Friday, 31 December 2021

कार्यकर्त्यांनो ... तुमच्या तारुण्यातून हा देश घडला पाहिजे.

 


हिवाळा (शिशिर ऋतू) सुरू झाला की वातारणातील तापमाण कमी होत आणि वृक्षांची वाढ मंदावते अन पानगळी दिसून येते. पानाफुलांनी बहरलेलं झाड अचानक आपल्याला कमजोर दिसू लागतं. त्या झाडाच्या अस्तित्वावर आपण प्रशचिन्ह उपस्थित करतो. ह्याचा अर्थ असा नसतो कि आता झाड पूर्णपणे सुकलं आहे त्याला पालवी फुटणार नाही ते पुन्हा बहरणार नाही. मुळात आपण इथेच फसतो. जे दिसत तस नसतं. पण ह्याच पानगळीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अन्नद्रव्यांची साठवण आणि वसंत ऋतूमध्ये सुरू होणा-या फुलांचा बहर आणि फळधारणा हा आहे. ते पुन्हा बहरत, पुन्हा फुलतं अन पुन्हा सगळ्यांना आकर्षित करतं. निसर्गाचे नियम माणसाला लागू आहेत. पण हाच क्रम राजकीय पक्षाला हि लागू पडतो. म्हणून पक्षांतर करताना राजकारणात काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. ज्यावेळी अमुक पक्षातून नेते मंडळी सोडून जात असतात नेमकी त्याच वेळी नवोदित राजकीय मंडीळीना राजकीय करियर घडवण्याची संधी असते. हीच ती वेळ असते जिथे तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करून पक्षश्रेष्टीं च्या नजरेत येऊ शकता. पण इथे आपण डगमगतो आणि नकारात्त्मक विचारांनी चुकीचे पाऊल टाकतो.

अनेक राजकीय नेते कार्यकर्ते ह्यांचे मनसुबे हे फक्त सत्ता मिळवणे सत्तेत राहून चर्चेत राहणे अन बक्कळ पैसा कमावणे आहे. प्रतिष्ठा मानसन्मान अन मोठेपणा मिळवण्यासाठी हि मंडळी वाटेल त्या थराला जातात. भाजी फुले विकणाऱ्यापासून ते रिक्षा चालवणारा आज राजकारणात कोट्यधीश होतो त्यांच्यावर ईडी ची चौकशी बसावी इतके ते श्रीमंत होतात फक्त राजकीय करियर मुळे. आणि हीच मंडळी नव्या राजकीय कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करतात. राजकारण हे समाजासाठी , देशहितासाठी असेल तर त्याचे कौतुक होते आणि जर स्वार्था साठी असेल तर त्याची माती होते. राजकीय शक्तीने सत्ता मिळवून भोग घेण्यापेक्षा त्या सत्तेचा उपयोग जनसेवेसाठी करणारा कार्यकर्ता समाजात आदरणीय ठरतो. राजकारणात तुमचा बेस हा मजबूत तेव्हाच राहतो जेव्हा तुमची नाळ हि सामान्य लोकांमध्ये मिसळलेली  असते. चांगल्या राजकीय तरुणांनी निवडणूक लढावी आणि देश हाती घ्यावं हे स्वामी विवेकानंदाचे स्वप्न आहे. अपयशाला खचून जाता कार्य करत राहणे हेच कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.

समाजाप्रती शुद्ध समाजसेवेची भावना मनात ठेवून कार्य करणारे मंडळी बोटावर मोजण्या इतपत असतील. ज्यांचा जन्म समाजसेवेसाठी झाला त्यांना सत्तेशी अन पक्षाशी काही घेणं देणं नसतं. अशी माणसं उशिरा का होईना पण एक ना एक दिवस चर्चेत येतात उजेडात येतात आणि त्यांच्या कामाचा गौरव हि समाजातून केला जातो हे लक्ष्यात ठेवा. राजकारणात संधी प्रत्येकाला मिळते पण त्याच सोन करायचं कि माती हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. शून्यातून विश्व् निर्माण करणाऱ्या नेत्यांचा प्रवास हा खूप खडतर कष्टातून अन चिकाटीतून मिळालेला असतो. त्यामागे त्यांची मेहनत असतीच पण त्यांच्या कार्यावर प्रेम करणारी त्यांच्या विचारांवर चालणारा एक मोठा लोक समूह त्यांच्या मागे ठाम उभा असतो. असा वर्ग जो त्या नेत्याचा एकही शब्द खाली पडू देत नाही. अशी कार्यकर्ते कमवण्यासाठी आधी स्वतः स्वतःशी प्रामाणिक राहावं स्वतःच्या विचाराशी प्रामाणिक असावं लागतं. तेव्हाच आपण लोकप्रतिनिधी म्हणवून घेऊ.

वरील पानगळीच उदाहरण त्याच गल्लीबोळातल्या नेत्यांसाठी त्या कार्यकर्त्यांसाठी आहे जे आज सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारतात. झटपट प्रसिद्धीच्या नादात चुकीचे पाऊल उचलून स्वतःच राजकीय आयुष्य संपवून बसतात. एकीकडे मंत्र्यांचा मुलगाच मंत्री होतो, ज्याच्या कडे पैसा तोच राजकारणात टिकतो अशी बोंब मारून आपण किती कुमकुवत विचारांचे आहोत ह्याच प्रदर्शन करणारे तर दुसरीकडे जिथे संधी मिळाली त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून राजकारणात यश मिळू पाहणारे हाडाचे कार्यकर्ते आहेत. निवडणूक लागली किंवा निवडणुकांची वेळ आली कि नाराज कार्यकर्त्यांची भली मोठी लिस्टच सगळ्या राजकीय पक्षातून निर्माण होते. पक्षांतर करून राजकीय संधी मिळवणे हा गुन्हा नाही जिथे संधी मिळेल तिथे आपल नशीब नक्की अजमाव.

आपल्या देशात तरुणांची संख्या हि खूप जास्त आहे. फक्त त्यांचा अभ्यास कमी दिसून येतोय. इथल्या तरुणांचा राजकारणात मोठा सहभाग आहे पण स्वतःच्या विचारांना त्यांनी कुलूप लावून पक्षाची लक्ष्मण रेखा आखली आहे. म्हणून तर इथला प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाच्या विचारांच्या अवती भवतीच फिरताना दिसतोय. नेता म्हणेल तेव्हाच हालचाल करायची , तेव्हाच पेटून उठायच, तेव्हाच विषयाला हात घालायचा ह्याच्या पलीकडे त्याचे धाडस होत नाही. आता हे बदलायला हवं. तुमच्या चांगल्या विचारातून, तुमच्या शिक्षणातून, तुमच्या नव्या तंत्रातून, तुमच्या उसळत्या रक्तातून , तुमच्या तारुण्यातून हा देश घडला पाहिजे. 

 

सचिन कृष्णा तळे

 Pune- 7709099646

 

Wednesday, 15 December 2021

भौतिक विकासासोबत मानसिक विकास हि महत्वाचा...!!

 

भौतिक विकासासोबत मानसिक विकास हि महत्वाचा...!!

 

काशी हे स्थान भारताच्या इतिहासात सुरवातीपासून केंद्रस्थानी आहे. भारतावर जेव्हा जेव्हा धार्मिक द्वेषातून परकीय आक्रमणे झालीत तेव्हा तेव्हा काशी उध्वस्त करून हिंदूंचे खच्चीकरण करण्याचा केविलवाणा प्रयोग परकीयांनी केला. त्याला उत्तर देत हिंदूंनी पुन्हा काशी उभी केली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला अन आता ह्या एकविसाव्या शतकात भारताचे पंतप्रधान मोदी ह्यांच्या हस्ते काशीने मोकळा श्वास घेतला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाहीत. खरतर भूतकाळातल्या इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प आहे. विकासाला साद घालत वारसा जपण्याचा संदेश म्हणजे काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प आहे अन राजकीय दबावाखाली बाटलेल्या हिंदूंना आकर्षित करण्याची एक युक्ती अन निवडणुकीच्या तोंडावर एक चांगली संधी म्हणजेच काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प आहे.

आपल्या आसपास जो भौतिक विकास घडतोय त्यासोबत माणसाला मानसिक विकास सुद्धा हवा. माणसाचे मन हाही एक माणसाच्या जिज्ञासेचा विषय आहे. मनाने निश्चय केल्यावर माणूस जगात काहीही साध्य करू शकतो. मनातील संवेदनांचे प्रतिबिंब जसे चेहऱ्यावर उमटतात तसेच ते आपल्या आसपास अन आपल्यासोबत घडणाऱ्या घटनेवर हि त्याचा परिणाम दिसून येतो. त्यासाठी मानसिक समाधान हे महत्वाचं.  मानसिक समाधानासाठी माणूस अनेक ठिकाणांचा शोध घेतो. मनशांती साठी अनेक उपाय करतो. जिथे त्याला शांती मिळेल जिथे त्याला आनंद मिळेल अश्या ठिकाणी माणूस आवर्जून जातो. अश्या ठिकाणात आपली धार्मिक स्थळे मंदिरे येतात. आपली मंदिरे हे आपल्या मनात जे वादळ उठलंय त्याला शांत करण्याचं एक चांगलं ठिकाण सुद्धा आहे. अन असं ठिकाण जे भारतातल्या प्रत्येक हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू आहे ते ठिकाण जर भव्य दिव्य होणार असेल तर ती वार्ता इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसन्न करणार ठरेल. भारतातल्या बहुतांश हिंदूंसाठी काशी हे अस एकमेव ठिकाण आहे जिथे भेट देऊन काशी विश्वनाथ च दर्शन घेऊन जीवनात एकदातरी काशी स्नान करण्याची ईच्छा असते. अश्यावेळी त्यांच्या श्रद्धेचं त्यांच्या भावनेचं योग्य तो सन्मान हा राजकीय सत्ताधारी वर्गाकडून झाला पाहिजे.

असं म्हणतात कि गंगा नदीच पाणी हे विश्वेश्वराच्या मंदिरा जवळून वाहत होत. भाविक गंगेच्या काठावर स्नान करून महादेवाच दर्शन घेत होते. पण हळू हळू वाढत्या लोकवस्ती अन अतिक्रमण मुळे मंदिर चा परिसर पूर्णतः गुदमरून गेला. तिथे येणाऱ्या भाविकांना त्याचा मानसिक त्रास सुद्धा होत होता. हा परिसर स्वच्छ अन सुंदर दिसणे हि काळाची गरज होती. काशी भव्य सुंदर दिसावं हे तिथल्या प्रत्येकाचं स्वप्न होत. काशी पुनःनिर्माण अन भक्तांची होणारी अडचण पाहून नरेंद्र मोदी ह्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प उभारून विकासाची एक छानशी प्रतिमा भारतासमोर उभी केली. भारतीय संस्कृती मध्ये परिवर्तन हे सतत दिसून आलंय. काळानुसार, परंपरेनुसार आणि प्रगतीच्या दिशेने भारतीय संस्कृती स्वतःला बदलत गेली आणि बदलत आहे. भूतकाळात ज्या चुका घडल्या त्या वर्तमानकाळात सुधारून पुन्हा ताठ मानाने विकासाची ध्वजा आज वाराणसीत फडकावला गेला. ह्याच श्रेय कामगारांना, यंत्रणेला आणि त्यासोबत तिथल्या स्थानिक रहिवासींना सुद्धा जात. कारण ह्या प्रकल्पातून अनेकांसाठी छोटे रोजगार निर्माण होईल तसेच पर्यटक हि वाढतील ह्या दृष्टिकोनातून मंदिराचे काम चालू आहे..

वाराणसी हा नरेंद्र मोदी ह्यांचा मतदार संघ. आपल्या मतदार संघात आपण भौतिक विकासा सोबत अनेक लोकांचं मानसिक विकास कस करू शकतो ह्याच एक उदाहरण आहे हा प्रकल्प. काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्प हा वाराणसीचं काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगेचे घाट यांना जोडणारा दुवा ठरणार आहे. १४०० दुकानदार, भाडेकरु, घरमालक यांचं विस्थापन करून मंदिराचा परिसर मोकळा केला गेला. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर करताना कुठे हि यंत्रणा कमी पडली नाही. ह्या कामादरम्यान ४० पुरातन मंदिरे आढळून आली आणि ती सुद्धा भाविकांना पाहता येणार आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालता श्रद्धेला महत्व देत हा पहिला टप्पा पार पडला. महत्वाचं आपल्या आसपास असे अनेक वारसा आहेत, अनेक पुरातन मंदिरे आहेत पण ते आजही विकासा पासून वंचित राहिले. हि शोकांतिका म्हणावं कि आपल्याच लोकांची हलगर्जीपणा. आपण आपला मतदारसंघ कसा घडवू शकतो, तिथे रोजगार कसा निर्माण करू शकतो, तिथे पर्यटकांची सोय करून त्यांना आमंत्रित कस करता येईल ह्यावर लक्ष्य केंद्रित करून आज जो पहिला टप्पा पार पडला तो लोकप्रतिनिधींना शिकण्या सारखा आहे. राजकारण चांगल्यासाठी, राष्ट्रासाठी अन लोकांच्या भल्याच असेल तर ते राजकारण इतिहासाच्या पानांवर लिहिले जात. काशीच्या इतिहासात हा प्रकल्प वर्षानुवर्षे जिवंत राहील. 

 

ज्यावेळी निवडणूक जवळ येतात त्याचवेळी लोकप्रतिनिधी ह्याच लक्ष जाते ते विकास कामाकडे. त्यासाठी रस्ते बांधणी सुरु होते, चौकात एक छानसा पुतळा उभारला जातो, नामकरण केले जाते, कार्यक्रम राबवून लोकांना एककेंद्रित केलं जात. परंतु हे सगळं करत असताना आपल्या प्रभागात आपल्या विभागात एखाद पुरातन वास्तू आहे का, पुरातन मंदिर आहे का, एखादा ऐतिहासिक वारसा आहे का हे पाहत नाही. आपल्या प्रभागात काही ऐतिहासिक घटना घडली का ह्याचा शोध घेऊन ती प्रकाशात आणायचं काम कोणताच लोकप्रतिनिधी घेत नाही. विशेष म्हणजे आपले गड, किल्ले, राजवाडे, ऐतिहासिक घाट म्हणजेच आपला वारसा. जेव्हा ह्या स्थळांना भेट दिली जाते तेव्हा त्याची झालेली चेष्टा त्यांचा अपमान त्याची अवस्था पाहून नक्कीच  पाहणाऱ्यांचे  मन दुखावले जात असेल पण हीच वस्तुस्तिथी आहे.  इतिहास वाचून ऐतिहासिक स्थळांना भेट देणाऱ्यां लोकांच्या मानसिकतेचा विचार शासकीय यंत्रणेतून झाला पाहिजे. प्रबळ इच्छाशक्ती अन स्वच्छ राजकीय दृष्टिकोन असेल तर असे अनेक वारसा आज पुनर्जीवित होऊ शकतात. लोकप्रतिनिधी ह्यांनी विचार  बदलायला हवं . आपल्या मतदारसंघात मतदारांच भौतिक विकासासोबत त्यांचं मानसिक विकास हि झाला पाहिजे ह्यासाठी राज्यातल्या प्रत्येक नगरसेवक , आमदार , खासदार ह्यांनी पर्यंत करावे अन काशी विश्वनाथ प्रकल्प अभ्यासावा. 

 

सचिन कृष्णा तळे

पुणे

7709099646


“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale