Monday, 24 June 2019

सख्या तू माझी पंढरी

येशील ना रे सख्या , त्या चांदण्यांच्या गावी
विसरून सारे विश्व , करण्या प्रेमाची वारी

तू विठ्ठल मी रुख्मिणी , मी राधा तू कृष्णाई
संसार होई चंद्रभागा , सख्या तू माझी पंढरी

तुझ्या नामाची भुरळ,  तुझ्या प्रेमाची पताका
मी पहिली पायरी , सख्या तुझ्या मंदिराची

तू नसताना हि असतो, तूच आसपास दिसतो 
तुझ्या भक्तीत हि मीरा, सख्या हरवून जाई

विरहाच्या काळोखातला, तू प्रकाश माझा
इतका छळू नकोस, माझी लागेल समाधी

सचिन कृष्णा तळे - पुणे - ७७०९०९९६४६






Tuesday, 18 June 2019

आभाळा

आभाळा काय तुला सांगू
आभाळा काय तुला मागू

तुझ्या भेटीस माझी माती
तुझ्या साठी माझी शेती
आरे माझ्या घरादारासाठी
आभाळा तुला कुठं शोधू

उन्हाचा हा शाप आम्हाला
भूमीच्या त्या गाभाऱ्याला 
पाणी आटता गाव मोकळी
आभाळा वाट किती पाहू

माणसातून माणूस मेला
फासावर न करता गुन्हा
दुष्काळाचा करून सामना
आभाळा किती बळी देवू

तुझ्या स्पर्शाने हिरवे रान
तुझ्या गडगडाने चहू आनंद
सुखावेल जीव ओले होऊन
आभाळा तुला कसा विनवू

सचिन कृष्णा तळे

Monday, 17 June 2019

तू आधार विठ्ठला

तुझ्या भेटीसाठी आतुर विठ्ठला
भक्तीचा पाहावा हा पूर विठ्ठला

चाले वाट निरंतर तुझ्या दर्शना
मुखी नाम अन तू दूरदूर विठ्ठला

ऊन वारा पावसाची नाही तमा
आभाळ तू कसली डर विठ्ठला

सुखावेल नेत्र पाहताच रे तुला
तुझे दार आम्हास माहेर विठ्ठला

गंगा चंद्रभागा काशी पंढरपूर
रुक्मीणी सवे तुझा संसार विठ्ठला

आम्ही लाडके माय बाप तुम्ही
भाग्यवंत आम्ही तू आधार विठ्ठला

सचिन कृष्णा तळे
पुणे - ७७०९०९९६४६

Thursday, 13 June 2019

हो... हेल्मेट सक्ती हवी आम्हाला

हो...  हेल्मेट सक्ती हवी आम्हाला

पाहतो रोज बातम्या
रडणाऱ्या त्या किंकाळ्या
घडणाऱ्या त्या दुर्घटना
क्षणात होते शांत सारे
क्षणात मिटणारे डोळे
क्षणात दुःखाचे डोंगर कोसळे
क्षणात होत्याचे नव्हते
फक्त हेल्मेट नसल्याने
म्हणून सांगतो तुम्हाला
हो ... हेल्मेट सक्ती हवी आम्हाला

जेव्हा पोहचतो घरी
तेव्हा होतात सोहळे
मिटून जाते चिंता सारी
पाहून मला सुखरूप घरी
माझी मुलगी माझी आई
माझी बायको अन ती
घराची जवाबदारी
मीच कर्ता करवता
माझी सुरक्षा हि महत्वाची
म्हणून सांगतो तुम्हाला
हो... हेल्मेट सक्ती हवी आम्हाला

दुचाकी ला वेग नको
रस्त्यावर घाई नको
बिना हेल्मेट प्रवास नको
कानात हेडफोन नको
नियम अन अटी पाळता
कोण अडवेल आम्हाला
कोणासाठी हि सुरक्षा
पोलिसांचा काय फायदा ?
पैशा पेक्षा जीव मोठा
हीच सरकारची अपेक्षा
विचार करावे आता
म्हणून सांगतो तुम्हाला
हो... हेल्मेट सक्ती हवी आम्हाला

सचिन कृष्णा तळे
७७०९०९९६४६
कात्रज

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale