Tuesday, 30 September 2025

दसरा मेळावा : बाळासाहेबांच्या ज्वालामुखीचा इतिहास!

 दसरा मेळावा : बाळासाहेबांच्या ज्वालामुखीचा इतिहास! 🔥






दसरा म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणात एकच गोष्ट डोळ्यांसमोर उभी राहते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा!

शिवाजी पार्कवर उभा राहून बाळासाहेब बोलले की लाखोंच्या गर्दीत विजेचा पुरवटा पसरल्यासारखं वातावरण व्हायचं. त्यांची वाणी म्हणजे जणू गडगडणारा गड, त्यांच्या हातातील बोट म्हणजे जणू तलवारीची धार, आणि त्यांचं भाषण म्हणजे मराठी माणसाच्या हृदयात हिंदुत्वाचा गजर घडवणारा रणशिंग.

बाळासाहेबांचा दसरा मेळावा म्हणजे काय? फक्त एक सभा नव्हत तर मराठी अस्मितेचा जाहीरनामा होता. हिंदुत्वाच्या मशालीचा धगधगता झोत होता.महाराष्ट्रातील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात जिवंत झालेला अभिमान होता.

शिवाजी पार्कावरची गर्दी फक्त “लोकसभा” नव्हती, तर ती “शिवसभा” होती. हजारो लाखोंच्या गर्दीत उभं राहून बाळासाहेब म्हणायचे “मी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्यासाठी आहे, आणि तुमच्यामुळेच आहे!” ही वाक्यं ऐकली की मराठी तरुणाचं रक्त तापायचं, त्याच्या शिरांमध्ये धैर्य उसळायचं.

त्यांच्या भाषणात कोणत्याही स्क्रिप्टची गरज नसायची. ते डोळ्यांतून आग ओकत, शब्दांतून वज्राघात करत. त्यांनी कधीच कोणी कोणाचा अपमान केला नाही; पण त्यांनी नेहमी “मराठी माणूस” उभा केला, “हिंदुत्व” जगवलं. त्यांच्या प्रत्येक भाषणानंतर लाखो तरुण पुढच्या दिवसापासून रणांगणात उतरण्यास तयार व्हायचे.

आज परिस्थिती वेगळी आहे. आज दोन दसरा मेळावे भरतात. एक उद्धव ठाकरेंचा, दुसरा एकनाथ शिंदेंचा. दोन्हीकडं फक्त परस्परांची धुलाई, आरोप-प्रत्यारोपांचा बाजार, शिवराळीचा पाऊस. बाळासाहेबांच्या मेळाव्यात असलेली तोफेची गर्जना, सिंहाची दहाड, मशालीची ज्वाला या मेळाव्यांत कुठेही दिसत नाही.

बाळासाहेबांचा मेळावा का वेगळा होता ! कारण तो मराठी माणसासाठी होता. कारण तो हिंदुत्वाच्या लढ्यासाठी होता. कारण तो स्वाभिमानाच्या रणांगणासाठी होता. कारण तो एका व्यक्तीच्या खुर्चीसाठी नव्हता, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सन्मानासाठी होता.

आजचे मेळावे पाहिले की दु:ख वाटतं. शिवसेना म्हणजे एक विचारधारा होती, एक आंदोलन होतं, एक ज्योत होती. पण आज तीच शिवसेना दोन तुकड्यांत विभागली. जिथे कधी “जय महाराष्ट्र” चा घोष ऐकू यायचा, तिथं आज “तो बरोबर की हा बरोबर?” अशी कुजबुज चालते.

पण खरी गोष्ट काय आहे? आजही मराठी माणसाच्या हृदयात फक्त आणि फक्त बाळासाहेबांचा मेळावा धडधडतो. तो अजूनही आग आहे, ऊर्जा आहे, प्रेरणा आहे. तो अजूनही सांगतो

“मराठी माणूस एकत्र या, हिंदुत्वासाठी उभे रहा, अन्यायाला विरोध करा!”

बाळासाहेबांचा दसरा मेळावा हा केवळ राजकीय कार्यक्रम नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या आत्म्याचा उत्सव होता.

जिथे लाखो लोक जमून स्वतःला आठवण करून द्यायचे की आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीतले आहोत, आपण गड-किल्ल्याच्या मातीचे आहोत, आणि आपल्याला कुणीही डोळे दाखवू शकत नाही.

त्यांचा दसरा मेळावा आजही प्रत्येक मराठी माणसाच्या श्वासात, रक्तात, आणि हृदयात पेटलेला आहे.

🚩 जय हिंद, जय महाराष्ट्र!

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अमर राहो! 🚩

सचिन कृष्णा तळे ✍️🚩🙏

Monday, 29 September 2025

काबूल ते दिल्ली – जीव धोक्यात घालून आलेला १३ वर्षांचा मुलगा!

 ✈️ काबूल ते दिल्ली – जीव धोक्यात घालून आलेला १३ वर्षांचा मुलगा!



२१ सप्टेंबर २०२५ रोजी घडलेली ही घटना. अफगाणिस्तानातील कुंदूज येथील एका १३ वर्षीय मुलाने थेट केएएम एअरलाइन्सच्या विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून प्रवास केला आणि दिल्लीपर्यंत पोहोचला.

विमानतळावर सुरक्षारक्षकांना जेव्हा तो लहान मुलगा टायरजवळ सापडला, तेव्हा त्याच्या डोळ्यांत भीती, थकवा आणि एक प्रश्न होता “जगायचं तर एवढं कठीण का आहे?”

हा प्रवास केवळ धोकादायक नाही तर मृत्यूला आमंत्रण देणारा आहे. उंचावर ऑक्सिजनची तीव्र कमतरता, अत्यंत थंडी जी शरीर गोठवून टाकते, विमानाचे प्रचंड आवाज आणि धक्के, आणि लँडिंग गिअरच्या डब्यातील असुरक्षित जागा. या सगळ्यातून हा मुलगा जिवंत बाहेर पडला, हीच एक चमत्कारासारखी गोष्ट आहे.

ही घटना केवळ एका मुलाच्या धाडसाची नाही, तर त्याच्या परिस्थितीची वेदना सांगते. जेव्हा एखादा निरागस जीव आपला देश, आपले गाव, आपले आयुष्य मागे सोडून अशा मार्गाने निघतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की इस्लामिक युद्ध, दारिद्र्य आणि असुरक्षितता यांची किंमत मुलांना त्यांच्या बालपणाने चुकवावी लागते. 

शेवटी मुलाला परत अफगाणिस्तानात पाठवण्यात आले. पण प्रश्न कायम आहे. इतक्या धोकादायक प्रवासाला एखादा १३ वर्षांचा मुलगा का भाग पाडला जातो? की यामागील काही षडयंत्र आहे . काही घातपात ची शंका ? असा प्रवास करून कोणीही पुन्हा येऊ शकतं !  की ईस्लामिक दहशतवादखाली त्या भागात चालल आतंक 

माणसाला जगण्यासाठी सुरक्षित घर, अन्न आणि शिक्षण मिळणं इतकं कठीण का आहे?

ही घटना जगभरातील समाजाला एक संदेश देते आपण सुरक्षित आहोत, कारण आपण नशिबवान आहोत… पण लाखो मुलं अजूनही नशिबावर लढतायत. 🙏

Sachin Krishna Tale

✍️ #Afghanistan #HumanRights #Children #Kabul #Delhi #RefugeeCrisis

Thursday, 25 September 2025

दोन माकडं आणि तिसऱ्याचा स्वार्थ

 दोन माकडं आणि तिसऱ्याचा स्वार्थ 



लहानपणी आपण एक गोष्ट ऐकली होती दोन माकडं खीर वाटून घ्यायच्या भानगडीत भांडायला लागतात. कोणाला जास्त मिळालं, कोणाला कमी मिळालं यावरून ते रागावतात. आणि त्यांच्या भांडणात तिसरं माकड येतं, हसत-हसत ती सगळी खीर उचलून खातं आणि निघून जातं. जेव्हा दोन्ही माकडं थकून बसतात, तेव्हा त्यांना जाणवतं की खीरच संपली आहे, आणि आपलं नुकसान फक्त आपणच केलं आहे.

आजूबाजूला आपण नीट पाहिलं, तर ही गोष्ट केवळ गोष्ट नाही, तर सत्य आहे.

 • एक माणूस दुसऱ्या माणसाशी भांडतो.

 • एक भाषा दुसऱ्या भाषेशी भिडते.

 • एक विचार दुसऱ्या विचाराशी टकरावतो.

 • एक जात दुसऱ्या जातीशी संघर्ष करते.

 • एक धर्म दुसऱ्या धर्माशी भिडतो.

 • एक राज्य दुसऱ्या राज्याशी तुंबतो.

 • एक पक्ष दुसऱ्या पक्षाशी वैर धरतो.

 • एक सरकार दुसऱ्या सरकारशी दोन हात करते.

 • आणि अगदी एक देश दुसऱ्या देशाशी लढतो…

या सगळ्या भांडणांतून काय होतं?

आपण रक्त सांडतो. आपण एकमेकांचे वैरी होतो. आपले नाते, आपली एकता, आपला विश्वास तुटतो. आणि दरम्यान “तिसरा” मात्र गपचूप आपला स्वार्थ साधतो.

तो तिसरा कोण आहे?

कधी एखादा लोभी व्यापारी, कधी एखादा भ्रष्ट राजकारणी, कधी बाहेरचा शत्रू, कधी आपल्याच समाजातील संधीसाधू लोक.

आपण भांडण्यात गुंतलो असताना ते आपल्या श्रमांची, साधनांची आणि भावनांची खीर चाखून जातात.

आपण मात्र थकून, तुटून बसतो. आणि शेवटी जाणवतं की नुकसान फक्त आपलंच झालं.


म्हणूनच ..🙏🤝

आज थांबून विचार करायला हवा.

भांडणाच्या गदारोळात हरवून जायचं नाही.

भांडण थांबवायचं, समजून घ्यायचं, एकत्र उभं रहायचं.

नाहीतर प्रत्येक वेळी खीर कुणीतरी दुसराच लंपास करेल, आणि आपल्याकडे उरेल फक्त रिकामं भांड.

👉 अधिक लेखांसाठी भेट द्या : 👇🏻www.sachinktale.blogspot.com

✍️Sachin Jayshree Krishna Tale

आहे ते आहे

#sachintale

Thursday, 18 September 2025

मूर्ती विटंबना: जबाबदारी कोणाची?

 मूर्ती विटंबना: जबाबदारी कोणाची?

देशात असो वा राज्यात, दरवर्षी मूर्ती विटंबनेचे प्रकार कुठेना कुठे घडतच असतात. त्यानंतर समाजात पडसाद उमटतात, भावना पेटतात आणि काही वेळा दंगलसुद्धा घडवून आणली जाते. प्रत्येकवेळी आपण एकच गोष्ट पाहतो दोषारोपांची मालिका, राजकीय भाषणं आणि लोकांच्या भावनांचा उद्रेक. पण खरी गोष्ट अशी आहे की, जबाबदारी कोणाची हे आपण ठरवतो का?

माझं परखड मत असं आहे की ज्या व्यक्ती, संस्था किंवा सरकारने मूर्ती बसवली आहे, त्यांचीच तिच्या सुरक्षिततेची आणि देखभालीची पूर्ण जबाबदारी असली पाहिजे. फक्त मूर्ती उभारून फोटो काढणे, हार घालणे आणि नंतर तिला धुळ खात बसू देणे हे सर्रास दिसणारे वास्तव आहे.

आज अनेक पुतळे धुळीत माखलेले दिसतात. कुठे पुतळ्यावर पक्ष्यांची विष्ठा पडलेली असते, कुठे त्यावर माती, धूळ साचलेली असते. कुणाचं लक्ष जात नाही, आणि मग जेव्हा विटंबना घडते तेव्हा मात्र सगळ्यांना संताप येतो. प्रश्न असा आहे की दररोज तिची काळजी घेतली असती तर ही वेळ आली असती का?

उपाय काय?

1. सुरक्षितता: मूर्ती बसवताना तिच्या भोवती जाड काचेचं आवरण असावं. त्यामुळे थेट हात लावणं, रंग टाकणं किंवा नुकसान करणं अशक्य होईल.

2. नजरदारी: प्रत्येक महत्त्वाच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे असावेत. त्यामुळे विटंबना करणाऱ्यांचा शोध घेणं सोपं जाईल.

3. देखभाल: मूर्ती बसवली म्हणजे फक्त लोकार्पण सोहळा नव्हे, तर तिच्या स्वच्छतेची जबाबदारीही घ्यावी लागेल. वेळोवेळी स्वच्छता, रंगरंगोटी, आणि देखभाल केली गेली पाहिजे.

4. जबाबदारी निश्चिती: कोणती मूर्ती सरकारी आहे, कोणती खाजगी आहे, कोणती राजकीय पक्षाने बसवली आहे हे स्पष्ट असायला हवं. विटंबना झाली की ती जबाबदारी सरळ त्या संबंधितांनी उचलली पाहिजे.

मूर्ती ही फक्त धातू, दगड किंवा सिमेंटची नसते; ती समाजाच्या भावना, इतिहास आणि संस्कृतीचं प्रतीक असते. पण त्या प्रतीकाची सतत काळजी घेतली नाही, तर ती फक्त राजकारणाचं साधन बनते. म्हणूनच आता वेळ आली आहे की आपण परखडपणे सांगावं मूर्ती बसवली म्हणजे तिची देखभाल, सुरक्षितता, स्वच्छता ही बसवणाऱ्यांची जबाबदारी आहे. तेच झालं तर विटंबना कमी होईल, आणि झाल्यास त्याचं मूळ कारण शोधणं सोपं होईल.

Sachin Jayshree Krishna Tale ✍️

आहे ते आहे



Sunday, 14 September 2025

पाकिस्तानसोबत कोणतीही तडजोड नको!

 👉 माझ्या मते 🇮🇳

भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना झाला की केवळ खेळ नाही तर राजकारण, धर्मकारण आणि राष्ट्रवाद यावर चर्चेचा भोवरा सुरू होतो. पाकिस्तान हा आपला शेजारी असूनही नेहमी कटकारस्थानात गुंतलेला, दहशतवादाला प्रोत्साहन देणारा आणि आपल्या जवानांच्या रक्ताशी खेळ करणारा देश आहे हे जगजाहीर आहे.

मग प्रश्न असा आहे की अशा देशासोबत आपण खेळावं का? त्यांच्यासोबत व्यापार करावा का? सीमा ओलांडून सांस्कृतिक संबंध ठेवावेत का? माझ्या मते याला सरळ आणि ठाम उत्तर आहे नाही!

क्रिकेटच्या मैदानावर विजयाचा आनंद वेगळा, पण तो आनंद आपले सैनिक गमावून बसत असतील, देशाच्या सीमेवर रक्त सांडत असेल तर अशा सामन्याचा काही अर्थ उरत नाही. पाकिस्तान हा ‘मुस्लिम राष्ट्र’ म्हणून वेगळा नाही, तर तो आपल्या राष्ट्राचा जाहीर शत्रू म्हणून वेगळा आहे.

👉 म्हणूनच माझ्या मते पाकिस्तानसोबत कोणतीच तडजोड नको.

👉 व्यापार, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा सर्व बंद करा.

👉 राष्ट्रहिताला विरोधी असलेला कोणताही संबंध भारताने ठेवू नये.


देश प्रथम – बाकी सर्व नंतर! 🇮🇳

आहे ते आहे

Sachin Jayshree Krishna Tale

सचिन कृष्णा तळे 





#indiancricketteam #आहेतेआहे #pakistancricket #indian

Wednesday, 10 September 2025

भारताला डळमळीत पाहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ठाम विरोध!

 🔴 माझं मत 🔴

“भारताला डळमळीत पाहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ठाम विरोध!”

शेजारी राष्ट्रांमध्ये गेल्या काही वर्षांत आपण सतत अस्थिरता, सत्तापालट आणि जनआंदोलनं पाहतोय. श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि आता नेपाळ. या सगळ्यांमध्ये जनतेचा त्रास, अराजकता आणि राष्ट्राची दुर्दशा हेच दिसून येतं.


हे प्रसंग आपल्याला शिकवणारे आहेत, पण धोक्याचं मूळ बाहेर नाही… ते आत आहे. कारण खरी भीती या घटनांमध्ये नाही, तर त्या लोकांमध्ये आहे जे आपल्या भारतातही अशीच परिस्थिती व्हावी, असं स्वप्न पाहतात. जे लोक राष्ट्राच्या स्थैर्याला डळमळीत करण्यासाठी विषारी विचार करतात, तेच खरे घातक आहेत.

राष्ट्र म्हणजे फक्त सत्ता नाही, राष्ट्र म्हणजे संस्कृती, परंपरा, कुटुंब आणि आपली अस्मिता. या सगळ्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. बाहेरचं संकट आपण सहज पेलू शकतो, पण आतून फुट पाडणाऱ्यांच्या राक्षसी वृत्तीचा मुकाबला केला नाही तर आपली वाटचाल धोक्यात येईल.

म्हणूनच —

👉 विचारांनी भारताला अस्थिर करू पाहणाऱ्यांना स्पष्ट विरोध केला पाहिजे.

👉 एकतेचं, स्थैर्याचं आणि लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी सजग राहणं गरजेचं आहे.

भारताला अशा विषारी इच्छांची गरज नाही. भारताला लागतो तो प्रगतीचा विचार, लोकांच्या कल्याणाचा विचार आणि एकतेचा विचार.

🇮🇳 भारत स्थिर आहे, भारत समर्थ आहे… आणि भारताला कोणीही डळमळीत करू शकत नाही!

✍️ Sachin Jayshree Krishna Tale

आहे ते आहे

Monday, 8 September 2025

“धर्म, सत्य व न्यायाच्या बाजूने उभा राहणारा तोच खरा योग्य माणूस आहे” – श्रीकृष्ण.

 माझ्या मते ✍️



जी व्यक्ती धर्म, सत्य व न्यायाच्या बाजूने आहे केवळ तीच व्यक्ती योग्य आहे असे श्रीकृष्णाने सांगितले आहे. महाभारत काळापासून आजपर्यंत युद्धात ज्याप्रमाणे कपट होते त्याला सरळमार्गाने उत्तर देता येत नाही. अशावेळी जशास तसेच उत्तर द्यावे लागते. नाठाळाच्या माथी काठीच हाणावी लागते. कपटी माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिले तरच तो वठणीवर येतो. यासाठी कृष्णनीतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. 

श्री कृष्ण म्हणतात .. युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वीच हे ओळखणे गरजेचे असते की मित्र कोण व शत्रू कोण आहे. जो मित्राचे सोंग घेऊन द्रोह करतो त्याला ओळखणे आवश्यक आहे. 

मित्राचा चेहरा लावून मैत्री दाखवणारे ओळखा . सर्वधर्मसमभाव हे काल्पनिक आहे !

आहे ते आहे

Sachin Jayshree Krishna Tale ✍️v

Thursday, 4 September 2025

ग्रामीण भागातील शिक्षण व डिजिटल दरी

 ✍️ माझं मत : ग्रामीण भागातील शिक्षण व डिजिटल दरी




आजच्या काळात शिक्षण म्हणजे फक्त वर्गातला पाटीवरचा धडा राहिलेला नाही. तंत्रज्ञान, मोबाईल, इंटरनेट, ऑनलाइन क्लासेस, ई-लायब्ररी, व्हिडिओ लेक्चर्स हे सर्व मिळूनच शिक्षण पूर्ण होतं. पण प्रश्न असा आहे की, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळते का?

शहरातल्या मुलांकडे स्मार्टफोन, वाय-फाय, टॅबलेट सहज उपलब्ध आहेत. पण गावातल्या शाळांमध्ये अजूनही नेटवर्क नसतं, संगणक अपुरे आहेत, आणि शिक्षकांनाही डिजिटल साधनांचं प्रशिक्षण नाही. त्यामुळे गावातला विद्यार्थी कितीही हुशार असला तरी तो स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा नोकरीच्या तयारीत मागे पडतो.

कोविड काळात हे सर्वात जास्त प्रकर्षाने जाणवलं. शहरातले विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत होते, तर गावातले अनेक विद्यार्थी मोबाईल नसल्यामुळे किंवा इंटरनेट नसल्यामुळे धड शिकूच शकले नाहीत. हीच खरी डिजिटल दरी आहे.

माझं मत असं आहे की –

 • ग्रामीण भागात शिक्षणाचं डिजिटलायझेशन तातडीने करायला हवं.

 • शाळांना मोफत इंटरनेट, संगणक आणि स्मार्ट क्लासरूमची सुविधा द्यायला हवी.

 • प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासासाठी मोफत टॅबलेट किंवा मोबाईल मिळायला हवा.

 • शिक्षकांना डिजिटल शिक्षणाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे.

आज जर आपण ही दरी कमी केली नाही, तर उद्या ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांमध्ये एवढी तफावत निर्माण होईल की, गावातील मुलांचं भविष्य कायमच शहराच्या मागे राहील.

Sachin Jayshree Krishna Tale

@highlight

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale