Tuesday, 22 October 2019

हो एक राजकीय इतिहास घडतोय ...!!


हो एक राजकीय इतिहास घडतोय ...!!

महाराष्ट्राच्या राजकारण एक हाती सत्ता मिळवणे हे कोणत्याच राजकीय पक्षाला सोपे नाही. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हा दुसरे मोठे राज्य आहे आणि क्षेत्रफळाने हि सर्वात मोठा आहे. शासकीय आकडेवारीनुसार ११ कोटी जनता ( त्यात इतर राज्यातून स्थलांतर होणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे त्याची आकडेवारी मिळून हि शासकीय आकडेवारी अधिक होऊ शकते) असणारा हा प्रदेश अनेक धर्माना जातींना भाषांना आणि अनेक विचारवंत तसेच मोठ्या नेत्यांच्या विचाराने प्रभावित आहे. त्यामुळे राज्य करणे राज्य सुरळीत चालवणे हे प्रत्येक राजकीय पक्षापुढे आव्हान आहे. आघाडी सरकारच्या काळात वारंवार घडणाऱ्या घटना पाहून जनतेने भाजप युतीला सरकार स्थापन करण्याचा जनादेश दिला आणि त्यांनी तो कार्यकाळ पूर्ण केला. तेच आव्हान स्वीकारत युती पुन्हा सत्तेवर येईल.

मित्र पक्ष , युती, आघाडी म्हणजेच इतर पक्षाच्या साह्याने सरकार स्थापन करून राज्य चालवने हे प्रत्येक राजकीय पक्षाला भाग आहे. देशात भाजप एक हाती सत्ता घेऊन आली तेच चित्र महाराष्ट्रात भाजप घेईल असे वाटत असताना शिवसेना त्याला पूरक ठरेल. महाराष्ट्राच्या राजकारणात राज्याचे तिसरे मुख्यमंत्री आणि सर्वाधिक काळ राज्याचे कारभार सांभाळणारे यवतमाळचे जिल्ह्यातले स्वर्गीय वसंतराव नाईक ह्याच्या इतिहासा नंतर राज्याचे १८ वे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे राज्याचे सर्वाधिक कारभार सांभाळणारे दुसरे तरुण मुख्यमंत्री असतील. बलाढ्य विरोधक समोर असताना अचूक राजकीय खेळ खेळत फडवणीस हा मान पटकवण्यात यश्यस्वी ठरतील. स्वपक्षात आपल्यापेक्षा कोणी वरचढ होऊ नये आणि मुख्यमंत्री पदासाठी दावेदार ठरू नये ह्याची हि दक्षता फडवणीस ह्यांनी घेतलेली दिसतीय. पक्ष श्रेष्टी च्या मंडळातून सहज ती नावे गाळली गेली जी मुख्यमंत्री पदासाठी बंड करू शकतील. राज्यात आमदारांची एक अशी फळी निर्माण केली जी फडवणीस ह्या शब्दावर कार्य करतील. शिवसेनेच्या ५० - ५० प्रस्तावाला मात करत सेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करत फडवणीस हे राज्यात राजकीय इतिहास घडवत आहे. त्यात गेल्या पाच वर्षात फडवणीस सरकार च्या विरोधात अनेक राजकीय नेत्यांनी आवाज उचलण्याचा प्रयत्न केला.कोणी त्यांच्या पत्नीवरून ट्रॉल केले तर कोणी त्यांच्या शाररिक बांधणीवर तर कोणी त्यांना ब्राह्मण आहेत म्हणून तर कोणी वेगळ्या विदर्भा वरून ट्रॉल केले.  ते सारे आवाज बंद करत विरोधी पक्षातच सुरुंग लावून विरोधी नेत्यांना पळताभूईत करत फडवणीस यशाच्या रथावर विराजमान आहेत.  हे यश लोकशाहीच्या दृष्टीने चांगले आहे कि नाही हे येणारा काळ ठरवेल पण एक गोष्ट मात्र जनतेने डोक्यात ठाम मांडून ठेवावी , ती म्हणजे ... जर विरोधक संपला तर सत्तेवर असणाऱ्या सत्ताधारी पक्षाला सत्तेचा माज चढू शकतो आणि त्या हवेत सत्ताधारी पक्ष वाटेल ते निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे ह्या राजकीय युद्धात राज्यात एक असा विरोधी पक्ष हवा जो विधानसभेत सभापती समोर खणखर पुरावे सहित विरोध करू शकेल.

वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री होते त्यानंतर फडवणीस ह्यांचा नंबर लागतो. राजकीय वारसा लाभलेले देवेंद्र फडवणीस हे भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष ते महापालिका सदस्य ते महापौर ते आमदार होऊन राज्याचे मुख्यमंत्री झाले. स्थानिक पक्ष कार्यलयातून थेट  विधानसभेवर चालून जाणारे फडवणीस स्थानिक पातळीवर चालणारे राजकारण चांगल्या प्रकारे जाणून आहेत. विरोधकांचे शाब्दिक वॉर चालू असताना प्रचंड मताने हे सरकार जिंकून येते हे आश्चर्यकारक आहेच पण व्ही वर शंकेचं बोट देखील आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ह्या राजकीय इतिहासात हा विजय लोकशाहीचा आहे कि व्ही मी चा हे सरकारच सांगू शकते.

सचिन कृष्णा तळे
७७०९०९९६४६
पुणे कात्रज

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale