मला राजवैभवाची इच्छा नाही, न स्वर्गाची, न पुनर्जन्माची. मला फक्त इच्छा आहे ती काहीतरी नवीन करण्याची ...कारण मी काहीतरी घडऊ शकतो हे मला माहित आहे.... जय हिंद जय महाराष्ट्र !!
Thursday, 31 October 2019
Wednesday, 30 October 2019
बापासमोर बाप होऊन बघा
ज्या वेळी आपण वयात येतो तेव्हा आपले आई वडील आणि वडीलधारे माणसं आपल्याला जे सांगत असतात ते आपण कधीच ऐकत नाही ,लक्ष देत नाही किंवा त्यावर विचार करत नाही . कारण ते वयचं तस असतं. त्या वयात जवाबदारी म्हणजे नक्की काय हे समजण थोडस अवघड जात,कारण आपल्या पाठीशी बाप नावाचा एक वटवृक्ष खंबीर उभा असतो. जेव्हा ते छत्र हरवरून जात तेव्हा आणि जेव्हा परिवार सांभाळण्याची जवाबदारी अंगावर येते तेव्हा येणारे आव्हान हे खूप शिकण्यासारखे आणि स्वतःला सिद्ध करण्यासारखे आणि न विसरणारे अनुभव असतात.
ह्या नोव्हेंबर मध्ये माझ्या वडिलांना जाऊन ६ वर्ष होतील तरीही त्यांची कमी आज हि भासतीय. माझ्या वडिलांचा हा अचानक निरोप आणि त्याच महिन्यात बहिणीचं लग्न आणि माझी पुण्यातील नोकरी सांभाळणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होत. माझं संपूर्ण परिवार मुंबईत आणि मी पुण्यात होतो . लग्नाचे घर म्हणजे आनंदी वातावरण त्यात हे आभाळ कोसळलं. मंदीचा काळ सुरु होता. नोकरी टिकवणे गरजेचं होत. माझ्या आणि माझ्या आईसमोर खूप प्रश्न उभे राहिले. घर सावरून बहिणीचं लग्न पार पाडण्यासाठी नोकरी सोडावी लागली. हातावर पोट भरणार आमचं घर ,कोणाचा हि आर्थिक हात पाठीशी नव्हता. जेव्हा हातपाय चालवू तेव्हा भाकरी. फक्त प्रयत्न आणि धडपड होती. घरातलं ते पहिलं लग्न, ना मला ना माझ्या आईला अनुभव फक्त पाठीशी देव होता असं म्हणावं लागेल. लग्नाचे दिवस जवळ येत होते , पत्रिकेवर वडिलांच्या नावापुढे श्री हे नाव खोडून कै लावताण काळीज रडत होत. पत्रिका वाटली जमेल तस नाती जपली. लग्न कसबस पार पडलं थोड्या चुका झाल्या कारण माझ आभाळ माझ्या मदतीस नव्हता. बाहिनेने उंबरटा ओलांडला आणि सासरी गेली , पाहुणे आपापल्या घरी गेले , राहिले होतो फक्त मी माझी आई आणि तो काळ आणि काही आठवणी. त्या प्रत्येक क्षणाक्षणाला बाप नावाची कमतरता आणि बापाच्या जागेवर स्वतःला उभा करत होतो.
पुढे तिथून नोकरी चा शोध सुरु झाला , सहा सात महिने नोकरीच्या शोधात होतो . जवाबदारी वाढली होती. घरात पैश्याची कमतरता भासू लागली. मुंबई हुन पुण्यात सगळं घर उचलून आणलं होत. त्यातच पुन्हा मुंबईत नोकरी मिळाली . पुन्हा मुंबईत भाड्यावर घर पाहिलं आणि घर शिफ्ट करणार तेवढ्यात पुण्यात नोकरी मिळाली. मुंबईतून पुण्यात स्थलांतर झालो. दिवस गेले आणि त्याच दिवसात मी पुन्हा उभा राहिलो एक बाप म्हणून .
आज बाप आणि त्याची भूमिका पार पडताना जवाबदारी कळू लागली. वडिलांचे ते शब्द आठवू लागले. त्यांची भूमिका समजू लागली. घरात कर्ता कमवता पुरुष जातो तेव्हा त्या घरात काय दिवस असतात हे समजू लागलं.
ह्याच संकटांमुळे आणि स्थलांतर मुळे राजकीय आणि सामाजिक कार्य थांबवावे लागले. जिथे आपण लहानाचे मोठे होतो कार्य करतो स्थानिक होतो तिथे कार्य करणे, स्वतःची ओळख निर्माण करणे फार सोपं जात. पण जेव्हा आपण दुसऱ्या ठिकाणी जातो तिथे राहतो वास्तव करतो तेव्हा तिथे स्थानिक होऊन पुन्हा कार्यास प्रारंभ करणे फार अवघड जात.
वृत्तपत्रात माझ्या प्रत्येक कार्याची
दाखल घेतली जात होती, कारण माझा एक परिवार तयार होता आणि तसाच एक परिवार इथे तयार करणे
तिथे घेतलेली मेहनत पुन्हा इथे नव्याने करणे हे माझ्या साठी पुन्हा एक मोठं आव्हान
आहे. शून्यातून पुन्हा सुरुवात. खरतर वडिलांचे ते राजकीय आणि सामाजिक विचारांवर मी पुन्हा स्वतःची ओळख निर्माण करतोय आणि धडपडतोय. घर सांभाळत स्वतःची लेखणी चालू ठेवत भोवताली असणार राजकीय सामाजिक वातावरणचा अभ्यास करत आणि नाती मैत्री धरून नोकरी च्या मदतीने घडण्याचा प्रयन्त करतोय शिकतोय.
हे आव्हान आणि त्यावर मात करण्यासाठी माझी आई आणि एक मावस भाऊ आणि काही माणसं मला सोबती मिळाली. त्यानंतर हि बरीच छोटी मोठी आव्हाने आली . खुप वेळा एकटा पडलो .
आज समाजात सामाजिक कार्यरता म्हणून
, लेखक म्हणून , कवी गीतकार म्हणून तर एक राजकीय व्यक्ती म्हणून माझी ओळख असली तरी
त्यासोबत मी एक बाप म्हणून माझी भूमिका पार पडण्याचा पर्यंत करतोय. वेळ काळ कधीच सांगून येत नाही त्यासाठी स्वतःहून खंबीर उभं राहणे खूप गरजेचं आहे. आणि त्याहून जास्त गरजेचं आहे ते तरुण वयात मित्रांमध्ये वेळ न घालवता बापासमोर बाप होऊन बघा तुमच्यात खूप मोठा फरक जाणवले.
सचिन कृष्णा तळे
कात्रज पुणे
७७०९०९९६४६
Tuesday, 22 October 2019
हो एक राजकीय इतिहास घडतोय ...!!
हो
एक राजकीय इतिहास घडतोय ...!!
महाराष्ट्राच्या
राजकारण एक हाती सत्ता
मिळवणे हे कोणत्याच राजकीय
पक्षाला सोपे नाही. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हा दुसरे मोठे
राज्य आहे आणि क्षेत्रफळाने हि सर्वात मोठा
आहे. शासकीय आकडेवारीनुसार ११ कोटी जनता
( त्यात इतर राज्यातून स्थलांतर होणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे त्याची आकडेवारी मिळून हि शासकीय आकडेवारी
अधिक होऊ शकते) असणारा हा प्रदेश अनेक
धर्माना जातींना भाषांना आणि अनेक विचारवंत तसेच मोठ्या नेत्यांच्या विचाराने प्रभावित आहे. त्यामुळे राज्य करणे राज्य सुरळीत चालवणे हे प्रत्येक राजकीय
पक्षापुढे आव्हान आहे. आघाडी सरकारच्या काळात वारंवार घडणाऱ्या घटना पाहून जनतेने भाजप युतीला सरकार स्थापन करण्याचा जनादेश दिला आणि त्यांनी तो कार्यकाळ पूर्ण
केला. तेच आव्हान स्वीकारत युती पुन्हा सत्तेवर येईल.
मित्र
पक्ष , युती, आघाडी म्हणजेच इतर पक्षाच्या साह्याने सरकार स्थापन करून राज्य चालवने हे प्रत्येक राजकीय
पक्षाला भाग आहे. देशात भाजप एक हाती सत्ता
घेऊन आली तेच चित्र महाराष्ट्रात भाजप घेईल असे वाटत असताना शिवसेना त्याला पूरक ठरेल. महाराष्ट्राच्या राजकारणात राज्याचे तिसरे मुख्यमंत्री आणि सर्वाधिक काळ राज्याचे कारभार सांभाळणारे यवतमाळचे जिल्ह्यातले स्वर्गीय वसंतराव नाईक ह्याच्या इतिहासा नंतर राज्याचे १८ वे विद्यमान
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे राज्याचे सर्वाधिक
कारभार सांभाळणारे दुसरे तरुण मुख्यमंत्री असतील. बलाढ्य विरोधक समोर असताना अचूक राजकीय खेळ खेळत फडवणीस हा मान पटकवण्यात
यश्यस्वी ठरतील. स्वपक्षात आपल्यापेक्षा कोणी वरचढ होऊ नये आणि मुख्यमंत्री पदासाठी दावेदार ठरू नये ह्याची हि दक्षता फडवणीस
ह्यांनी घेतलेली दिसतीय. पक्ष श्रेष्टी च्या मंडळातून सहज ती नावे गाळली
गेली जी मुख्यमंत्री पदासाठी
बंड करू शकतील. राज्यात आमदारांची एक अशी फळी
निर्माण केली जी फडवणीस ह्या
शब्दावर कार्य करतील. शिवसेनेच्या ५० - ५० प्रस्तावाला मात
करत सेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करत फडवणीस हे राज्यात राजकीय
इतिहास घडवत आहे. त्यात गेल्या पाच वर्षात फडवणीस सरकार च्या विरोधात अनेक राजकीय नेत्यांनी आवाज उचलण्याचा प्रयत्न केला.कोणी त्यांच्या पत्नीवरून ट्रॉल केले तर कोणी त्यांच्या
शाररिक बांधणीवर तर कोणी त्यांना
ब्राह्मण आहेत म्हणून तर कोणी वेगळ्या
विदर्भा वरून ट्रॉल केले. ते
सारे आवाज बंद करत विरोधी पक्षातच सुरुंग लावून विरोधी नेत्यांना पळताभूईत करत फडवणीस यशाच्या रथावर विराजमान आहेत. हे
यश लोकशाहीच्या दृष्टीने चांगले आहे कि नाही हे
येणारा काळ ठरवेल पण एक गोष्ट
मात्र जनतेने डोक्यात ठाम मांडून ठेवावी , ती म्हणजे ... जर
विरोधक संपला तर सत्तेवर असणाऱ्या
सत्ताधारी पक्षाला सत्तेचा माज चढू शकतो आणि त्या हवेत सत्ताधारी पक्ष वाटेल ते निर्णय घेऊ
शकतात. त्यामुळे ह्या राजकीय युद्धात राज्यात एक असा विरोधी
पक्ष हवा जो विधानसभेत सभापती
समोर खणखर पुरावे सहित विरोध करू शकेल.
वयाच्या
३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री होते त्यानंतर फडवणीस ह्यांचा नंबर लागतो. राजकीय वारसा लाभलेले देवेंद्र फडवणीस हे भारतीय जनता
युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष ते महापालिका सदस्य
ते महापौर ते आमदार होऊन
राज्याचे मुख्यमंत्री झाले. स्थानिक पक्ष कार्यलयातून थेट विधानसभेवर
चालून जाणारे फडवणीस स्थानिक पातळीवर चालणारे राजकारण चांगल्या प्रकारे जाणून आहेत. विरोधकांचे शाब्दिक वॉर चालू असताना प्रचंड मताने हे सरकार जिंकून
येते हे आश्चर्यकारक आहेच
पण ए व्ही म
वर शंकेचं बोट देखील आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ह्या राजकीय इतिहासात हा विजय लोकशाहीचा
आहे कि ए व्ही
मी चा हे सरकारच
सांगू शकते.
सचिन
कृष्णा तळे
७७०९०९९६४६
पुणे
कात्रज
Subscribe to:
Posts (Atom)
“कलियुग सुरू आहे!”
“कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale
-
फाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहासफाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहास पाकिस्तानातील मुल्तानमध्ये आजही उभा असल...
-
महाराष्ट्र साहित्य सभा , इंदूर पुण्य श्लोक पहिले बाजीराव यांनी उत्तरदिग्विजय केल्यानंतर मल्हारराव होळकर माळव्याचे सु...
-
🔴 माझं मत 🔴 “भारताला डळमळीत पाहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ठाम विरोध!” शेजारी राष्ट्रांमध्ये गेल्या काही वर्षांत आपण सतत अस्थिरता, सत्तापा...




