Wednesday, 27 July 2022

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय

 



वाचनाने समाजाची उन्नती होऊन सुसंस्कृतात सृजनशीलता वाढीस लागतात. देशाची संपन्नता हि त्या देशाच्या उत्पदनावर अन निर्यातीवर मोजली जाते परंतु देशातील समाजाच्या उन्नतीचे मोजमाप मात्र समाजाच्या सुसंस्कृतात सृजनशीलता याच गोष्टीवर केले जाते त्यासाठी वाचन चळवळ हि खूप महत्वाची आहे ह्याची जाणीव मुकुंद बाळकृष्ण गुर्जर, नरहर महादेव जोशी, श्रीधर बाळाजी मोडक, अनंत नीळकंठ पिठकर, विनायक बळवंत जोशी, नारायण कृष्ण गद्रे, शंकर हरी शेजवलकर, नारायण महादेव बाक्रे, विठ्ठल वासुदेव टिल्लू, गणेश लक्ष्मण पागे, अंबादास गोपाल पुणतांबेकर ह्यांना झाली आणि ऑगस्ट १८९८ रोजी नारळीपौर्णिमेच्या मुहूर्तावर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना झाली.

 

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय संस्थेच्या नायगाव, दादर येथील मध्यवर्ती ग्रंथालय कार्यालयाच्या वास्तुचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते दि. १० मार्च १९५९ रोजी झाले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे संदर्भग्रंथालय आहे. महाराष्ट्रातील शतायू म्हणजे शंभर वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ग्रंथालयांपैकी हे एक ग्रंथालय आहे. मुंबईभर ह्या संस्थेच्या ३१ विभागीय शाखा कार्यरत आहेत. तसेच ह्या संस्थेच्या संलग्न संस्थांपैकी इतिहास संशोधन मंडळ, मराठी संशोधन मंडळ ह्या दोन महत्त्वाच्या संस्था आहेत. ह्या संस्थांच्या तिमाही संशोधन पत्रिका प्रसिद्ध होत असतात. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दाते सूचिमंडळाद्वारे मराठी नियतकालिकांच्या सूचींचे खंड प्रकाशित करण्यात आले आहेत. संस्थेच्या संदर्भग्रंथालयात दोन लाखांवर ग्रंथसंपदा, दैनिके साप्ताहिकांची लेखसूची, मासिकांतील लेखसूची, संदर्भमंजूषा तसेच दुर्मिळ १२००० ग्रंथ आणि ८८९ दोलामुद्रिते ह्यांचा समावेश आहे.

 

सानेगुरुजी बालविकास मंदिर हि संस्थेची संलग्न शाखा बालक विकासाची कामे करीत आहेत. महाराष्ट्र प्रबोधन शाखे तर्फे विविध शैक्षणिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजन केले जातात. ह्या संस्थेच्या अध्यक्ष पदी शरद पवार आहेत तसेच खासदार सुप्रिया सुळे ह्या विश्वस्थ पदी कार्यरत आहेत. महाराष्ट्रात, मोठा पसारा आणि बहुआयामी कार्य असणारे एकमेव ग्रंथालय म्हणजे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयच आहे. ही संस्था केवळ ग्रंथालय नाही तर मराठी भाषा, वाङ्मय आणि मराठी संस्कृती या विषयातले हे विशेष ग्रंथालय तर आहेच; परंतु मराठी भाषा, वाङ्मय आणि संस्कृती या क्षेत्रात या संस्थेचे मोलाचे योगदान आहे. व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम सर्व ग्रंथालये करीत असतात; मात्र मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नुसते कार्यक्रम करून थांबले नाही, तर व्यासपीठीय साहित्य चिरकाल टिकावे, यासाठी १९४६ साली प्रकाशन विभाग सुरू केला आणि त्यातून अनेक व्याख्याने पुस्तिका/पुस्तकांच्या स्वरूपात प्रकाशित करून अभ्यासकांची सोय केली. त्यासाठी प्रबोधन शाखा स्थापन केली. नाट्यकला इतर सांस्कृतिक स्पर्धांसाठी कलाशाखाही स्थापन केली. त्यातर्फे नाट्यस्पर्धा, नाट्यमहोत्सवही घेतले. ज्ञानेश्वरीचे शब्द भांडार, ज्ञानदेव सूची, अमृतानुभवाचा पदसंदर्भ कोश, मराठी वाङ्मयकोश, 'छंद'ची सूची, शब्दसूची-चरणसूची अशा कितीतरी महत्त्वाच्या कोशांच्या निर्मितीची जन्मभूमी असणारे हे संग्रहालय महाराष्ट्राचा मानबिंदू आहे.

 

सचिन कृष्णा तळे

 

Tuesday, 19 July 2022

पुणे मराठी ग्रंथालय

 


पुणे मराठी ग्रंथालय

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीगाव तेथे ग्रंथालय' असावे, असे मत व्यक्त केले होते. शंभर वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली महाराष्ट्रात तब्बल ८३ ग्रंथालये आहेत, तर इतर सुमारे हजारांहून अधिक शासनमान्य ग्रंथालये आहेत. राज्यात एकूण १२,८६१ ग्रंथालये आहेत. यापैकी नारायण पेठेतील पुणे मराठी ग्रंथालय हि १११ वर्षे जुने आहे. प्रख्यात लेखक वकील एन.सी. केळकर आणि नानासाहेब पौगी यांनी दोन ऑक्टोबर १९११ रोजी स्थापन केलेल्या या ग्रंथालयाचे उद्घाटन विजयादशमीला करण्यात आले.

 

१९७५ ते १९८० या काळात ग्रंथालयाच्या पदाधिका-यांनी हळूहळू परिसर वाढवला आणि त्याचे क्षेत्र २५ हजार चौरस फुटांपर्यंत नेले. त्यानंतर नूतनीकरण झालेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर राजघराण्यातील सदस्य विजयाराजे शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. .पी.जे. अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी, मोहन भागवत, पु.. देशपांडे आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांसारख्या अनेक नामवंत व्यक्तींनी या वास्तूला भेट दिली. ग्रंथालयात सध्या . लाख पुस्तकांचा संग्रह आहे. त्यातील बहुतेक मराठी काही इंग्रजी भाषेत आहेत. १९३० पासून प्रसिद्ध झालेली सर्व मराठी मासिकेही ग्रंथालयात पाहायला मिळतात.

 

सावरकर जयंती, स्वातंत्र्यदिन ग्रंथालयाचा स्थापना दिन यांसारखे उत्सव आणि पुरस्कार सोहळे आयोजित केले  जातात. दिवाळी, गणेशोत्सव आणि रक्षाबंधनावेळी मुलांसाठी कार्यशाळांचे आयोजन, तसेच उन्हाळ्यात मुलांना चित्रपट दाखवले जातात. मुलांसाठी  मुक्तांगण बालवचन आहे तिथे पुस्तके, मासिके, शैक्षणिक व्हिडिओ सीडी आणि संगणक संच आहेत. १९७० मध्ये सुरू झालेल्या अभ्यासिका विभागात सुमारे ४०० विद्यार्थ्यांच्या आसन क्षमतेसह चार वाचन कक्ष आहेत. या ग्रंथालयातर्फे युवा वाचकांसाठी एक अनोखा उपक्रम राबवला जातो. त्यात ४० स्वयंसेवकांना प्रत्येक उन्हाळ्यात २०० पुस्तकांचा एक संच दिला जातो. त्यांनी त्यांच्या भागात घरातूनच प्रादेशिक ग्रंथालय सुरू करायचे आणि वाचन चळवळीला प्रोत्साहन द्यायचे, असा हा उपक्रम आहे. किर्लोस्करचे आतापर्यंतचे सर्व अंक घेऊन वाचनालयाने त्याच्या १००० व्या आवृत्तीचाही समारंभ साजरा केला होता.ग्रंथालयातील पुस्तके लेखक आणि पुस्तकाच्या प्रकारानुसार ठेवली गेली आहेत. इथली सर्व यंत्रणा संगणकीकृत आहे. त्यावर रोमन किंवा देवनागरी लिपीत वाचकांना पुस्तकांची उपलब्धता तपासता येते. ग्रंथालय आता काही पुस्तके डिजिटल करण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

सचिन कृष्णा तळे

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale