Wednesday, 15 December 2021

भौतिक विकासासोबत मानसिक विकास हि महत्वाचा...!!

 

भौतिक विकासासोबत मानसिक विकास हि महत्वाचा...!!

 

काशी हे स्थान भारताच्या इतिहासात सुरवातीपासून केंद्रस्थानी आहे. भारतावर जेव्हा जेव्हा धार्मिक द्वेषातून परकीय आक्रमणे झालीत तेव्हा तेव्हा काशी उध्वस्त करून हिंदूंचे खच्चीकरण करण्याचा केविलवाणा प्रयोग परकीयांनी केला. त्याला उत्तर देत हिंदूंनी पुन्हा काशी उभी केली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला अन आता ह्या एकविसाव्या शतकात भारताचे पंतप्रधान मोदी ह्यांच्या हस्ते काशीने मोकळा श्वास घेतला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाहीत. खरतर भूतकाळातल्या इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प आहे. विकासाला साद घालत वारसा जपण्याचा संदेश म्हणजे काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प आहे अन राजकीय दबावाखाली बाटलेल्या हिंदूंना आकर्षित करण्याची एक युक्ती अन निवडणुकीच्या तोंडावर एक चांगली संधी म्हणजेच काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प आहे.

आपल्या आसपास जो भौतिक विकास घडतोय त्यासोबत माणसाला मानसिक विकास सुद्धा हवा. माणसाचे मन हाही एक माणसाच्या जिज्ञासेचा विषय आहे. मनाने निश्चय केल्यावर माणूस जगात काहीही साध्य करू शकतो. मनातील संवेदनांचे प्रतिबिंब जसे चेहऱ्यावर उमटतात तसेच ते आपल्या आसपास अन आपल्यासोबत घडणाऱ्या घटनेवर हि त्याचा परिणाम दिसून येतो. त्यासाठी मानसिक समाधान हे महत्वाचं.  मानसिक समाधानासाठी माणूस अनेक ठिकाणांचा शोध घेतो. मनशांती साठी अनेक उपाय करतो. जिथे त्याला शांती मिळेल जिथे त्याला आनंद मिळेल अश्या ठिकाणी माणूस आवर्जून जातो. अश्या ठिकाणात आपली धार्मिक स्थळे मंदिरे येतात. आपली मंदिरे हे आपल्या मनात जे वादळ उठलंय त्याला शांत करण्याचं एक चांगलं ठिकाण सुद्धा आहे. अन असं ठिकाण जे भारतातल्या प्रत्येक हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू आहे ते ठिकाण जर भव्य दिव्य होणार असेल तर ती वार्ता इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसन्न करणार ठरेल. भारतातल्या बहुतांश हिंदूंसाठी काशी हे अस एकमेव ठिकाण आहे जिथे भेट देऊन काशी विश्वनाथ च दर्शन घेऊन जीवनात एकदातरी काशी स्नान करण्याची ईच्छा असते. अश्यावेळी त्यांच्या श्रद्धेचं त्यांच्या भावनेचं योग्य तो सन्मान हा राजकीय सत्ताधारी वर्गाकडून झाला पाहिजे.

असं म्हणतात कि गंगा नदीच पाणी हे विश्वेश्वराच्या मंदिरा जवळून वाहत होत. भाविक गंगेच्या काठावर स्नान करून महादेवाच दर्शन घेत होते. पण हळू हळू वाढत्या लोकवस्ती अन अतिक्रमण मुळे मंदिर चा परिसर पूर्णतः गुदमरून गेला. तिथे येणाऱ्या भाविकांना त्याचा मानसिक त्रास सुद्धा होत होता. हा परिसर स्वच्छ अन सुंदर दिसणे हि काळाची गरज होती. काशी भव्य सुंदर दिसावं हे तिथल्या प्रत्येकाचं स्वप्न होत. काशी पुनःनिर्माण अन भक्तांची होणारी अडचण पाहून नरेंद्र मोदी ह्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प उभारून विकासाची एक छानशी प्रतिमा भारतासमोर उभी केली. भारतीय संस्कृती मध्ये परिवर्तन हे सतत दिसून आलंय. काळानुसार, परंपरेनुसार आणि प्रगतीच्या दिशेने भारतीय संस्कृती स्वतःला बदलत गेली आणि बदलत आहे. भूतकाळात ज्या चुका घडल्या त्या वर्तमानकाळात सुधारून पुन्हा ताठ मानाने विकासाची ध्वजा आज वाराणसीत फडकावला गेला. ह्याच श्रेय कामगारांना, यंत्रणेला आणि त्यासोबत तिथल्या स्थानिक रहिवासींना सुद्धा जात. कारण ह्या प्रकल्पातून अनेकांसाठी छोटे रोजगार निर्माण होईल तसेच पर्यटक हि वाढतील ह्या दृष्टिकोनातून मंदिराचे काम चालू आहे..

वाराणसी हा नरेंद्र मोदी ह्यांचा मतदार संघ. आपल्या मतदार संघात आपण भौतिक विकासा सोबत अनेक लोकांचं मानसिक विकास कस करू शकतो ह्याच एक उदाहरण आहे हा प्रकल्प. काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्प हा वाराणसीचं काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगेचे घाट यांना जोडणारा दुवा ठरणार आहे. १४०० दुकानदार, भाडेकरु, घरमालक यांचं विस्थापन करून मंदिराचा परिसर मोकळा केला गेला. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर करताना कुठे हि यंत्रणा कमी पडली नाही. ह्या कामादरम्यान ४० पुरातन मंदिरे आढळून आली आणि ती सुद्धा भाविकांना पाहता येणार आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालता श्रद्धेला महत्व देत हा पहिला टप्पा पार पडला. महत्वाचं आपल्या आसपास असे अनेक वारसा आहेत, अनेक पुरातन मंदिरे आहेत पण ते आजही विकासा पासून वंचित राहिले. हि शोकांतिका म्हणावं कि आपल्याच लोकांची हलगर्जीपणा. आपण आपला मतदारसंघ कसा घडवू शकतो, तिथे रोजगार कसा निर्माण करू शकतो, तिथे पर्यटकांची सोय करून त्यांना आमंत्रित कस करता येईल ह्यावर लक्ष्य केंद्रित करून आज जो पहिला टप्पा पार पडला तो लोकप्रतिनिधींना शिकण्या सारखा आहे. राजकारण चांगल्यासाठी, राष्ट्रासाठी अन लोकांच्या भल्याच असेल तर ते राजकारण इतिहासाच्या पानांवर लिहिले जात. काशीच्या इतिहासात हा प्रकल्प वर्षानुवर्षे जिवंत राहील. 

 

ज्यावेळी निवडणूक जवळ येतात त्याचवेळी लोकप्रतिनिधी ह्याच लक्ष जाते ते विकास कामाकडे. त्यासाठी रस्ते बांधणी सुरु होते, चौकात एक छानसा पुतळा उभारला जातो, नामकरण केले जाते, कार्यक्रम राबवून लोकांना एककेंद्रित केलं जात. परंतु हे सगळं करत असताना आपल्या प्रभागात आपल्या विभागात एखाद पुरातन वास्तू आहे का, पुरातन मंदिर आहे का, एखादा ऐतिहासिक वारसा आहे का हे पाहत नाही. आपल्या प्रभागात काही ऐतिहासिक घटना घडली का ह्याचा शोध घेऊन ती प्रकाशात आणायचं काम कोणताच लोकप्रतिनिधी घेत नाही. विशेष म्हणजे आपले गड, किल्ले, राजवाडे, ऐतिहासिक घाट म्हणजेच आपला वारसा. जेव्हा ह्या स्थळांना भेट दिली जाते तेव्हा त्याची झालेली चेष्टा त्यांचा अपमान त्याची अवस्था पाहून नक्कीच  पाहणाऱ्यांचे  मन दुखावले जात असेल पण हीच वस्तुस्तिथी आहे.  इतिहास वाचून ऐतिहासिक स्थळांना भेट देणाऱ्यां लोकांच्या मानसिकतेचा विचार शासकीय यंत्रणेतून झाला पाहिजे. प्रबळ इच्छाशक्ती अन स्वच्छ राजकीय दृष्टिकोन असेल तर असे अनेक वारसा आज पुनर्जीवित होऊ शकतात. लोकप्रतिनिधी ह्यांनी विचार  बदलायला हवं . आपल्या मतदारसंघात मतदारांच भौतिक विकासासोबत त्यांचं मानसिक विकास हि झाला पाहिजे ह्यासाठी राज्यातल्या प्रत्येक नगरसेवक , आमदार , खासदार ह्यांनी पर्यंत करावे अन काशी विश्वनाथ प्रकल्प अभ्यासावा. 

 

सचिन कृष्णा तळे

पुणे

7709099646


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale