Tuesday, 6 February 2018

हा स्पर्श तुझा ...

हा स्पर्श तुझा ...

हा स्पर्श तुझा सांगून जातो काही
बिलगून अंगाशी फुलवून जातो काही

ही हवा प्रेमाची, ही नशा प्रीतीची
बोलके नाते एक, जुळवून जातो काही
 
हा स्पर्श तुझा ..

जणू पावसाची धारा, अन धुंद वारा
हरवून मला, तुझ्यात रंगवून जातो काही

देई भास आस पास, तुझीच प्यास
अधीर ह्या मनास, फसवून जातो काही

हा स्पर्श तुझा ...

त्या तारुण्याची , देई विश्वासाची ग्वाही
जणू रेशीम गाठी , बांधून जातो काही

त्या शब्दांची, आपल्या त्या वचनांची
अंतरे संगीतातून, मिसळून जातो काही

हा स्पर्श तुझा ...

आठवावे अन साठवावे काळजात
विरहात एकांतात, रडवून जातो काही

हा स्पर्श तुझा सांगून जातो काही
बिलगून अंगाशी ,फुलवून जातो काही


सचिन कृष्णा तळे








Friday, 2 February 2018

कवीच्या दारात आज

गज़लेचा प्रांत वेगळा
कवितांचा प्रांत वेगळा

कवीच्या दारात आज
दोघांचा ग्रंथ वेगळा

शब्दांची जादू एकचं
स्वरांचा अंत वेगळा

काफिला अन यमक
श्वासांचा बंध वेगळा

सचिन तळे

Thursday, 1 February 2018

ईतकचं काय ते माझं विश्व ...

आणि ...
शेवटी तो मावळला
लाल बुंध होऊन ...
त्या विशाल अश्या सागरात
व माझी वाट सुसाट सुटली
मानवी यंत्राच्या सोबत
गजबजलेल्या त्या शहरातून
माणसांच्या गर्दितून
त्या घरट्याकडे
ज्या घरट्यात
माझी पिल्ले
माझी नाती
दारावर नजर
फक्त माझ्या साठी
वाट पाहत आहे
मी.. येण्याची
आणि मी ही
आतूर ..
त्या कोवळ्या स्पर्शासाठी
माझ्या अंशासाठी
माझ्या मुली साठी
माझ बालपन पुन्हा अनुभवण्यासाठी...
मी आणि माझ घरट
माझ सुख व दुख..
ईतकचं काय ते माझं विश्व ...

सचिन तळे  - पुणे



“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale