Thursday, 31 August 2017

माझ्या पोपटाचं...

सुंदर देखनी लाखात एक ही
चालतीय नखरेदार
शालू शांता फिके रे ..सारे
असा मधू चा हा श्रुंगार

माझ्या पोपटाच...
काळीज वाजू लागलय धाडं.. धाडं... धाडं...
पाहता ह्या मैनेला
नाचू लागलयं छान ..छान..छान..

मिठू मिठू बोलतयं ..
सैर वैर पळतयं ..
अंगाला अंग
जवळ खेटतयं
धरतयं रे ..हातात ..हात..
मधूचा ..धरतय रे ..हातात..रे  हात
माझ्या पोपटाचं ....

नवा नवा नखरा ..
पाहावा तिचा
नाक्यावर चर्चा
गावभर  जत्रा
हवा तीला रे ..सारखा ..सारखा
मधूला.. हवा रे ..सारखा ...सारखा
माझ्या पोपटाच..

काळीज वाजू लागलय धाडं.. धाडं... धाडं...
पाहता ह्या मैनेला
नाचू लागलयं छान ..छान..छान..

सुंदर देखनी लाखात एक ही
चालतीय नखरेदार
शालू शांता फिके रे ..सारे
असा मधू चा हा श्रुंगार

तरणी पोर
जमती चार
संम़दी  मिंंळून
छेडितील यार
छेडतील वांरवार ...छेडतील वांरवार
मधूला छेडतील वांरवार ..
माझ्या पोपटाचं....

काळीज वाजू लागलय धाडं.. धाडं... धाडं...
पाहता ह्या मैनेला
नाचू लागलयं छान ..छान..छान..

सुंदर देखनी लाखात एक ही
चालतीय नखरेदार
शालू शांता फिके रे ..सारे
असा मधू चा हा श्रुंगार

सचिन तळे
7709099646

Sunday, 20 August 2017

त्या जेजुरी गडावर

खंडेरायाच्या रूपावर
बानू म्हाळसा भाळल्या सदानंदावर रं..
माझ्या मल्हारी देवावर ...
त्या जेजूरी गडावर ...रं...

सोण्याची नगरी लाखभर पायरी
त्या कड्यापटारी नांदे शिवहरी
त्यान थाटलाय कैलास तिथ रं..
भोळ्या सांबचा पहावा संसारं..
त्या जेजूरी गडावर
बानू म्हाळसा भाळल्या सदानंदावर रं...

येळकोट येळकोट चारी दिशांनी
पिवळा भंडारा भक्तजण उधळी
हाकेला धाव घे मल्हारी रं...
वाघ्या मुरळीचा गोंधळ जागरं..
त्या जेजूरी गडावर
बानू म्हाळसा भाळल्या सदानंदावर रं..

सोमवती ची ती जत्रा लयभारी
पालखीत विराजे मल्हार स्वारी
सोबतीस विष्णू प्रधाण रं...
मालक हा आहे मोठा आधारं ...
त्या जेजूरी गडावर
बानू म्हाळसा भाळल्या सदानंदावर रं ...

सचिन कृष्णा तळे
७७०९०९९६४६
पुणे.

Thursday, 17 August 2017

पुणे महा मेट्रो

मेट्रो ..मेट्रो ..मेट्रो, आमची महा मेट्रो भारी
पुण्याच्या वैभवात सुपरफास्ट लयभारी

पेठांमधल्या रस्त्यामंधेे गर्दि ..गर्दि.. गर्दि
डेक्कनच्या राणीला जागा नाही मोकळी
हिच वेळ ,हिच संधी, हिच प्रगतीची दोरी

मेट्रो ..मेट्रो ..मेट्रो, आमची महा मेट्रो भारी
पुण्याच्या वैभवात सुपरफास्ट लयभारी

पिंपरी ते स्वारगेटचा टप्पा आता दूर नाही
वनाज चे रामवाडी काहि क्षणात जाई
मुंबई काय बघता राव पुण्याची चालू तयारी

मेट्रो ..मेट्रो ..मेट्रो, आमची महा मेट्रो भारी
पुण्याच्या वैभवात सुपरफास्ट लयभारी

सुरक्षीत नव्या युगाची आपली स्मार्ट सीटी
नको गडबड जिवाशी सोबत महा मेट्रोची
महाराष्ट्राची लाडकी मेट्रो आमची मेट्रो मराठी

मेट्रो ..मेट्रो ..मेट्रो, आमची महा मेट्रो भारी
पुण्याच्या वैभवात सुपरफास्ट लयभारी

- सचिन कृष्णा तळे
7709099646

17/08/2017

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale