मला राजवैभवाची इच्छा नाही, न स्वर्गाची, न पुनर्जन्माची. मला फक्त इच्छा आहे ती काहीतरी नवीन करण्याची ...कारण मी काहीतरी घडऊ शकतो हे मला माहित आहे.... जय हिंद जय महाराष्ट्र !!
Monday, 28 December 2015
Saturday, 19 December 2015
मन हे गवताळी
मन हे गवताळी
मन हे गवताळी , गवताळी माझे गान रं
गवताची पात रं , डोले डोलदार रं
वाऱ्यावर हूर हूर , हिरवे हिरवे राण रं
मखमाली गादीची , ही हिरवी पिवळी शाल रं
थुई मुई थुई मुई , नाचे रंगी पाखर
गवतात रांगते , कोवळ्या उन्हाचे बाळ रं
ईवली इवलीशी , नाजूक गवताची रास रं
गणला ही आवडे , दुर्वा त्याच नाव रं
खुदू खुदू बोलती , मन हे माझे गवती
शिंपडलेल्या दवांनी , ओली चिंब ही गवत रं
धूप असो वा पावसाळी , गवत माझी गोमटी रं
गवताची पात रं , डोले डोलदार रं
सचिन कृष्णा तळे ( पुणे - भारत )
मन हे गवताळी , गवताळी माझे गान रं
गवताची पात रं , डोले डोलदार रं
वाऱ्यावर हूर हूर , हिरवे हिरवे राण रं
मखमाली गादीची , ही हिरवी पिवळी शाल रं
थुई मुई थुई मुई , नाचे रंगी पाखर
गवतात रांगते , कोवळ्या उन्हाचे बाळ रं
ईवली इवलीशी , नाजूक गवताची रास रं
गणला ही आवडे , दुर्वा त्याच नाव रं
खुदू खुदू बोलती , मन हे माझे गवती
शिंपडलेल्या दवांनी , ओली चिंब ही गवत रं
धूप असो वा पावसाळी , गवत माझी गोमटी रं
गवताची पात रं , डोले डोलदार रं
सचिन कृष्णा तळे ( पुणे - भारत )
Saturday, 12 December 2015
कविता : आक्रोश
मी
जिथल्या मातीला संत मानिले
होते
तिथल्या
माणसाना जावून हाणिले होते
त्यांनी
केलती भाषा वेगळ्या
राज्याची
ज्या
राज्यासाठी लोक तळमळले
होते
हाती
झेंडे अन शाहिरांची
होती बोली
अखंड
महाराष्ट्रासाठी हुतात्मे गेले होते
त्यांच्या
स्मारकांना हजेरी कावळ्यांची
लाचारीने
आज सारे वाकलेले
होते
कसली
मागणी ही मातीच्या
तुकड्याची
तोडा
फोडा राज्य करा
हेच पेरले होते
घरात
लावून आग खुशाल
आहे कर्ते
वीर
मशाली ही का
विझलेले होते
स्वातंत्र्याचा
सूर्य काळोख्यात आज
आहे
भ्रष्ट
नेत्यांमुळे सारेच विटाळले होते
शोधताहेत
देशवासी कोणास म्हणू राजे
ज्यांच्या
सिंहासन खाली सत्ता
चिरडले होते
दखल
माझ्या आक्रोशाची कोण घेईल
?
पाहता
घरोदारी फक्त मुर्देच
भासले होते
सचिन
कृष्णा तळे (पुणे)
Saturday, 5 December 2015
मागासलेला देव आमचा !
मागासलेला देव आमचा !
जातीचे कुंपण तोडून शिक्षणाचा आधार घेऊन
भीमाचे वादळ उठले शांतीचा संदेश घेऊन
जातीचे कुंपण तोडून शिक्षणाचा आधार घेऊन
भीमाचे वादळ उठले शांतीचा संदेश घेऊन
एक चळवळ अशी पेटली एक नव्या दिशेन
बंदिस्त समाजाची गगनाला किंकाळी देऊन
कामावरुनी जात अन जातीवरून समाज
पिढान पिढी विटाळली महार मांग होऊन
विभागला धर्म ! हरवला माणूस द्वेषाने
वेशभूषा अन भाषा सर्वच काही सोसून
कुळ असो कोणताही दोष मात्र सांगावं
मागासलेला देव आमचा! कुलपात ठेऊन
स्वीकारला बुद्ध माणसाने माणसासाठी खुद्द
दिला अधिकार घटना भारताची लिहून
फडफडला तिरंगा अशोक चक्र आणि रंग
त्या आंबेडकरी चळवळीचा सूर्योदय करून
- सचिन कृष्णा तळे
बंदिस्त समाजाची गगनाला किंकाळी देऊन
कामावरुनी जात अन जातीवरून समाज
पिढान पिढी विटाळली महार मांग होऊन
विभागला धर्म ! हरवला माणूस द्वेषाने
वेशभूषा अन भाषा सर्वच काही सोसून
कुळ असो कोणताही दोष मात्र सांगावं
मागासलेला देव आमचा! कुलपात ठेऊन
स्वीकारला बुद्ध माणसाने माणसासाठी खुद्द
दिला अधिकार घटना भारताची लिहून
फडफडला तिरंगा अशोक चक्र आणि रंग
त्या आंबेडकरी चळवळीचा सूर्योदय करून
- सचिन कृष्णा तळे
भीमा तुझ्या शेतांमध्ये...
भीमा तुझ्या शेतांमध्ये...
भीमा तुझ्या शेतांमध्ये ज्ञानांची फुले
फिरे अभिमानाने बुद्ध शांतीचे पाखरे
काय पेरलेस होते! काय उगवले पहा
जातीपातीच्या चिखलातूनी ही पाकळे
पसरू दे सुगंध भारतात या विश्वात
एक होऊ एक चालू देवून नारा पुढे
गीत माणुसकीचे हे गीत संविधानाचे
सर्वधर्म आणिक कर्माचे चल घेवू धडे
संघटीत होऊन शिक्षणाने नेतृत्व करू
भीमाच्या विचाराने राष्ट्र हे घडवू नवे
सचिन कृष्णा तळे
भीमा तुझ्या शेतांमध्ये ज्ञानांची फुले
फिरे अभिमानाने बुद्ध शांतीचे पाखरे
काय पेरलेस होते! काय उगवले पहा
जातीपातीच्या चिखलातूनी ही पाकळे
पसरू दे सुगंध भारतात या विश्वात
एक होऊ एक चालू देवून नारा पुढे
गीत माणुसकीचे हे गीत संविधानाचे
सर्वधर्म आणिक कर्माचे चल घेवू धडे
संघटीत होऊन शिक्षणाने नेतृत्व करू
भीमाच्या विचाराने राष्ट्र हे घडवू नवे
सचिन कृष्णा तळे
Subscribe to:
Posts (Atom)
“कलियुग सुरू आहे!”
“कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale
-
फाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहासफाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहास पाकिस्तानातील मुल्तानमध्ये आजही उभा असल...
-
महाराष्ट्र साहित्य सभा , इंदूर पुण्य श्लोक पहिले बाजीराव यांनी उत्तरदिग्विजय केल्यानंतर मल्हारराव होळकर माळव्याचे सु...
-
🔴 माझं मत 🔴 “भारताला डळमळीत पाहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ठाम विरोध!” शेजारी राष्ट्रांमध्ये गेल्या काही वर्षांत आपण सतत अस्थिरता, सत्तापा...


