज लाखो भक्तांनी रामाचे दर्शन घेतले. ग्रीन एनर्जी कॉरिडोर, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर , पंढरपूरचा विकास करण्यासाठी कॉरिडॉर , उज्जेन , काशी तसेच जगन्नाथ पुरी कॉरिडॉर ,  सुरत - चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर अश्या अनेक प्रकल्पानी मोदी सरकार वारंवार चर्चेत राहील. वंदे भारत ते बुलेट ट्रेन च जाळं. राष्ट्रीय महामार्ग ते राज्य महामार्ग यावर रस्त्यांची कामे उल्लेखनीय झालीत. पाहुया मोदी सरकारचे दहा महत्वपूर्ण निर्णय.

 

३७० कलम रद्द - मोदी सरकारच्या काळात ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीर मधून विशेष कलम ३७० हटवण्यात आले. मोदी सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय होय. जम्मू काश्मीर ला वेगळा दर्जा देणारं कलम हटवून केंद्रशासित प्रदेशचा दर्जा देत लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केला.

 

डिजिटल इंडिया - भारतात इंटरनेटचा वापर वाढून सर्व सुविधा डिजिटल करता याव्यात यासाठी मोदी सरकारनं महत्वाचं पाऊल उचललं. तसेच या योजनेंतर्गत मोदी सरकारनं जनतेच्या उपयोगासाठी अनेक मोबाईल अप्लिकेशन आणि वेबसाईटची निर्मिती करत डिजिटलला प्राधान्य दिलं. यासाठी युनायटेड पेमेंट इंटरफेस (युपीआय) आणि रुपे कार्डला प्रत्यक्ष डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहार क्षेत्रात आणलं. सरकारनं यासाठी 'भीम अॅप' आणि 'भारत पे' नावाचे प्लॅटफॉर्मही आणले.

 

तिहेरी तलाक विधेयक - बहुसंख्य मुस्लिम महिलांनी मोदी सरकारने आणलेल्या या कायद्याचं स्वागत केलं. देशातील मुस्लिम महिलांसाठी जाचक प्रथा असलेला 'तिहेरी तलाक' हा मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्याचा भाग होता. तो मोडीत काढून याला मोदी सरकारनं थेट भारतीय दंड विधानाच्या चौकटीत आणण्याचं महत्वाचं काम केलं.

 

जीएसटीची अंमलबजावणी - जीएसटीवरुन काही प्रमाणात वाद निर्माण होतचं आहेत. पण विविध करांची रचना मोडीत काढून एकच कर रचना देशात लागू करुन मोदी सरकारनं एक महत्वाचं पाऊल उचललं होतं. हा कायदा मोदी सरकारसाठी खूप आवाहनात्मक होता. या करप्रणालीत मुख्य उद्देश इतर अप्रत्यक्ष कराचा व्यापक प्रभाव रोखणे आणि संपूर्ण भारतात एकच कर प्रणाली लागू करणे हा होता.

 

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) - हा कायदा सरकारने २०१९ मध्ये संसदेत मंजूर केला. राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर १० जानेवारी २०२०  पासून देशात सीएए कायदा लागू झाला. या कायद्यानुसार केवळ ६ निर्वासित समुदायांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.

 

जनधन योजना आणि उज्वला योजना- देशातील जनतेनं अर्थव्यवस्थेत थेट सहभाग घ्यावा यासाठी मोदी सरकारनं 'झिरो बॅलन्स बँक अकाउंट' उघडण्याची योजना आखली. या योजनेंतर्गत देशात १३२ मिलियन नवी बँक खाती खोलण्यात आली. त्याचबरोबर 'प्रधानमंत्री उज्वला योजना' मध्ये ५ कोटींहून अधिक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन केवळ १,६०० रुपयांमध्ये देण्यात आले. हे कनेक्शन घरातील स्त्रीच्या नावाने देण्यात आले.

 

'मेक इन इंडिया', 'एफडीआय', 'स्टर्टअप इंडिया' आणि 'मुद्रा योजना' -  या प्रकल्पांतर्गत सरकारनं देशातील तरुण नवउद्योजकांच्या नव्या कल्पनांना वाव देऊन सरकारला मदत करण्याचं आवाहन केलं. यासाठी सरकारनं 'स्टार्टअप इंडिया' हा प्रमुख कार्यक्रम सुरु केला.  'प्रधानमंत्री मुद्रा योजना'  या योजनेंतर्गत लघु उद्योगांच्या स्थापनेसाठी १०० टक्के कर्ज मिळू लागलं तसेच त्यांना नियमांमध्ये सवलतीही देण्यात आल्या. सरकारनं 'मेक इन इंडिया' प्रकल्प सुरु करुन जागतिक गुंतवणुकीला भारताकडे आकर्षित करुन घेण्यासाठी प्रयत्न केले. या योजनेंतर्गत सरकारनं २५ विविध क्षेत्रांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीबाबत उदारिकरणाचं धोरणं अवलंबलं. याचा परिणाम म्हणजे वर्ल्ड बँकेच्या 'ईज ऑफ डुईंग बिझनेस'च्या रँकिंगमध्ये भारताचं स्थान उंचावलं. याचा परिणाम म्हणजे वर्ल्ड बँकेच्या 'ईज ऑफ डुईंग बिझनेस'च्या रँकिंगमध्ये भारताचं स्थान उंचावलं. यामुळे भारतानं 'भारतमाला', 'सागरमाला', 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स', 'इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स', 'उडाण', 'भारत ब्रॉडबँड नेटवर्क' आणि 'डिजिटल इंडिया' या प्रकल्पांना मदत झाली.

 

स्वच्छ भारत अभियान - २ ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंतीनिमित्त 'स्वच्छ भारत' अभियानं सुरु झाले. नागरिकानं रस्त्यांची आणि परिसराची स्वच्छता राखण्यासाठी जबाबदार असायला हवं असा संदेश या अभियानातून देण्यात आला. ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणं बंद व्हाव, जेणेकरुन साथीचे आजार टाळता येतात यासाठी प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधण्यासाठी सरकारनं अनुदान सुरु केलं.

 

सर्जिकल एअर स्ट्राईक - उरीच्या हल्ल्यानंतर देशात अत्यंत रागाचं वातावरण होतं. आता या दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं जावं अशी देशातल्या जनतेची इच्छा होती. झालंही तसंच उरी हल्ल्याला भारतीय लष्करानं काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड उद्धवस्त करुन उत्तर दिलं. त्याशिवाय पुलवामा हल्ल्यालाही भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर देत पाकिस्तानवर हवाई हल्ले केले होते.

 

आरोग्य सेवा आणि लसीकरण - कोरोना काळात संपूर्ण जगाला फटका बसला. भारताने कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करून ती देशातील नागरिकांना दिलीच तसेच देशाबाहेरील १०० हुन अधिक देशाना लस उपलब्ध करून देत भारताची एक वेगळी प्रतिमा मोदी सरकारने निर्माण केली. सरकारनं आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गाला अत्याधुनिक आरोग्यसुविधा परवडणाऱ्या दरात मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी सरकारनं 'राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना' लॉन्च केली. याच योजनेला 'आयुष्यमान भारत योजना' म्हणूनही संबोधलं जातं. याअतंर्गत ५० कोटी कमी उत्पन्न गटातील नागरिकांना ५ लाखांपर्यंतचा मेडिकल इन्शुरन्स देण्यात आला. हा जगातील सर्वात मोठा वैद्यकीय कार्यक्रम ठरला. या उपक्रमांतर्गत सरकारनं हजारो औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच जेनरिक औषधांची दुकानं सुरु करण्याला प्रोत्साहन दिलं.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

 

 

 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale