Wednesday, 26 October 2022

महाराष्ट्र फाउंडेशन

 

महाराष्ट्र फाउंडेशन




 

महाराष्ट्र फाऊंडेशन हि अमेरिकेतील मराठी माणसांची संस्था आहे. भारतीय वैचारिक नेतृत्वात मराठी विचारवंतांचा साहित्यिकांचा सिंहाचा वाटा आहे. तेराव्या शतकापासून सुरु झालेली हि संतसाहित्य परंपरा आधुनिक काळात लोकहितवादी महात्मा फुले, महर्षी शिंदे, न्यामूर्ती रानडे, टिळक, आगरकर , राजवाडे, कर्वे, आंबेडकर यासारख्या अनेक विचारवंतांनी टिकवली आहे. हीच सामाजिक प्रगतशील वैचारिक परंपरा साहित्याच्या माध्यमातून  राहावी या हेतूने १९७८ साली अमेरिकास्थित सुनील देशमुखांनी पुढाकार घेत महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेची स्थापना झाली. सर्वांसाठी सामाजिक आणि आर्थिक न्याय. म्हणजे त्यात जाती, धर्म, देश या सर्व प्रकारच्या भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्वांचं भलं होणं, सर्वांना न्याय मिळणं हे महाराष्ट्र फाउंडेशनचं ब्रीदवाक्य आणि तत्त्व आहे

 

जाती-पातींचं निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री शिक्षण आणि स्त्री सुधारणा, स्त्री-अत्याचार निर्मूलन, स्त्रियांचा सन्मान, लिंगभेद निर्मूलन, हुंडा-विरोध यांसारख्या मानवतावादी आणि उदारमतवादी चळवळींत प्रत्यक्ष काम करणारे आणि त्या त्या क्षेत्रांमध्ये लेखणी चालवणारे साहित्यिकांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्या हेतू 1993 मध्ये सुनील देशमुखांनी दोन कोटी रुपये महाराष्ट्र फाऊंडेशनला देऊन ही पुरस्कार योजना सुरू केली. मुंबईच्याकेशव गोरे स्मारक ट्रस्टने पहिली पंधरा वर्ष ही योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतला अन गेली नऊ वर्षे पुण्यातील साधना ट्रस्ट या पुरस्कारांचे आयोजन करीत आहे. सुरुवातीला साधनेचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता साधनेचे संपादक विनोद शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन केले जात आहे.

 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीनिमित्तही एक नवा पुरस्कार महाराष्ट्र फाऊंडेशनने सुरू केलेला आहे. मराठी ललित किंवा वैचारिक साहित्याच्या क्षेत्रात आपल्या आयुष्यभर कार्याने मोलाची भर घालणाऱ्या साहित्यकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याचा गौरव करण्यासाठी दोन लक्ष रुपये आणि मानचिन्ह असा महाराष्ट फाऊंडेशन गौरव पुरस्कार दिला जातो. काही साहित्यिकांचे वैशिष्ट्यपूर्ण मोलाचे असे योगदान असूनही वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना पुरस्काराने गौरवण्याचे राहून जाते म्हणून २००५ पासून ३० हजार सन्मानचिन्ह अशा स्वरूपाच्या एक विशेष पुरस्काराने अनेक नवोदित साहित्यिकांना गौरवण्यात आले आहे. समकालीन मराठी साहित्याला प्रोत्साहन म्हणून सात मराठी ग्रंथाना प्रत्येकी २५ हजार अन सन्मानचिन्ह असे महाराष्ट्र फाऊंडेशन ग्रंथ पुरस्कार देण्यात येतो. एखाद्या महत्वाच्या सामाजिक समस्येवर आशयसंपन्न नाट्यकृतीस रा. . दातार नाट्य पुरस्कार देण्यात येतो. आजवरच्या प्रमुख पाहुण्यांत भीष्म साहनी, सुरेश दलाल, अमोल पालेकर, पर्यावरणवादी स्टीव्ह मिल्स, रामचंद्र गुहा ह्यांनी ह्या मंचावर हजेरी लावलेली आहे.

सचिन कृष्णा तळे

Saturday, 22 October 2022

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान.

 

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान



.

 

भारताच्या ग्रंथालय चळवळीचा इतिहास हा पूर्णपणे सार्वजनिक ग्रंथालय चळवळीशी निगडीत आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्येसामुदायिक विकास कार्यक्रमया अंतर्गत राष्ट्रीय संदर्भ ग्रंथालय, राज्याच्या ठिकाणी राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आणि जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हा ग्रंथालये शासकीय स्तरावर स्थापन करण्यात आली. याच काळामध्ये ग्रंथ प्रदान कायदा, 1954 करण्यात आला. सर्व राज्ये केंद्रशासित प्रदेशातील शासन यंत्रणा सार्वजनिक ग्रंथालय विकासाबाबत सक्रिय असल्याचे दिसून आले. चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात प्रामुख्याने भारतातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी सरकारने पुढाकार घेऊन स्वायत्त स्वरुपाचे "राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता" येथे स्थापन केले. ग्रंथालय विकासासाठी असे प्रतिष्ठान स्थापन करणारे भारत हे जगातील एकमेव राष्ट्र आहे.

 

आधुनिक भारताचे शिल्पकार थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्या व्दितीय जन्म शताब्दीचे निम्मित लक्षात घेऊन राष्ट्रीय समितीच्या दिनांक 28 मार्च, 1972 रोजी झालेल्या बैठकीत "राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान" स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या (सध्याचे नाव मनुष्यबळ विकास मंत्रालय) संस्कृती विभागांतर्गत 6 मे 1972 रोजी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. दिनांक 20 मे 1972 रोजी प्रतिष्ठानचे औपचारिक उदघाटन राष्ट्रीय ग्रंथालय, कोलकत्ता येथे करण्यात आले.

 

सार्वजनिक ग्रंथालय सेवेचा प्रसार करणे आणि त्यासाठी व्यापक सहाय्य करणे या मुख्य उद्दिष्टासाठी प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले आहे. राज्य केंद्रशासित प्रदेशातील शासनाच्या सहकार्याने मदतीने उद्दिष्टांची पूर्तता करण्याचे प्रतिष्ठानचे धोरण आहे. भारतामधील ग्रंथालय चळवळीस उत्तेजन देणे, राष्ट्रीय ग्रंथालय धोरण ठरविणे, त्याची राज्य केंद्रशासित प्रदेशातील शासनाव्दारे अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रयत्न करणे. ग्राम ग्रंथालयापासून राष्ट्रीय ग्रंथालयापर्यंत उत्कृष्ट प्रतीची ग्रंथालयांची साखळी तयार करणे, त्यासाठी आंतरग्रंथालयीन सेवेच्या माध्यमाचा वापर करणे.ग्रंथालये, ग्रंथालय संघटना आणि ग्रंथालय विकासासाठी कार्य करणाऱ्या इतर संघटनांना त्यांच्या कार्यासाठी आर्थिक सहाय्य देणे. ग्रंथालय विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींसाठी भारत सरकारला मार्गदर्शन करणे हे महत्वाची उद्दिष्टे ह्या प्रतिष्टान ची आहेत.

 

महाराष्ट्र शासनातर्फे सध्या अशंदानासाठी रुपये 250.00 लक्ष (रुपये दोन काटी पन्नास लाख ) तरतूद करण्यात येते. प्रतिष्ठानच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी वेगवेगळया अर्थसहाय्याच्या योजना तयार करण्यात आल्या आहेत. ) राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाच्या समान निधी योजना आणि  ) राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाच्या असमान निधी योजना या दोन निधी योजना अंतर्गत प्रतिष्ठानचे कार्य चालू आहे.

ग्रंथालय संचालनालय

 

ग्रंथालय संचालनालय

 

ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान माहिती संग्रहण आहे. आधुनिक काळात ग्रंथालयांची संकल्पना बदलून ते माहितीचे देवाण - घेवाण करणारी संस्था अशी झाली आहे. आज शासकीय स्तरावर देखील ग्रंथालयाची चळवळ उभारली जात आहे. आज वैयक्तिक स्तरावर देखील ग्रंथालय तयार केली जातात. व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासा पूर्तीचे उत्कृष्ट साधन म्हणून ग्रंथांची उपयोगितता सर्वश्रुत आहे. म्हणूनच बौद्धीक विकासाचे शक्तीकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जा केंद्र म्हणून सार्वजनिक ग्रंथालयांची नितांत आवश्यकता आहे. ह्याच उद्दिष्टेवर महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967ची अंमलबजावणी करण्याकरिता या अधिनियमातील तरतुदीनुसार "ग्रंथालय संचालनालय" या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली.

 

राज्य शासनाने जनतेच्या उपयोगासाठी स्थापन केलेले स्वतः चालविलेले शासकीय राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, तसेच शासकीय विभागीय ग्रंथालये, शासकीय जिल्हा ग्रंथालये यांच्या माध्यमातून राज्यातील ग्रंथांचा संग्रह करून कायमस्वरूपी एक सांस्कृतिक ठेवा वा राष्ट्रीय संपत्ती म्हणून जतन करणे आणि ते आवश्यकतेनुसार वेळोवेळी जनतेला उपलब्ध करून देण्याचे कार्य केले जाते. सर्व सार्वजनिक ग्रंथालयांमधील दुर्मिळ ग्रंथ, नियतकालिके, हस्तलिखितांचा संग्रह संवर्धन करण्यासाठी संचालनालया अंतर्गत हस्तलिखित विभागाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रंथालयात काम करणार्या किंवा काम करू इच्छिणार्यासाठी ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण ग्रंथालय संघामार्फत आयोजित करून ग्रंथालय सेवांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची जबाबदारी ग्रंथालय संचालनालया तर्फे पार पाडण्यात येते. राज्यात प्रसिद्ध झालेल्या सर्व ग्रंथांची सूची प्रतिवर्षी प्रसिद्ध करणे, सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथखरेदीस उपयुक्त व्हावी यासाठी ग्रंथनिवड समितीने शिफारस केलेल्या ग्रंथांच्या याद्या प्रसिद्ध करणे, हे कार्यही ग्रंथालय संचालनालयातर्फे केले जाते.

 

'गाव तेथे ग्रंथालय' , "वाचनसेवा विस्तार" , "डिजिटल उपकेंद्रांची स्थापना" , "-प्रशासन" आणि  "संगणकीकरण" हे संचालनालयाचे भविष्यातील संकल्प आहेत. महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना, परिरक्षण, संघटन विकास करणे हे ग्रंथालय संचालनालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी ग्रंथालय सेवेच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून शासन अंमलात आणत आहे. वाचनाची अभिरूची निर्माण करण्यास ग्रंथालय वाढीस प्रोत्साहन देणे , प्रचलित ग्रंथालयांचा सर्वांगिण विकास साधणे, ग्रंथालयाच्या वाचक वृध्दीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे ,  "गाव तेथे ग्रंथालय" संकल्पना जलद गतीने अंमलात आणणे . हे मुख्य उद्दिष्टे डोळ्यसमोर ठेऊन उच्च तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य काम करत आहे.

 

सचिन तळे

Thursday, 20 October 2022

भारतीय ज्ञानपीठ

 

भारतीय ज्ञानपीठ

 

प्रसिद्ध उद्योगपती स्वर्गीय साहू शांतिप्रसाद जैन यांनी १८ फेब्रुवारी १९४४ रोजी वाराणसी येथे स्थापन केलेली आणि भारतीय साहित्य-संस्कृतीच्या अभिवृद्धयर्थ कार्य करणारी भारतीय ज्ञानपीठ हि प्रख्यात संस्था आहे. दुर्मिळ प्राचीन भारतीय ग्रंथांचे संशोधन, संपादन प्रकाशन करणे तसेच सद्यकालीन भारतीय भाषांतील मौलिक सार्वजनिक वाङ्मयास लोकोदयासाठी उत्तेजन देणे ह्या हेतूने भारतीय ज्ञानपीठाची स्थापना केली गेली. वाराणसी येथे १९४४ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या अधिवेशनानिमित्त अनेक विद्वान एकत्र जमले अन खऱ्या अर्थाने त्याचवेळी भारतीय ज्ञानपीठ चा प्रवास चालू झाला.

 

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाग्देवीची प्रतिमा' आणि 'अकरा लाख रुपयांचा धनादेश' यांचा समावेश असतो. ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने .. १३०५ मध्ये केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.

 

भारतीय ज्ञानपीठाने आजवर सुमारे सहाशे ग्रंथ प्रसिद्ध केले असून ते संस्कृत, प्राकृत, पाली, अपभ्रंश, हिंदी, तमिळ, कन्नड, उर्दू, इग्रंजी . भाषांत आहेत. संस्थे तर्फे दहा हजार छायाचित्रे जमविण्यात आलेली असून ती शास्त्रशुद्ध रीतीने संगृहीत केली आहेत. आजवर विविध भारतीय भाषांतील २० प्रतिभासंपन्न लेखकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे.भारतीय ज्ञानपीठाचे ज्ञानोदय हे प्रसिद्ध हिंदी मासिकपत्र असून त्यातून नवोदित होतकरू भारतीय लेखकांचे लेखन प्रसिद्ध केले जाते. ज्ञानपीठ पत्रिका हे संस्थेचे दुसरे मासिक असून त्यातून विविध भारतीय भाषांतील विद्वान लेखकांचे दर्जेदार लेखन प्रसिद्ध होते

 

पुरस्कार समारंभानिमित्त कवितावाचन, कविसंमेलन, नृत्य, संगीत यांसारखा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही राबवले जातात. मराठी भाषेला आजवर चार ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहे.  १९७४ साली विष्णू सखाराम खांडेकर यांच्या ययाति ह्या पुस्तका बद्दल तर १९८७ साली विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज याना विशाखा ह्या काव्यसंग्रह बद्दल पुरस्कार मिळाला आहे. २००३ मध्ये विंदा करंदीकर याना युरोपीय एक भारतीय तत्वज्ञ त्यांच्या तत्वज्ञानाचे ओवीरूपात वर्णन केलेल्या अष्टदर्शने ह्या पुस्तक बद्दल ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले होते . २०१४ मध्ये भालचंद्र वनाजी नेमाडे याना हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ ह्या पुस्तकाला भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.

 

सचिन कृष्णा तळे

 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale