Sunday, 17 July 2016

इतिहासाचे सैन्य तुम्ही

इतिहासाचे सैन्य तुम्ही

दैत आले पाक सारे  या हिंदवी रणांगणी
चला उठा तलवारीशी शिवाचे सैन्य तुम्ही

पहा तेव्हा झाली होती फाळणी देशाची
भारतियांनो ! हाय त्याच देशाचे सैन्य तुम्ही 

घरातल्या सर्पाची छाटू चल ती  विष जिभा
क्रांतीच्या ज्वालांनी हिंदुत्वाचे सैन्य तुम्ही

सिंधूलेक हो कंबर कसा सोडून पदर लाजेचा
जिजाउच्या लेकी व्हा झाशीचे सैन्य तुम्ही

पाकव्यापी श्वान आले चोरण्या काश्मीर तुझे
स्वारी द्या स्वारी घ्या या युद्धाचे सैन्य तुम्ही

काश्मीर ते कुमारी अखंड भारत जय हो
आर्यबंधू नटा सदा या संस्कृतीचे सैन्य तुम्ही

आतंकवाद धर्म कोणता शोधू नका ही उत्तरे
वीर शोधा देश रक्षणा भारताचे सैन्य तुम्ही 

देशभक्तीचे गीत गाता मार्तुभुला लीन होता
चल गड्या देशासाठी इतिहासाचे सैन्य तुम्ही  

सचिन तळे 
July 2016 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale