स्वतंत्र
भारताचे असे राष्ट्रपती जे धर्माने मुस्लिम
होते….
अनेक
वर्षांपासून आपल्या भारतात हिंदू मुस्लिम हा वाद कोणत्या
ना कोणत्या कारणास्तव पेटवला जातो आणि तो सहज पेटतो.
असे असंख्य उदाहरण आपल्या देशात तसेच शेजारच्या देशात आहेत. भारताच्या भूमीतून धार्मिक अजेंडा च्या जोरावर स्वतंत्र झालेले पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान हे असे मुस्लिम
राष्ट्र आहे जिथे आजवर एकही हिंदू हा राष्ट्रपती झाला
नाही अन तिथे हिंदूंची
संख्या हि विरळ होत
चाललेली आहे. पण हिंदू बहुसंख्य
असलेला भारत असा एकमेव राष्ट्र आहे ज्या राष्ट्राच्या मानाच्या स्थानावर राष्ट्रपती ह्या पदावर चार मुस्लिम राष्ट्रपती विराजमान होते.
खरंतर
भारताने धर्मभेद कधी पळाला नाही. सर्व धर्माचा आदर अन सर्व धर्म
समभाव हि भारताची ओळख.
म्हणून अनेक परकीय धर्माना देखील भारतात स्थान आहे त्यांची प्रार्थना स्थळे आहेत. भारतावर जितकी परकीय आक्रमणे झालीत त्यातील सगळ्यात जास्त आक्रमणे हि धार्मिक विजय
मिळवण्याच्या दृष्टीने होती. हे भारतीयांना माहित
असताना देखील भारताने अन भारतीयांनी परकीय
धर्माना स्वीकारले. त्यांच्या संस्कृतीचा स्वीकार केला, त्यांना आपलस केलं.
आम्ही
अभिमानाने सांगू कि भारत हा
इतर मुस्लिम राष्ट्रा सारखा धार्मिक विचारांच्या पिंजऱ्यात अडकलेला देश नाही. तो स्वतन्र आहे.
म्हणून तर झाकीर हुसेन
, मोहमद हिदयातुल्लाह , फक्रूद्दीन अली अहमद अन अवूल पाकिर
जैनुलब्दिन अब्दुल कलाम सारखे व्यक्ती राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. चला ह्या स्वतंत्र भारताच्या ह्या चार राष्ट्रपती बद्दल थोडं जाणून घेऊया.
1.
डॉ. झाकिर
हुसेन
हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. मे १३, इ.स. १९६७ ते
मे ३, इ.स.
१९६९ पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपद सांभाळले. हुसेन नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते. १९५७ ते
१९६२ या
काळात त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून कार्य केले आणि १९६२ ते १९६७ पर्यंत
भारताचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. हुसेन यांच्याखाली, जामिया भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी घनिष्ठपणे संबंधित झाले. इ.स. १९६३
मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान, भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. भारतीय राष्ट्राध्यक्ष पदावर मरण पावणारे हे पहिले राष्ट्रपती.
2.
मोहम्मद हिदायत
उल्लाह
हे भारत देशाचे ११वे सरन्यायाधीश, सहावे उपराष्ट्रपती व १९६९ साली
एक महिन्याकरिता कार्यवाहू राष्ट्रपती होते. त्यांनी देशात व परदेशांत काही
महत्त्वाच्या संस्थांवर सदस्य, उपाध्यक्ष व अध्यक्ष या
नात्याने काम केले. नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारी व शैक्षणिक मंडळाचे
ते एकोणीस वर्षे (१९३४–५३) सदस्य होते. दिल्ली व पंजाब विद्यापीठाचे
कुलगुरू (१९७९–८४) व जमियत मीडिया
हुसनलियत विद्यापीठाचे कुलगुरू (१९६९–८५) म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. इंटरनॅशनल लॉ असोसिएशन या
संस्थेत त्यांनी भारतीय शाखेचे अध्यक्ष म्हणून काम केले. तसेच भारतीय रेडक्रॉस संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. कार्यकाळ - २० जुलै १९६९ ते २४
ऑगस्ट १९६९. ( ३५ दिवस)
3.
फक्रुद्दीन अली
अहमद
हे भारताचे पाचवे राष्ट्रपती होते . १९३५ मध्ये आसामच्या विधिमंडळावर ते निवडून आले
आणि अर्थ व महसूल मंत्री
झाले (१९३८-३९). ‘छोडो भारत आंदोलना’त (१९४२) त्यांनी
सक्रिय भाग घेतला व ते स्वातंत्र्य
चळवळीत पडले. त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. १९६६ पर्यंत त्यांनी अर्थ, कायदा व समाजकल्याण या
खात्यांचे मंत्रिपद सांभाळले. १९६६ ते १९७४ या
काळात त्यांनी केंद्रीय मंत्री या नात्याने वीज
व पाटबंधारे, शिक्षण, औद्योगिक विकास, कृषी इ. अनेक महत्त्वाची
खाती सांभाळली. ते राष्ट्रपती असताना
त्यांनी इंग्लंड, जर्मनी, बल्गेरिया, हंगेरी, फ्रान्स, इटली, ईजिप्त, सोव्हिएट रशिया, श्रीलंका, इराण इ. देशांना भेटी
दिल्या. तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर
त्यांनी काम केले. त्यांच्या कारकीर्दीतच २५ जून १९७५
रोजी आणीबाणीची जाहीर घोषणा करण्यात आली होती. कार्यकाळ २४ ऑगस्ट १९७४
ते ११ फेब्रुवारी १९७७
(२ वर्ष १७१ दिवस)
4.
ए.पी.जे अब्दुल
कलाम हे भारताचे ११
वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल
अभियांत्रिक होते. त्यांनी डी.आर डी.ओ. मध्ये कार्य
केले व भारताच्या अग्नी-१, अग्नी-२
आणि अग्नी-३ प्रक्षेपण अस्त्रांची
निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते स्वतः आध्यात्मिक
होते, युवकांशी त्यांची नाळ जोडली गेली होती आणि ते सर्व जाती-धर्मातील लोकांमध्ये एकजूट राहावी यासाठी अथक प्रयत्न करत राहिले. त्यांच्यामध्ये विज्ञान, कला आणि अध्यात्म यांचा अनोखा मिलाप होता. कार्यकाळ
- २५ जुलै २००२ ते २५ जुलै
२००७ (५ वर्ष)
सचिन
कृष्णा तळे