Saturday, 12 December 2015

कविता : आक्रोश





मी जिथल्या मातीला संत मानिले होते
तिथल्या माणसाना जावून हाणिले होते

त्यांनी केलती भाषा वेगळ्या राज्याची
ज्या राज्यासाठी लोक तळमळले होते

हाती झेंडे अन शाहिरांची होती बोली
अखंड महाराष्ट्रासाठी हुतात्मे गेले होते

त्यांच्या स्मारकांना हजेरी कावळ्यांची
लाचारीने आज सारे वाकलेले होते

कसली मागणी ही मातीच्या तुकड्याची
तोडा फोडा राज्य करा हेच पेरले होते

घरात लावून आग खुशाल आहे कर्ते
वीर मशाली ही का विझलेले होते

स्वातंत्र्याचा सूर्य काळोख्यात आज आहे
भ्रष्ट नेत्यांमुळे सारेच विटाळले होते

शोधताहेत देशवासी कोणास म्हणू राजे
ज्यांच्या सिंहासन खाली सत्ता चिरडले होते

दखल माझ्या आक्रोशाची कोण घेईल ?
पाहता घरोदारी फक्त मुर्देच भासले होते

सचिन कृष्णा तळे (पुणे)


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale