Sunday, 7 February 2016

सखी … तुझ्या मुळे ,

सावरती धारा , उधान असा वारा
मोर पंखाचा फुले हा पिसारा
नयनी तुझ्या , काजळांचा शहारा
सखी … तुझ्या मुळे , मनी दाटला हा गारवा

ऋतू फुले , तुझ्या हसण्यावर
ऋतू हे उदास , तुझ्या रूसण्यावर
तुझे रूप प्रिये , कळ्यांहून निराळा
सखी … तुझ्या मुळे , मनी दाटला हा गारवा

शत पावलांची आस
तुझ्या संग खास
गावून तराणे , आठवे क्षण सारा
सखी … तुझ्या मुळे , मनी दाटला गारवा

तुझ्या प्रीतीचे भास होते मनात
तुला भेटण्यास आतुर माझी रात
तुला शोधतो ,नभी हा पारवा
सखी … तुझ्या मुळे , मनी दाटला गारवा

सचिन कृष्णा तळे 


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale