Tuesday, 16 May 2023

दखलपात्र असा मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोग्य यज्ञ ( मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष )

 दखलपात्र असा मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोग्य यज्ञ 

( मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष )




हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे


भोवतालचा दाट अंधार दुःखमय असला तरी उद्याच्या जीवनात उर्जामयी आनंदी सूर्य उगवण्यासाठी प्रत्येकाला मदतीचा हात लागतो. ह्या जगात सगळ्यात अनमोल जर काही असेल तर तो माणसाचा जीव आहे. माणूस आहे. आपण अनेक जाती धर्मातून अनेक विचारांतून वेगवेगळ्या संघटनेतून एकत्र येत असतो. पण एकवेळ अशी येते कि तेव्हा आपण ह्या सगळ्या मानवनिर्मित कुंपणातून बाहेर पडतो आणि माणूस म्हणून गरजू माणसांसाठी धावून जातो. आणि जो हात तुमच्यासाठी धावून येतो तोच हात देवाचा हात असतो. देव त्याच माणसाच्या रूपात आपल्याला दिसू लागतो. 


असाच हात देवाने आपल्याला डॉ बाबा आमटे यांच्या रूपाने मिळाला होता. जिथे मनुष्य वस्ती नाही अश्या दुर्गम ठिकाणी आदिवासी भागात पद्मश्री पद्मविभूषण डॉ बाबा आमटे यांनी जनसेवेसाठी कुष्ठरोगी यांच्यासाठी आरोग्य यज्ञ पेटवला. कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले आणि अनेकांना नवजीवन मिळालं. 


असाच एक महत्वपूर्ण यज्ञ आपल्या महाराष्ट्रात राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री नामदार एकनाथ भाई शिंदे यांनी पेटवला अन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने  गेल्या १० महिन्यांत  ८ हजार १९२ रुग्णांना एकूण ६० कोटी ४८ लाख रुपयांची मदत दिली आहे. संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्‍चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुण संपन्न असलेले पत्रकार मंगेश चिवटे याना या कश्याची जवाबदारी दिली आणि त्यांनी हा यज्ञ महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात नाही तर महाराष्ट्राच्या सीमांपलीकडे जिथे मराठी बांधव आहेत त्यांच्या पर्यंत पोहचवला. आवर्जून एक उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे हेच कक्ष महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आला होता. पण जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्याच दिवशी त्यांनी पहिलं आरोग्य सेवेसाठी जनतेसाठी हा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष चालू करण्याचा आदेश दिला. 


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली होती. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२३७ रुग्णांना १० कोटी २७ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९५ लाख तर एप्रिल मध्ये विक्रमी १९८४ रुग्णांना ९ कोटी ९३ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. इतका मोठा व्यवहार पण त्यात जराही हलगर्जी पणा किंवा गैरव्यवहार दिसून हि येणार नाही. जनतेचा पैसा जनतेसाठी कसा वापरायचा , सरकारने फक्त घोषणेतून नाही तर कामातून त्यांच्या आड अडचणीत कसं पोहचायचं याच जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आहे. हॉस्पिटल मध्ये येणारी बिल हि सामान्य माणसांना भरणे इतपत नसतात आणि हि रक्कम त्या क्षणाला किती महत्वपूर्ण असते ह्याची जाणीव मनात ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विलंब न लावता गरजूंपर्यंत फंड कसा लवकरात लवकर पोहचेल ह्याची काळजी घेताना दिसून आलेत. काही गरजूंना तर २४ तासाच्या आता मदत मिळाली आहे. इथे तुमची ना जात पहिली जात , ना पक्ष , ना धर्म. इथे तुमची गरज आणि अडचण समजून घेतली जाते त्यानंतर ती निधी थेट हॉस्पिटलच्या खात्यात रुग्णाच्या नवे अदा केली जाते. योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.

माणसांच्या वेदना समजून घेण्यासाठी संवेदनशील असणे फार गरजेचं आहे. बाबा आमटे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एका वळणावर नवीन विचार मंगेश चिवटे यांच्या डोक्यात आला आणि स्व:मनाने त्यांनी नोकरीची वाट पुढे न धरता जीवनातल्या काही कडू-गोड अनुभवला सोबत घेऊन वैद्यकीय कक्षाच हे आरोग्य यज्ञ पेटवत ठेवलं. आजच्या काळात या यज्ञात राज्यातून अनेक तरुण होतकरू मुलं स्वतःहून ह्या आरोग्य सेवेत कार्य करत आहेत. या प्रत्येक आरोग्यदूतांना दरवर्षी रक्तदान सक्तीचं आहे.



मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे


१. अर्ज ( विहीत नमुन्यात)

२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)

३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.

(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)

४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक

५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)

६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.

८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.

९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.


१. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६),

२. हृदय प्रत्यारोपण

३. यकृत प्रत्यारोपण

४. किडणी प्रत्यारोपण

६. बोन मॅरो प्रत्यारोपण

५. फुफ्फुस प्रत्यारोपण

७. हाताचे प्रत्यारोपण

८. हिप रिप्लेसमेंट

९. कर्करोग शस्त्रक्रिया

१०. अपघात शस्त्रक्रिया

११. लहान बालकांचे शस्त्रक्रिया

१२. मेंदूचे आजार

१३. हृदयरोग

१४. डायलिसिस

१५. अपघात

१६. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)

१७. नवजात शिशुंचे आजार

१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण

१९. बर्न रुग्ण

२०. विद्युत अपघात रुग्ण

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale