Thursday, 28 January 2016

हा राष्ट्र श्रमिकांचा



स्वतंत्रता काय असते
पिंजऱ्यात कळाले मला

तिरंगाच्या तीन रंगातून
अलगत वगळले मला

ही भारत माता झाली
धर्माने पोळले मला

राजकीय देश भक्तीने
जिवंत गिळले मला

गर्दीत शोध घेता
माणसांनी टाळले मला

जात पाहून समाजाने
कित्येकदा जाळले मला

हा राष्ट्र श्रमिकांचा
श्रीमंताने विटाळले मला

स्वतंत्रता काय असते
पिंजऱ्यात कळाले मला

सचिन कृष्णा तळे


Monday, 18 January 2016

सारस्वतांचा गोंधळ



" विक्यासंमेलन लैच्या लैचंराजकारणी झालं रं "
" साहित्यिक , लेखक , नामवंत कवी आणिक कथाकार कमी दिसले राजकीय रुसवा फुगवी जास्त दिसली "
" हो रे , दाद्या … "
" सर्व काही सबनीसांचा आशीर्वाद … "
"  सबनीस अध्यक्ष झाले आन वादाला तोंडच फुटलं "
" पण .. यंदाच्या साहित्य संमेलनाला काळ फासलंअध्यक्षांनी "
" ते  कसं रे …. दाद्या "
"पुण्यातून  प्रकाशित होणाऱ्या ' साहित्य चपराक ' चे अंक जप्त केले गेले "
" बाबोपण का रे दाद्या "
" आरे त्यांनी सबनीसांचा खरा मुखवटा जनतेसमोर आणला म्हणून "
" हो का … "
" म्हणून पवार साहेबांनीनिवडणूक प्रक्रिया बदली पाहिजे आस सांगितलं . "
" म्हंजी साहेबानाही माहित होत , की समेलन अध्यक्ष निवड ही चुकली करून … "
" विक्यासंमेलन अध्यक्ष नि २०० पाणी पुस्तकी भाषण लिहिलं होत …"
" म्हणून लय लोकांनी अध्यक्ष भाषण च्या वेळी निघून गेले , आपल्या मुख्यमंत्री नी ही कल्टी हाणली . "
" दाद्याआता अध्यक्ष दोनशे पाणी भाषण वाचणार म्हणजे किती टाईमं लागेल रेव्यतागतील की लोकं "
" हा हा हा … "
" विक्या पण मला एक सांगतू संमेलनात गेल्ता नाकविता सादर करायला "
" हो रेगेल्तो की दाद्या "
" आरे मग तिथे , मराठीत कविता किवा गझल सादर झाली नाही का "
" झाली कीबरेच कवी आलतेछान झाला कार्यक्रम "
" आरे विक्यात्या मिडिया वाल्यांनी ते दाखवलंच नाही रे "
" फक्त आणि फक्त गुलजार एके गुलजार चाच पाढा दाखवलं … "
" जाऊ दे नादाद्या "
" ह्या मिडिया वाल्यांनामराठीचं कधी कौतुक होत कांआणि ह्यांच्या कडून अपेक्षा तरी का ठेवावी "
"ते खर हाय रंआता मोठ्या साहेबांच्या सैनिकांनी ही संमेलनाला पाठ फिरवली म्हणे "
" हो रे विक्याउद्धव साहेबाना आमत्रण पत्रिका मिळाली नाही म्हणून सर्व शिव सैनिक रागावलेत "
" कमळाबाई तर आधीच रागात होती "
"त्यात आपल्या आशा ताई हीसंमेलनात जावून फसल्या "
"त्यांना संमेलनाची चातुराई कळताचकार्यक्रम मधेच थांबवला . "
"दाद्याम्हंजी लैच गोंधळ की … "
" साहित्य संमेलन म्हणजे …. सरस्वतीचा हा गोंधळचं कीविक्याअध्यक्ष स्थानी दैत्य बसले तर गोंधळ हा होणारच की "
" त्यात  टोले बाजी चांगलीच झाली … "
" पण काहीही म्हण विक्याआपल्या मराठी जनतेने संमेलनाला पाठ नाही फिरवली "
" मानपान बघत त्यांनीखूप छान प्रतिसाद दिलाघुमान पेक्ष्या हि जास्तकाय ती अफाट गर्दी होती संमेलनातपुस्तकांची विक्री ही चांगली झाली . प्रकाशकांना नक्कीच आवडलं असेल . "
" हो रे दाद्यात्यात मान्यवरांचे संवाद मुलाखती प्रेरणा दाई ठरलं "
"विक्या  फक्त राजकीय लोक सोडली तर एकंदरीत कार्यक्रम छान झाला  "
" हो ते तर खर आहेदाद्या  ही शोकांतिका म्हणावी लागेल साहित्याची "
" म्हणजे माझ्या सारख्या नवोदित मंडळी जे साहित्य कडे करियर म्हणून पाहतायतते …हे असले दरोडेशाई राजकारण पाहिलं तर कोण येणार रे पुढे "
पत्रकार राजू परोळीकर सरांचंफेसबुक अकौंट ही ब्लॉक केलंअध्यक्षांच्या पिलानी "
"खर हाय विक्यामुळात मला ही हाच प्रश्न पडतो … "
" आज साहित्य राजकारणात आहे की राजकीय  साहित्यात "
सचिन कृष्णा तळे ( पुणे )

 

Thursday, 14 January 2016

अध्यक्ष्यांची खुर्ची

अध्यक्ष्यांची खुर्ची ,नरम की गरम
सत्तेसाठी काय, चरण की करम

पुस्तकी बाजार ,साहितीकांचा हिशोब
संमेलन म्हणजे ,भरण की धरम

चार पुस्तके ,जरा वाचून झाले
काय लिहिले , धापून की मापून

प्रसिद्धी कशी ,लोळेल पायापाशी
राहू मी कशी , चाखून की राखून

कार्यकर्ते आले , कार्य करून गेले
पाहावे कसे , दुरून की चोरून

भेटीगाटी सुरु , ओळखीचे विसरू
मानाचे पाखरू , जपून की पाहून

शेवटी पुरस्कार , आणिक टीकाकार
मानावे उपकार , देवून की घेवून

रसिक मायबाप , पाहून व्याप
करतील न्याय , लिहून की वाचून 

सचिन कृष्णा तळे ( पुणे )


Tuesday, 12 January 2016

साहित्याचे "बारा " , अध्यक्षाची गेली "मती " वाया



साहित्याचे "बारा "
अध्यक्षाची गेली "मती " वाया

विक्या आणि मी … आम्ही दोघे ही फार जुने मित्र , म्हणजे बालदोस्त चं . आठवड्यात एकदा तरी आम्ही नक्की भेटतो . पण ह्या विक्या ला एक लंय घाण सवय . भेटला की गप्पा मारता मारता सध्या च्या घडामोडीवर येवून आपटणार . शिक्षणाने कमी जरी असला तरी विक्याचं डोस्क लय भारी .
नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळात नाक्यावरच्या टपरी वर मी आलो . पण विक्या आला नव्हता ... त्याची वाट पाहत तिथेच बसलो . जवळचा वृत्तपेपर नाकाच्या थोडा वर नेला  म्हंटलं विक्या येईपर्यंत थोड्या बातम्या चाळून घ्यावं . तर पहिली बातमी नजरेत पडली ती , साहित्य संमेलनाचे नवे अध्यक्ष सबनीस ह्यांची . अमुक अमुक ठिकाणी त्यांचा पुतळा जाळला . तर अमुक तमुक संघटनांनी त्यांना पाठींबा दिला म्हणून . काही दिवसापूर्वी त्यांना टीव्हीवर पाहिलं , खूप चिडलेले होते , नेमेके काय बोलतायत ते मला हि नाही कळाल .पण त्यांना कोणीतरी धमकी बिम्की दिली होती म्हणून .
" दाद्या  " विकास ने लांबून आवाज दिला
घरात लहानपणा पासून मला दादा असेच म्हणत होते , त्यामुळे समद्यांनी मला दादा … हेचं नाव पाडलं .
"दाद्या … " विकास जवळ आला आणि म्हणाला .
" दाद्या .. कसा दिसतोय , मी … "
मी म्हणालो , " आरे व्हा ..  स्वारी कुठे बाहेर जाण्याच्या तयारीत दिसत्तीय,  आणि ही काय वेशभूषा केलीय  . सद्रा , लटकवलेली कापडी झोळी, खाकी ज्याकेट व दोन पुस्तक . साहित्यिक बिहीतिक झालस की काय ? .
"नाही रे दाद्या , सांगतो गम्मत … आधी कटिंग मागवं "
नामदेव काका कटिंग घेवून येतात . मग आमच्या गप्पा चालू झाल्या . पण ह्यावेळी विक्या ने डायरेक्ट विषयावरच बोट ठेवला .
" विक्या  … काय गम्मत आहे रे … "
" आरे मी  यंदाच्या ८९ साहित्य संमेलनात ' कविता ' सादर करणार आहे . "
" आरे व्हा … " थोडा अभिमानाने पण विचाराच्या गोंधळात . विकास कविता करतो . तेही महिन्यातून चार या पाच . एक या दोन कविता प्रकशित झालेल्या विकास ला इतक्या लवकर इतक मोठ व्यास पीठ मिळेल अस वाटल नव्हत .  म्हणून सहज विचारपूस केली .
" छान .. अभिनंदंच रे विक्या .. , पण कस काय जमलं … काही सटिंग लावलीस की काय ? "
थोड्या हळू आवाजात विकास म्हणाला …
" आरे … आपल्या गावातले … पुस्तकी काका आहेत ना … ज्यांच्या घरात खूप पुस्तके आहेत बघ  !    त्यांच्या ओळखीचे कोणीतरी म्हणे साहित्य संमेलन चे अध्यक्ष झालेत , त्यांनी सहज मला विचारलं … बाळ विकास तू मोठ्या व्यासपीठावर कविता सादर करणार का ? "
" तुला माहितीय ना … मी संधिसाधू आहे ते … वेळ न घालवता लगेच होकार दिला … "
इतक्या मोठ्या व्यासपीठाची हि चेष्टा पाहून आश्चर्य झालो . नोवोदित मित्रांना संधी मिळतीय म्हणून आनंद झाला . अन त्याला सहज प्रश्न विचारला .
" विक्या … तुला श्रीपाल सबनीस माहित आहे का रे ? " विकास थोड्या विचारात …
" नाही रे … कोण हे सबनीस ''… त्याच्या ह्या प्रश्नाने मी थोडा हसलो …
" आरे … वेड्या … ज्या संमेलनात तू कवितासादर करणार आहे त्यांचे ते अध्यक्ष आहेत … "
" नाही रे …  दाद्या … नव्हत माहित मला … आता … ह्या आधी कधी संमेलनाचा आणि माझा दूर दूर तरी संबंध आलता का ? " आरे  थांब …
हो … आठवल … मध्ये त्यांनी अस म्हंटल होत की " पवारांचे माझ्यावर कोणतेही उपकार नाहीयेत करून … बरोबर ना , आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी ह्यांना त्यांनी आरे तुरे ची भाषा केलती म्हणे "
" हो रे विक्या … मुळात सबनीसांची ओळख ही एका डबक्या पुरतंच . आता पवार साहेबांची मदत घेवूनही … साहेबाना विसरला तो … तर त्याच्या साठी राबलेल्या कार्यकर्त्यांच कस असणार हा विचार कर "
"
थोड्या विचारात चहा चा एक घोट घेतला
" आता हे बघ .. ही बातमी वाच .. " पेपर त्याच्या हाती दिला .. वाचून झाल्यावर ..
" दाद्या हा खर बोलत असेल का रे ? त्याला नक्की मागितला असेल का रे … राजीनामा . "
" आरे विक्या माधवी वैद्य ह्याचे स्टेटमंट वाच की मग .कळेल तुला … " थोड्याश्या वर आवाजात
" मित्रा … आधी सबनीस कोणालाच माहित नव्हते , पण आज सबनीस सर्वाना माहित झाले . प्रसिद्धी मिळवण्या साठी हे कराव लागत रे . आज त्यांना पोलिसांची सुरक्षा आहे . रोज वृत्तपत्रात बातम्या आहेत . आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या व्यासपीठाला इतिहास आहे त्या व्यासपीठाचे ते अध्यक्ष्य झालेत . म्हणजे इतिहासात जमा झाले ना . "
" आरे हो कि … दाद्या "
" साहित्य संमेलनात राजकारण असत पण इतक … "
"  संमेलन गरम च असत विक्या … आधी तो चहा घे थंड झाला बघ  " मस्करीत .
" विक्या ..  जेव्हा सबनीस निवडून आले , तेव्हाच यंदाच्या साहित्य संमेलनाचे बारा वाजले . पण संमेलनाची खुर्ची  च्या मोहाने , सबनीसांची मती वाया गेलीय . "
" अस आहे का .. म्हंजी अस म्हण की , साहित्याचे वाजले ' बारा ' अन अध्यक्षाची गेली 'मती ' वाया “
हसत हसत , दोघांनी हातातला कप खाली ठेवला , आणि निघालो आपापल्या घरी .

सचिन कृष्णा तळे (पुणे)
7709099646


Sunday, 10 January 2016

आले चार खांदे आता राम राम सांगा

आले चार खांदे आता राम राम सांगा
आठवणीच्या फांदीने शरीर माझे जाळा

जन्मा पासून मृतूचा प्रवास गाठला
कधी हसत रडत हा वैकुंठ सापडला

नका डोळ्यातुनी काडू अश्रूच्या धारा
दुख होतंय सोडून तुम्हास जाताना

नव्हते काही येताना जाताना काहीच नाही
माझ माझ म्हणार पुसलं एका क्षणामधी

आता हिशोब लागेल पाप आणि पुन्याचा
मिळेल कदाचित पुन्हा माती मानवी जन्माचा

मी म्हणेल तेव्हा नको मानवी हा धर्म
कलयुगात सर्वांच्या घरी वसतो हा गर्व

एकचं सांगणे , कोणी नाही कोणाचा
आल्या जन्मी द्यावा घ्यावा आनंद सर्वांचा
आता राम राम सांगा , आता राम राम बोला

सचिन कृष्णा तळे

Saturday, 2 January 2016

नक्षत्राचे चांदणे

नक्षत्राचे चांदणे तोडताना
पाहिले मला रातकळ्यांनी
सांगितले जाऊन राजसाला
बंदिवान करा ह्याला पानाफुलांनी

मी म्हणालो …
जा हट्ट ...
जावून सांग तुझ्या राजसाला
भय ना मला , ह्या तुझ्या काटेरी कुंपणाचा
मोह सुटला होता …
चंद्राभोवती लुकलुकणाऱ्या तारकांचा

हे राजसा …
न स्वयं प्रकाशी हे तारे
चोरिले ह्यांनी ही तेज त्या सुर्य घणाचे
चोरट्या पाऊलांनी येती हे अंधाऱ्या रात्री
पहाटे ला हळूच लपती
सोनेरी किरणांच्या पाटी

हे राजसा …
मी दोषी नाही तुमच्या , ह्या दैवी महालाचा
ब्रह्माने रचलेल्या अदभूत दुनियाचा
राजसा तुही पडशील मोहात या तारकांच्या
विसरशील तेव्हा पट राणीच्या प्रेम फुलांच्या पाकळ्या

चल राजसा …
ह्या चंद्राच्या कोरीवरून
थोडी तोडू नक्षत्राची चांदणी
चोरट्या पाऊलांनी जावू बाळ  ध्रुव करतोय राखणी
न पाहणार कोणी , न म्हणार कोणी दोषी
हे रात कळ्या निजल्या रे
पाना फुलांच्या कुशीत

सचिन कृष्णा तळे ( पुणे )


“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale