Thursday, 20 July 2017

शिव वैष्णवांचा नरहरी...



महाराष्ट्र हा संतांचा आहे अन संतांच्या विचारावरच हा महाराष्ट्र घडलायह्या संतांचा मूळ हा त्या चंद्रभागेतिरीं वसलेल्या पंढरीच्या पांडुरंगा चरणी आहे .  पण काही संतात तसेच त्यांच्या भक्ती संप्रदायात देव वाद हा आढळून येतो किंवा कट्टर उपासक आढळून येतात  . शिव वैष्णव  ह्या निराकार रूपाचा सगळ्यानांच भुरळ आहे . एकीकडे ह्या जगाचा कर्ता पालक वैष्णव  तर दुसरीकडे ह्या जगाचा शेवट शैव . मूळ नाथ संप्रदायत असणारे ज्ञानदेव  वडिलांकडून वैष्णव उपासक म्हणजेच वारकरी झाले . आणि ह्या जगाला शिव वैष्णव एक आहे हे सांगण्याचा प्रयन्त त्यांनी केला . पण शिव विष्णू चे एक रूप ज्या संताला दिसले ज्याच्या भक्ती ने पांडुरंगास हि शिवरूप धारण करून जगासमोर यावेसे वाटले ते संत श्रेष्ठ  श्री नरहरी सोनार महाराज त्यांचे अभंग हि तितकेच  मौल्यवान आहे जितके  आपले ज्ञानदेव , तुकोबा , जनाबाई , सावता माळी , चोखामेळा  . संतांचे आहे . शिव शिवाय ध्यानी मणी कोणत्याही देवाची पूजा अर्चना करणारे नरहरी महाराज हे उत्तम सोनार होते . त्यांच्या ख्याती हि दूर दूर पर्यंत पसरली होती आणि ह्याच त्यांच्या कार्यातून ते शिव अभंग लिहू लागले . शिवाची कडक उपासना करणारे नरहरी महाराज त्या पंढरपुरातच राहत होते .

भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर । तेथें मी पामर काय वर्णू ॥ १ ॥
भूषण जयाचें भुवना वेगळें । रुंडमाळा खेळे गळ्यामध्यें ॥ २ ॥
कर्पुरगौर भोळा सांब सदाशिव । भूषण धवल विभूतीचें ॥ ३ ॥
माथां जटाभार हातीं तो त्रिशूळ । श्वेत शंख बळें फुंकीतसे ॥ ४ ॥
भांग जो सेवूनी सदा नग्न बैसे । जटेंतूनि वाहे गंगाजळ ॥ ५ ॥
गोदडी घालूनी स्मशानीं जो राहे । पंच वस्त्र होय श्रेष्ठ भाग ॥ ६ ॥
नाम घेतां ज्याचे पाप ताप जाती । पापी उद्धरती क्षणमात्रें ॥ ७ ॥
नरहरी सोनार भक्ति प्रियकर । पार्वती शंकर ह्रदयीं ध्यातो ॥ ८ ॥

इतकं सुंदर शिव वर्णन करणाऱ्या  शिवभक्त नरहरी महाराजांची कथा हि भक्तिमय आहे. भक्त आणि भगवंत ह्या दोन जीवांमध्ये भक्त जितका भगवंता साठी आतुर असतो तितकाच भगवंत हि भक्ताच्या भक्तीचा तहानलेला आसतो  . नरहरी महाराजांची शिव भक्ती पाहून त्या विश्व लाडक्या पांडुरंगाला हि राहवलं नाही . त्यासाठी त्या परमेश्वराने त्यांची सत्व परीक्षा घेण्यास ठरवले . परीक्षे शिवाय प्रसाद तरी  कसा मिळणार .
विठ्ठलाची ध्वजा केशरी । चंद्र भागाच्या तीरी ।
सोनसाखळी कमरेवरी । हरी सत्वात नरहरी ।।

एका भाविकाला त्याच्या इच्छा पूर्ती ने पांडुरंगास कमरेवरील सोन्याची साखळी करायची होती . अन त्या वेळी नरहरी सोनार हेच उत्तम साखळी तयार करू शकतील ह्या भावनेने ते नरहरी महाराजांना समोर आले . त्यांना त्यांची इच्छा सांगितली परंतु इतर कोणत्याही देवास मानणारे पाहणारे नरहरी ह्यांनी विठ्ठलाच्या कमरेचं माप घेण्यास नकार दिला . तेव्हा त्या भाविकाने महाराजास विठ्ठलाचे माप आणून दिले त्याप्रमणे त्यांनी एक सुंदर सुवर्ण साखळी तयार केली . साखळी पाहून तो भाविक खुश झाला आणि विठ्ठलाला अर्पण केली . पण ती साखळी काही करून कमरेवर बसेना , पुन्हा माप घेतेले , पुन्हा साखळी घडवली असे वारंवार केल्यानंतर नरहरी महाराज गडबडले , त्यांना काहीच कळेना झाले . त्यामुळे स्वतः डोळ्यावर काळी पट्टी बांधून कमरेचं माप घेण्यास त्या पांडुरंग समोर आले . पण जो अंती अन अंतर मनात आहे तोच सामोरे पाहे , ह्या भक्ती भाव तत्वावर नरहरी महाराजास पांडुरंगाला होणाऱ्या प्रत्येक स्पर्शात शिव दिसू लागले अन साक्षात विठ्ठलाची मूर्ती असून हि शिवरुप पाहून नरहरी महाराज त्या परमात्म्या समोर नतमस्तक झाले आणि वैष्णव  भक्तीत न्हाहून निघाले . त्यांनी त्यांच्या अभंगातून पांडुरंग समाज दोघांचेही भाविक वर्णन केले आहे .
देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ।
देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोनें ॥

नरहरी महाराज म्हणतात ..माझा आत्मा देह हेच सोन आहे जे मला परमेश्वराने दिलंय आणि हे सोन म्हणजे विठ्ठला तुझं गोड नाव अन तुझे हे गोड नाव सदा माझ्या देहात आत्म्यात असेल त्यामुळे मी व्यापारी जरी असलो तरी देवा मी  तुझ्याच नावाचा व्यवहार करेल. जग हे सारे भ्रम्ह रूप आहे आणि ह्या सर्वांच्या मध्ये मूळ माझा पांडुरंग आहे .  जो अणू रेणू त सामावलंय ज्याच्या रूपात विश्व् भरून आहे अश्या पांडुरंगाचा खेळ हा सुद्धा तितकाच प्रभावी आहे त्यामुळे हा सावळा विठ्ठल माझ्या गुरुस्थानी अन हृदयात विरजतो .

जग हें अवघें सारें ब्रह्मरूप सर्वांभूतीं एक पांडुरंग
अणुरेणू पर्यंत ब्रह्म भरीयेलें सर्वांघटीं राहिलें अखंडित
विश्व हें व्यापिलें भरूनी उरलें कवतुक दाविलें मायाजाळ
भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ परब्रह्मीं खेळे अखंडित
अखंडित वस्तु ह्रदयीं बिंबली गुरुकृपें पाहीं नरहरी

गुरुकृपेने अन भगवंताच्या आशीर्वादाने जीवन हे सार्थ व्हावे हे सदगुण आहे पण ह्या काळात माणूस जन्माला येउन त्याच मूळ कार्य विसरतोय . नरहरी महाराज सांगतात कि " देह जन्मला व्यर्थ , झाले पापांचे पर्वत " हे पर्वत इतक झालं कि आपण खाली पाहिलं तर खोल दारी दिसेल . तिथे दिसेल ते फक्त वेदना आणि पापांची भरून वाहणारा नाला . कारण आपण जन्माला येऊन काही तीर्थ किंवा पुण्य कार्य केले का ? "कांहीं नाहीं तीर्थ केलें जन्मूनियां व्यर्थ झालें " दान धर्म तर दूरचं राहील अश्या मुळे हा नाशवंत देह शेवट पुण्य विना मसणवाटेत गेला तर त्याला काय अर्थ राहील , तुमच्या जीवनाला काय अर्थ राहील .

दान धर्म नाहीं केला । देह मसणवटीं गेला |
नरहरी सेवक सद्‍गुरूचा । दास हो साधुसंतांचा ॥

त्यासाठी नरहरी महाराज सदा सांगतात देवाचे नामस्मरण हेच ह्या कलयुगातील तारक मंत्र आहे . त्याच्या सेवेत आपला जीवन घालावा , आणि हाच देव तुम्हाला माणसात मिळेल तुम्हाला चराचरात मिळेल . वारकरी हा संसार रुपी गाढा चालवत असताना श्री क्षेत्र पंढरपूर ची  , त्या विठ्ठलाची वारी नित्य नियमाने करतो तेही न थकता . त्या पंढरीचा दैवत हा विठ्ठल साक्षात भगवान विष्णू आहे आणि ह्याच सोहळातला  आषाढी कार्तिकी सोहळा हा सुवर्ण क्षण असतो , इथे भजनांचा आणि विठ्ठल विठ्ठल चा जयघोष घुमतो , साधुसंतांचा सहवास आणि भक्ती भावाने डोलणारी केशरी पताका ने त्या  चंद्रभागेला जणू भक्तीचा पूरच येतो . हा आसा आनंद सोहळा माझ्या हृदयी आहे .

पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी व्रतनेमें ॥
आषाढी कार्तिकी महापर्वें थोर । भजनाचा गजर करिती तेथें ॥
साधुसंत थोर पताकांचा भार । मुखीं तो उच्चार नामामृत ॥
आनंदाचा काला गोपाळकाला केला । ह्रदयीं बिंबला नरहरी ॥

काहीं करीना उपाय दिवसें दिवस व्यर्थ जाय
संसारीं नाहीं समाधान चुकती जन्ममरण
शेण लोणी सोनें कांसें एक मोले विके कैसें
दुर्जनसंग त्यागावा संतसंग तो धरावा
नरहरी जोडोनियां कर उभा सेवे निरंतर  

महाराज म्हणतात  ,संतसंग जो असतो त्याला कशाचीच कमी नसते , त्याला संसारात समाधान मिळते . तो दुर्जन पासून लांब राहतो आणि सांसारिक जीवन जगतो . त्यासाठी संतांचे छत्र हा एकवमेव पर्याय उपाय आहे गृहस्थी साठी .

कृपा करी पंढरीनाथा । दीनानाथ तूं समर्था ॥ १ ॥
अपराध करीं क्षमा । तुझा न कळे महिमा ॥ २ ॥
करीं भक्ताचा सांभाळु । अनाथाचा तूं कृपाळु ॥ ३ ॥
आम्ही बहुत अन्यायी । क्षमा करी विठाबाई ॥ ४ ॥
आलों पतीत शरण । पावन करीं नारायण ॥ ५ ॥
पापी अमंगळ थोर । कृपा करीं दासावर ॥ ६ ॥
मी तरी अवगुण बहुत । दयाकरीं पंढरीनाथ ॥ ७ ॥
दयासागरा अनंता । कृपा करीं पंढरिनाथा ॥ ८ ॥
तुझें नामामृत सार । नरहरि जपे निरंतर ॥ ९ ॥

असे नरहरी महाराज ज्यांचा जन्म हा मूळ चा देवगिरी इथला , त्यांचे वडील म्हणजेच दीनानाथ हे व्यवसायाने सोनाराच . वडिलांकडून त्यांनी सुवर्ण दागिने घडवण्याचे शिक्षण घेतले . घरची परस्थिती तशी चांगली होती . त्यांच्या पत्नीचे नाव गंगा तर मुलांची नवे हि नारायण व मालू  होती . प्रपंच संभाळत भक्ती रूपाने नावाजलेले संत श्री नरहरी महाराज म्हणजे भक्तीचा  सागर आहे आणि यांच्या किनाऱ्यावर विचारांची,  शिव वैष्णवांची माणिक मोती मिळतील . कोणी हि भक्ती ने त्यांच्या छायेखाली येऊन हि अफाट भक्तीची संपत्ती लुटू शकतात . एक असा सोनार ज्याचे वैचारिक सोन हे आताच्या सोन्यापेक्षा हि महाग आहे , मौल्यवान आहे . अश्या संत श्रेष्ठ श्री शिव वैष्णव नरहरी सोनार महाराजांस आणि त्यांच्या भक्तीस नमन असो .


-सचिन कृष्णा तळे

  

Sunday, 16 July 2017

लावणी

नजरफुलांचा सुगंधी मुजरा तुम्ही घ्यावा
आेठावरूनी मदनाचा नजराना घ्यावा
अहो सरकार तुमचा ,जीव माझ्यावर लावा....
आहो राजे तुमचा, जीव माझ्यावर लावा...

मी नार, करूनी श्रुंगार ,तुमचा दरबार, करा ईचार
कळीदार,  नजरची धार, सावध जरा, सरकार 
अप्सरा ,ही धरा, करा प्रेमाचा , एक असा वार 
घायाळ , तुमच्या महालात, वर्षावा असा प्यार 

हि नशा बहरली आज साहेबाच्या गावा 
झाला गोंधळ रात्रीचा वाजे पैंजन पावा
अहो सरकार तुमचा, जीव माझ्यावर लावा...
आहो राजे तुमचा,  जीव माझ्यावर लावा ...

किती राखायचं, सांगायचं गुपीत माझ
दिलदार माझा यार रूबाबदार त्याचा साज
कासावीस होई जीव आतूर त्याच्या मिठीस
नजरेने ओठांना डाळीबांचा पाजावा रस

हि नशा बहरली आज साहेबाच्या गावा
झाला गोंधळ रात्रीचा वाजे पैंजन पावा
अहो सरकार तुमचा, जीव माझ्यावर लावा...
आहो राजे तुमचा, जीव माझ्यावर लावा .



- सचिन तळे


बस ईतकच सांग मला

बस ईतकेच सांग मला चोळी सैल करण्याआधी
मदनाचा पाझर लेकराचा टाहो फुटण्याआधी

मी कोण तुझा,  तु कोण माझी जगात ह्या .
स्री जीवनाच्या गर्भाशयातून पुरूष कळण्याआधी

वासना तुझ्या दारात तु अनेक नजरांची  भुकेली
तुझ्याच विश्व नी सुंदर योनीतून पुन्हा जन्मण्याआधी

तुझे नग्न रूप वस्त्रानी अन अलंकाराने सजावे
अंतरमन आणिक डोळे स्वच्छ मिळण्याआधी

तू आदि तू निरंतर तू सृष्टी रचेती साध्वी
तुझ्या स्तनातून अमृताचा गोट गिळण्याआधी

तुझ्या अस्तित्वाचा सागर कधी शांत कधी वादळ
नारी तूझ्या पदरात माझा देह जळण्याआधी

सचिन तळे



“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale