Thursday, 16 March 2017

रे धिंड काढा धिंड काढा
ह्या लोकांची धिंड  काढा

ज्यांनी विकला इमान सारा
त्या लोकांची धिंड  काढा

माणुसकीचा घात करणाऱ्या
त्या माणसांंची धिंड काढा

शेतकर्यांना... लुटणाऱ्या
त्या सावकर्याची धिंड काढा

वृत्तपत्राला धंदा करणार्या
त्या पत्रकारांची धिंड  काढा

खोटे आश्वासने देणाऱ्या
त्या राज्यकर्त्यांची धिंड  काढा

अश्लील चित्रपटातील ...
त्या तारकांची धिंड  काढा

शेवटी ह्यांना भाळणारया
त्या जनतेची हि धिंड  काढा

रे धिंड काढा धिंड  काढा
ह्या लोकांची धिंड  काढा -

 तुमचा सचिन तळे पुणेे 

Thursday, 2 March 2017

साधका

साधका .. 

मीच आहे येथला कर्ता सवरता 
दे खुशाली उद्याची चालता चालता 

थांबून जा ,वाट जरा पाहून जा !
चर्चेला ह्या रंग थोडा चढता चढता 

कालची बातमी ती होती जुनी 
कळाले आज सहज वाचता वाचता 

झाकली मुठ त्यांनी घेवून सत्ता 
रोज नवी योजना राबवता राबवता 

ज्ञानेशाची भिंत आता कोण चालवेल 
एका समाजाला हिंसेने छळता छळता

तुकोबाच्या मृतूचा चा शोध लावा 
अभंगाला इंद्रायणीत बुडवता बुडवता 

शिक्षक आता ऑनलाईन भेटू लागले 
"धडे इंटरनेटचे..  गिरवता गिरवता "

साधका, वाचका ह्या देशा साठी रे 
देवून जा योगदान मरता मरता  

- सचिन कृष्णा तळे , पुणे 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale