Monday, 8 February 2016

तिची आठवण …

तिची आठवण …

सकाळ ची संध्याकाळ झाली
तू नाही आलीस पण तुझी आठवण आली
रात्री ला चंद्र हसला
कुठे आहे ती म्हणाला
मी म्हणालो … थांब ती नाही आली
पण तिची आज आठवण आली
एके दिवशी … चंद्र लाजला
मी इचारलं .. का रे का लाजतोय
तो म्हणाला ..
माझ्या पेक्ष्या ही सुंदर ही कोण
मी म्हणालो आरे वेड्या
हीच ती
जी काल आली नाही , पण तिची आठवण आली

त्या दिवसापासून चंद्र जरा शांत शांत होता
कोणाच्या तरी प्रेमात होता
मी म्हणालो …
का रे मित्रा काय झाले
तो म्हणाला
संध्याकाळची सकाळ होत आली
पण ती नाही आली
कोण रे ती …
आरे तीच …
जी ची तुला आठवण आलती
पण ती आली नव्हती
पण ती आली नव्हती

सचिन कृष्णा तळे ( पुणे )
७७०९०९९६४६

Sunday, 7 February 2016

सखी … तुझ्या मुळे ,

सावरती धारा , उधान असा वारा
मोर पंखाचा फुले हा पिसारा
नयनी तुझ्या , काजळांचा शहारा
सखी … तुझ्या मुळे , मनी दाटला हा गारवा

ऋतू फुले , तुझ्या हसण्यावर
ऋतू हे उदास , तुझ्या रूसण्यावर
तुझे रूप प्रिये , कळ्यांहून निराळा
सखी … तुझ्या मुळे , मनी दाटला हा गारवा

शत पावलांची आस
तुझ्या संग खास
गावून तराणे , आठवे क्षण सारा
सखी … तुझ्या मुळे , मनी दाटला गारवा

तुझ्या प्रीतीचे भास होते मनात
तुला भेटण्यास आतुर माझी रात
तुला शोधतो ,नभी हा पारवा
सखी … तुझ्या मुळे , मनी दाटला गारवा

सचिन कृष्णा तळे 


“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale