Saturday, 28 December 2019

ईथला प्रत्येक राजकीय नेता गुन्हेगार आहे


ईथला प्रत्येक राजकीय नेता
गुन्हेगार आहे
काेणाच्या ना काेणाच्या तरी
नजरेतून
मतदारांच्या घरातून
कारण
आपली लाेकशाही
नेत्या शिवाय
चालतच नाही
आणि
मतदारांना
नेत्या शिवाय
सामान्य माणूस
मतदानात दिसतच नाही

सचिन तळे

Friday, 27 December 2019

रातराणीचा झुला

चांदण्यांचा झुला त्यावर आकाश मोकळा
रातराणी घेई वारा एका मैत्रिणीचा सोहळा

असा जाई झुला वर जसा धूमकेतूचा पिसारा
खाली येतो झुला तेव्हा जणू काजव्यांचा थवा

सोबत आहे चंद्र पुरा सोबत ध्रुव शुक्र तारा
सोबत आहे सप्तऋषींचा जागता पहारा

धरणी तिच्या खेळावर होई आनंदी बाई
लेकुरवाळी धरणी ती मोठ्या मनाची आई

पहा गारठली रातराणी तिला शालू पांघरा
शालू आणा धुक्यांचा अन थोडा सूर्य पेटवा


 सचिन तळे




Wednesday, 25 December 2019

Wednesday, 18 December 2019

हिच ती वेळ आहे ... भारतियांनो.



उत्तरम्य समुद्रस्यहिमाद्रे शैव लक्षणम्
वर्षम् भारतम् नाम् ,भारतीय यत्र संततिः

म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला अशी जी भूमी आहे , जो भूखंड आहे तो म्हणजे भारत अन् त्या भारतभूमीची संतती म्हणजेच भारतीय , जे भारतात जन्मले , मग ते कोणत्या हि धर्माचे , पंथाचे , जातीचे , भाषेचे असो ते अगोदर भारतीय आहेत नंतर अमुक तमुक धर्माचे. जगातल्या प्राचीन संस्कृती पैकी एक असणारी हि देवभूमी जिथे दैवी अंश जन्माला आले जिथे इतिहासाची पाने सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले. क्षेत्रफळात सातव्या क्रमांकावर आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसंख्याच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असणारा आपला भारत देश. अनेक भाषा , प्रांत, रीतिरिवाज , तसेच अनेक सण आणि अनेक धर्माना आश्रय आणि श्रद्धा पूर्वक मानसन्मान देणारा एकमेव देश म्हणजे आपला भारत . जिथे मंदिराची आरती होते ,मस्जिद ची आजण होते , बुद्धांचे स्मरण होते , चर्चमधून प्रार्थना होते तर जिथे बदल अन परिवर्तन हे निश्चित आहे, जिथे अन्यायाला न्याय मिळते, जिथे भारताचे संविधान तितकेच महत्वाचे मानले जाते जितके धर्मग्रंथ आहेत. अनेकतेतून एकता हीच ओळख आपल्या भारताची. हीच एकता कायम टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक भारतीय हा प्रतन्यशील असतो फक्त काही राजकीय समाजकंठक अन धृत माणसं सोडली तर. काही तरुण त्यांना बळी पडतात आणि देशाच्या संपत्तीची नुकसानी करतात , भिडतात , राजकीय दंगलीत सामील होतात, समाजांतर्गत वाद निर्माण करतात. भारतासारखा सुरक्षित देश जगात कुठेच नाही आणि जगात भारतीयांसारखा भोळा माणूस कुठेच नाही.


जागतिक पातळीवर जर पाहिलं तर भारत हा असा एकमेव राष्ट्र असेल जिथे त्याच्याच भूमिपुत्रांना हक्कासाठी लढावं लागत , मरावं लागत, मार खावं लागत.  देशासाठी त्याच्या धर्मासाठी त्याला बलिदान द्यावं लागत. भाषेवरून अन धर्मावरून वेळोवेळो त्याचे खच्चीकरण केले जात. जर प्राचीन भारतावर नजर फिरवली तर सहज लक्ष्यात येईल कि, सिंधू नदी काठावरचा हिंदू आणि बौद्ध ह्या दोन विश्व सुंदर धर्माची , वटवृक्षाची मुळे हे भारतातच रुजली अन फुलली . इतर धर्म कसे आले आणि लादले गेले हे इतिहासाच्या रक्तरंजित पानांनी आजही ग्रंथालय सजले आहेत. त्याचे अवशेष सहज दिसून येतात. भारताने सर्वधर्म समभाव ह्या त्याच्या गुणाने इतर धर्माना हि मान दिला. अन्न वस्त्र निवारा माणसाच्या ह्या मूलभूत गरजा त्याशिवाय माणूस जगू शकत नाही. ह्या गरजा जितक्या महत्वाच्या तितकंच महत्व आहे धर्म भाषा आणि देश. मूलभूत गरजा जगण्यासाठी तर घडण्यासाठी आणि घडवण्यासाठी मानव हा धर्म जात अन भाषाचे वापर करतो. ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचे आपण देणे लागतो ह्याच धर्मावर माणूस हा समूह करून राहू लागला. आपली परंपरा संस्कृती जपणे आणि पुढच्या पिढीला ती समजून सांगणे हे आद्य कर्तव्य. धर्माची रक्षा करणे धर्म वाढवणे म्हणजे आपल्या धर्मात असलेले चांगले  विचार हे लोकांपर्यंत पोहचवणे , त्यांना मार्ग दाखवणे .  धर्मांतर हे स्वखुशीने असावे. ज्याला त्याला मार्ग मोकळा आहे. ज्याचे त्याचे विचार हे स्वतंत्र आहे . परंतु धर्माच्या ह्या कडव्या प्रचारात धर्मांतराची ठिणगी अशी पेटली कि माणूस हा अत्याचाराने , जबरदस्तीने , अन्यायाने धर्मांतर करू लागला ... लादू लागला

हिंदू म्हणून जन्मलो का हाच माझा अपराध आहे
माझ्याच देशात हिंदू म्हणून का माझा विरोध आहे


वर्चस्व गाजवायच असेल तर एकता हि तोडायलाच हवी. एकमेकांबद्दल मतभेद निर्माण करणे, वैर निर्माण करणे, फूट पाडून कार्य सिद्धीकरणे. "तोडा फोड राज्य करा" कदाचित ह्याच वाक्यावर धर्मांतर आणि राष्ट्रांतरच बीज पेरलं गेलं असावं. राष्ट्रांतर घडलं ते धर्मांतराच्या जोरावर हे जगजाहीर आहे. इतिहासाची पाने चाळली तर धर्मांतरच्या वाहत्या प्रवाहात किती राष्ट्रांचा जन्म झाला हे सहज कळेल. जगाच्या पाठीवरती जितके युद्ध झाले ते सगळे युद्ध स्वतःचे साम्राज्य वाढवण्यास कमी तर धर्माच्या प्रचारास अधिक झाले हे कटू सत्य आहे आणि ह्याच आगीच्या धुराळात असंख्य निष्पाप जीवांची होळी पेटवण्यात आली. पुढच्या पिढीला इतिहास कळू नये म्हणून असंख्य ऐतिहासिक स्थळे भुईसपाट करण्यात आले उध्वस्त केले गेले. आठ वर्षांपूर्वी अफगाणिस्थान मधील हिंदुकुश पर्वतरांगात जगातील मोठ्या मुर्त्यांपैकी असणारी बमियानचे बुद्ध नष्ट  करण्यात आले. इतकेच नाही तर रस्त्यात येईल ते सर्व बोद्ध आणि हिंदूंचे धार्मिक स्थळांची तोडफोड अन विटंबना करून नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
" देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो " सावरकरांच्या अश्या क्रांतिकारी विचारांना आपण सहज विसरतो आणि उलट त्यांच्या नावाने राजकारण करत समाजात जाळ लावून त्यावर भाकरी शेकतो. जशी आपली संस्कृती तसा आपला देश. जर हि संस्कृतीचं बदली गेली तर देश हा बदलणारच. धर्माच्या नावावर देशाची फाळणी झाली. पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन राष्ट्र मुस्लिम राष्ट्र म्हणून जन्माला आली. तिथे हिंदू , शीख , इसाई , बौद्ध हे अल्पसंख्याक आहेत. संयुक्त राष्ट्राच्या अहवाल नुसार ह्या दोन राष्ट्रात धर्मांतर आणि अल्पसंख्याक लोकांवर सर्वात जास्त अत्याचार करण्यात आले आणि केले जात आहे. त्याच पार्शवभूमीवर भारतात सरकारने नागरिकत्व कायदा लागू केला. त्या लोकसांसाठी जे फाळणीच्या काळात देशापासून दुरावले गेले जे अत्याचार सहन करत आहेत. इथल्या मुस्लिम वर्गाला फाळणीच्या वेळी धर्माच्या आधारवर देश हवा होता तो दिला गेला. आता भारतात जे मुस्लिम आहेत ते भारतीय मुस्लिम आहेत त्यांना ह्या कायद्यापासून कोणतीच भीती नाही. भीती त्या लोकांना आहे ज्यांच्या कडे पुरावे नाही. आणि तेच वाद पेटवू लागलेत. जे काही राजकीय पुढाऱ्यांची व्होट बँक आहे. येणाऱ्या काळात त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांना देशाबाहेर फेकण्याचे काम हे सरकार च आहे तेच चालू आहे. देशातंर्गत सुरक्षतेसाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी लागू झाली पाहिजे. शत्रू राष्ट्रातल्या काही आतंकी मुसलमानामुळे जे इथे घर करून बसलेत त्यांच्यामुळे इथल्या मुस्लिम बांधवाना सामोरे जावे लागतंय, त्यांना अपमानित व्हावं लागत, त्यांना शक च्या नजरेने पाहिलं जात. हे थांबवण्यासाठी हे पाऊल उचललने खूप महत्वाचे आहे. बांगलादेशातून होणारी छुपी घुसकोरी हे पोलिसांच्या नोंदी मध्ये सहज दिसून येईल.
देशात फक्त मतासाठी मुस्लिम बांधवांना भीती दाखवून फूट पाडण्यात येत आहेत. ह्या कायद्याने मुस्लिमांना देशाबाहेर हाकलून लावणार अशी चुकीची अफवा पसरवली जात आहे आणि त्यात अभ्यास करता विचार करता काही मुस्लिम सहभागी होतायत. याना असं दाखवलं जातंय कि हे सर्व काही तुमच्या विरोधात चालू आहे. जे अल्पसंख्यांक पाकिस्तान बांगलादेशात आहे आणि जे भारतात आश्रय मागतायत त्या हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारशी बांधवाना नागरिकत्व देण्यात येण्यासाठी हा बिल आहे, मग इथे मुस्लिम बांधवाना त्रास होण्याचं कारण काय ? फक्त एकच लक्षात ठेवा नवीन कायदा हा भारतात वैध भारतीय नागरिकांसाठी नाहीय तो अवैध पद्धतीने राहण्याऱ्या लोकसांठी आहे आणि त्या लोकांसाठी पुळका आलाच नाही पाहिजे जे भारतीय नाहीत. त्यामुळे हीच ती वेळ आहे भारता ...!!

धन्य ती लोकशाही, धन्य ती मतांची गर्दी
गुंडा पेक्षा नेत्यांची, वाटे भीती भीती भीती

सचिन कृष्णा तळे
पुणे कात्रज
७७०९०९९६४६


Friday, 13 December 2019

सोलापूरची साबिरवाणी


सोलापूरची साबिरवाणी


दुनियेमध्ये तू आल्यावर , ऐसे स्वच्छ जगावे !
इतिहासाने तुझ्यासाठी ... एक पान राखावे !!
साबीर… एक पान राखावे !!!

साहित्य क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणारे जेष्ठ कवी बदीउज्जमा बिराजदार हे उत्तम गझलकार गीतकार आहेत सोबत नवोदित लेखकांचे आकर्षण आहेत. धर्म जात भाषा ह्यांच्या पलीकडे त्यांची विचारसरणी असून माणसातला देव शोधणारे एक वजनदार व्यक्तिमत्व आहेत. काव्यातून त्यांच्या शब्दातून आपल्याला प्रेम , आपला समाज , एक चळवळ , विरहाचं रूप , शिकवण , सुख दुःख , त्याग, सवांद, भक्ती , प्रबोधन , वर्णन असे अनेक बाबी आढळून येतील. सहसा बऱ्याच कवींना गझल पचत नाही झेपत नाही कारण गझलेचं गणित सोडवणे हे तितके सोपे हि नाही. परंतु साबीर ह्यांच्या प्रत्येक शब्दात गझल पाहायला मिळेल. इतिहासाने आपल्यासाठी एक पान राखून ठेवावे अशी इच्छा मनात बाळगून बदीउज्जमा बिराजदार हे मोजक्या शब्दात विश्वाची मांडणी करताना ह्या पुस्तकात आढळतील. बदीउज्जमा बिराजदार हे " साबीर सोलापुरी " ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. ह्या संग्रहात अखंड एक एक कविता नसून दोन दोन ओळींच्या शृखंलेत साबिरवाणी ची मांडणी वाचायला मिळेल. आजवर आपण कबिरवाणी वाचली असेल, अगदी त्याचं समांतर वृतांत आजच्या काळात रसिकांसाठी वाचकांसाठी साबिरवाणी चा जन्म झाला असे म्हणावे लागेल. ज्यांनी कबिरवाणी वाचली असेल त्यांना साबिरवाणी नक्कीच आवडेल. साबिरवाणी वाचायला सुरुवात केली कि शेवटच्या पानावर आपण कधी पोहचू हे कळणार नाही. इतक्या साध्या सोप्या भाषेत वृत्तात काव्याची नजाकत आहे. काही काही ओळी तर पुन्हा पुन्हा वाचावी असे आहेत. तर काही ओळींवर मन हरवून जात. तर काही ओळी थोडं स्तब्ध होऊन विचार करायला लावतात , काही ओळी प्रेरणा देतात तर काही ओळी प्रेमात पडण्यास भाग पाडतात तर काही ओळी  संसाराची जाणीव करून देतात, नात्याची गुंफण घालून देतात, तर काही ओळी परमेश्वराचं रूप निसर्गाच्या मंदिरातून रसिकांच्या हृदयाला भिडतात.

ज्ञानेशाची अन तुक्याची दिव्य केवढी वाणी !
ओव्या आणिक अभंग म्हणजे चैतन्याच्या खाणी !!
साबीर ... चैतन्याच्या खाणी !!

मुस्लिम समाजात जन्मलेले साबिर ह्याचे संस्कृत भाषेवर छान प्रभुत्व आहे. अर्थातच हे शब्दाचे बाळकडू त्यांना त्यांचे वडील पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार ह्याच्या कडूनच मिळाले. ते संस्कृत तसेच उर्दू भाषेचे अभ्यासक आहेत. वडिलांप्रमाणे महाराष्ट्रातच काय तर देशात भाषेवर प्रेम करून साहित्याची पालखी वाहण्यात साबीर दादा यशस्वी ठरलेत. त्यांचे काव्यसंग्रह " आयुष्य पेलताना " आणि एक गझलसंग्रह " माझा गुलदस्ता " प्रसिद्ध आहे . साबिर सरांनि लिहिलेली " समर्थांची गीत पुष्पे " हा भक्तीगीत संग्रह तसेच " महिमा स्वामी समर्थ कि " गीत माला मनाला स्वामी चरणी विलीन करतो. अनेक वृत्तपत्रातून लेखन करणारे साबिर ह्यांना अगणित असे पुरस्कार आणि मानसन्मान मिळाला आहे , अनेक साहित्य संमेलन त्यांनी गाजवले आहे आणि त्यांच्या पहाडी आवाजातून सादर हि केल्या आहेत. त्यांच्या आवाजातला कणखरपणा हा गझलेतून ऐकताना  मन आनंदी होत. म्हणून तर ज्ञानेशाच्या आणि तुकारामांच्या वाणीतून चैतन्याच्या खाणी शोधणारा हा कवी सगळ्यांना आपलासा वाटतो, हवाहवासा वाटतो.  ६८ पानांच्या ह्या साबिरवाणीत एकूण २७८ साबिरवाणी आहेत . कवी जनार्दन केशव म्हात्रे ह्यांची प्रस्तावना असून गझलकार गोविंद नाईक ह्यांनी मुखपृष्ठ आपल्या चित्रातल्या रंगाने रंगवले आहे. 
शेवटच्या दोन पानावर थोडक्यात साबीर सोलापुरी ह्यांची व्यक्तिछटा मांडली आहे.

कमी शब्दात सांगायचं झालं तर साबिरवाणीत कवी वरदानाच्या रांगेमध्ये वैभव मागतोय, हजार दुःखे हजार चिंता घेऊन संकटाना झेलतोय, आजच का रे देता महत्व महिलांच्या दिवसाला सांगत आदर्शाची चौकट बांधतोय. संशयाचे घर काचेचे तिथे मिळते साखर कडवट आणि जिथे तिथे उंच हवेल्या जो तो आहे चढवत. ह्या कवीच्या क्षितिजा भोवती आभासाची किरणे आहेत चन्द्राच्या कले कलेने झुरणे आहे सुखदुःखाला समजणे आहे हृदयातल्या ईश्वराचे कौतुक आहे अस्तित्वाच्या खुणा शोधत देशभक्तीच्या शब्दातून माणुसकीचा शोध आहे  साबीर माणुसकीचा शोध आहे ..!!

स्वातंत्र्याचे धिंडवडे तर , झाले विलक्षण !
फडके झेंडा आकाशी अन , हाय धरेवर कुंपण !!
साबिर ... हाय धरेवर कुंपण !!!

पुस्तक - साबिरवाणी
कवी - बदिऊज्जमा बिराजदार
प्रकाशक - गवळी प्रकाशन
मूल्य - ११०


सचिन कृष्णा तळे














Wednesday, 11 December 2019

देणाऱ्याने देत जावे


देणाऱ्याने देत जावे       

जेव्हा कधी माझी आई एखाद्या मंदिरात किंवा धार्मिक स्थळाला भेट देती, दर्शनास जाती तेव्हा ती कधीच हारफुलानी सजलेली थाळी घेत नाही. ती मंदिरात असणाऱ्या दानपेटीत काही पैसे टाकती आणि काही पैसे हे मंदिराच्या आवारात असणाऱ्या गरजूना देती. वाटलं तर एक फुल जे परमेश्वराच्या चरणी वाहिले जाईल. त्यामुळे मी हि देवाच्या चरणी फक्त एका फुलाचा मान देतो आणि दानपेटीत जितकं जमेल तेवढे पैसे देतो. अर्थातच ते आपल्या इच्छेवर आहे. तो आपल्या श्रद्धेचा एक भाग आहे. आपल्या विचारांवर आहे. आता तुम्ही म्हणाल त्या छोटे मोठ्या दुकानाचं काय ? त्यांचा धंदा रोजगार कसा होणार ? ते हि अगदी खरं आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाच्या अवती भवती बरेच लोक पोटापाण्याचा प्रश्न सोडवतात त्याच स्थळावर त्यांचे घर चालते, त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण होत असते. त्यामुळे हे रोजगार बंद व्हावे अशी तरी माझी इच्छा नाही. लोक आवडीने ते हारफूलाचा मान घेतात आणि स्वइच्छेने दानपेटीत दान हि देतात , दानधर्म करतात. मुळात हि शिकवण सर्व धर्मात आहे . दानशूर व्यक्तींच्या कहाणीने आपले ग्रंथ पुराण सजलेले आहेत. आता विषय हाच निघतो कि दानपेटीत दान का करावं ? बरेच धार्मिक स्थळांकडे तर पैशाचा पाऊस आहे त्याच काय ? देवाला कश्याला हवा पैसा ? मंदिरातली दानपेटी म्हणजे त्या पुजाऱ्यांची  मलाई. अश्या बरेच नकारात्मक विचारांची प्रश्नांची यादी आपल्याकडे सहज मिळेल. कारण आपला आपल्या देवावर, धर्मावर असणारा विश्वास, कट्टरता आणि शिकवण.

जगात सोशल मीडियाचं जाळ हे इतकं प्रभावशाली झालं आहे कि तिथून प्रचार , प्रसार , खऱ्या खोट्या अफवांचा बाजार हा लवकर पसरवला जातो आणि त्यावर विचार करता आपण भाळतो विश्वास ठेवतो त्याच प्रवाहात चुकीचा निर्णय घेतो. खर सांगायचं तर धर्म अंतर्गत एक वैचारिक वॉर चालू आहे. ह्यात तरुणांची संख्या हि खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण आजच्या युगात त्यांना सहज उपलब्ध  होणार साधन. आजची तरुण पिढी हे उद्याचे नागरिक आहेत धर्म वाढवणारा अन वारसा वाहणारा एक दुवा आहे. त्यामुळे ह्या तरुणपिढीची कशी दिशाभूल करता येईल ह्यसाठी काहीजण जाणीवपूर्वक अश्या काही गोष्टी रंगवतात कि ते त्यांच्या बुद्धीला सहज पटते. मंदिराच्या आवारात असणारी दानपेटी , त्याचा भरलेला गल्ला , त्याची रक्कम , त्यावर रंगणाऱ्या बातम्या , घडवून आणणाऱ्या चर्चा , त्याची आकडेवारी, सोशल मीडियावर त्याची खिल्ली , खोटा प्रचार , खोटी माहिती आणि काही अधार्मिक समाजकंटकाकडून होणारा अपमान आणि आपण. काहीजण त्याला अंधश्रद्धा म्हणतात पण हे विसरतात कि प्रत्येक अंधश्रद्धेच्या पाठी एका समाजाची श्रद्धा लपलेली असते . अशी श्रद्धा कि त्यातून त्यांना एक आनंद समाधान आणि पुण्यप्राप्तीचा भास होतो काहीतरी चांगलं कार्य  केल्याची भावना प्रकट होते . "दानेन हरते व्याधीम" आपल्या व्याधी संपण्यासाठी दानाने पुण्य कमवण्यासाठी गरजूना मदत म्हणून आपल्या मिळकती मधून काही रक्कम दान करावे असे धर्म शाश्त्रात सांगितले गेले आहे.. 

 धर्मो रक्षति रक्षितः अर्थात जो व्यक्ती धर्माची रक्षा करतो त्याला धर्म तारतो त्याची रक्षा धर्म करतो. मग हि रक्षा अनेक स्वरूपातून आपल्याला मिळत असते. मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च विहार हे आपल्या धर्माचे केंद्रबिंदू जिथून सात्विक ऊर्जा सतत वाहत असते जिथून सत्य सुंदर अश्या विश्वाला अध्यात्मिक आणि श्रद्धेच्या जोरावर मानवजातीचा उद्धार होण्याहेतू अनेक महत्वपूर्ण कार्य केले जाते. ते महत्वपूर्ण कार्य म्हणजे नक्की कोणते हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. आपली श्रद्धा आपले देवस्थान म्हणजे आपली ओळख. त्या गाभाऱ्यात जी मूर्ती स्थापन असती ,त्या गाभाऱ्यात जी मदार आहे , त्या गाभाऱ्यात जो बुद्ध आहे , त्या गाभाऱ्यात जो क्रॉस आहे त्याचे सेवेकरी म्हणजेच पुजारी , फादर , मौलाना , भिक्क्खू आणि काही कर्मचारी सेवेकरी. जे हे धार्मिक स्थळ पवित्र ठेवून आपल्याला आनंद मनशांती कशी मिळेल दैवी अंश कसा लाभेल ह्यसाठी सतत कार्यरत असतात. तिथला परिसर स्वच्छ ठेवणे, तिथे वेगवेगळे संस्कारी धार्मिक कार्यक्रम घेणे, पूजाअर्चना, भक्ती गीत, आरती ,नामसमरण , त्यांचा पगार , अश्या अनेक गोष्टी आहेत जे आपल्या दानपेटीत स्वइच्छेने टाकल्या जाणाऱ्या रक्कमेवर चालते. साई संस्थान , अक्कलकोट संस्थान , शेगाव संस्थान , गोंदवलेकर संस्थान इ संस्थना मार्फत  दिवसरात्र अन्नदान हे मोठयाप्रमाणत चालू आहे. तिथे धर्म जात भाषा लिंग पहिले जात नाही. पोटाची भूक भागवण्यासाठी रोज हजारो  लोक येतात आणि भक्तीने ते अन्न ग्रहण करतात त्याचा आस्वाद घेऊन आत्मा तृप्त करतात. अन्नछत्रातून मिळणाऱ्या पोटभर जेवणासाठी लागणार साधन सामुग्री हि आपल्याच देणगीतून दानपेटीतुन होत असते. असे ठिकाण जिथून आपण आपले सणवारे साजरे करतो आपण आपल्या मुलांना आपल्या देवाची ओळख करून देतो, धर्माची जाणीव करून देतो.

हे झालं त्या धार्मिक स्थळावर चालणारे कार्यक्रम पण ह्याच देवस्थानातून आपल्या समाजात देशात जगात जिथे गरज आहे तिथे मानव जातीसाठी वेळप्रसंगी अस्मानी संकटातुन बाहेर पाडण्यासाठी एक मदत जाहीर होत असते ,मदत पोहचत असते . ती मदत दोन प्रकारची असते एक पैशाची आणि दुसरी मनुष्यबळाची. संकटात प्रत्येक धार्मिक स्थळ हे आप आपल्या तिजोऱ्या मोकळ्या करतात. इथले प्रत्येक देवस्थान आणि देणगीतून जमा होणारी ठेवी अन संपत्ती ही समाजाची आहे. देवस्थान आणि त्यांच्या संपत्ती वर अनेकांची वाईट नजर असल्यामुळे त्यांचे अनेक चांगले कार्य आपल्या पर्यंत पोहचत नाही. ह्या देवस्थानामार्फत अनेक वृद्धाश्रम अनेक हॉस्पिटल दिवसरात्र कार्यरत आहे. राहण्यासाठी माफक दारात तुम्हाला भक्तनिवास मिळतो. गरजू विद्यार्थी वर्गाला स्कॉलर्सशिप दिली जाते पुस्तके दिले जातात. काही देवस्थान अंतर्गत तर ग्रंथालय सुद्धा आहेत. काहीठिकाणी शिक्षणाचा खर्च हा पूर्णतः देवस्थांतून उचलला जातो.  पर्यावरण वाचवण्यासाठी प्रवचनातून संदेश दिला जातो. मुलांसाठी वृद्धांसाठी भक्तांसाठी मंदिराच्या भोवताली बाग तयार केली जाते त्याची राखण केली जाते.

कोल्हापूर सांगली जिल्ह्यावर आलेल्या संकटासाठी साई संस्थानकडून पूरग्रस्तांना १० कोटींची मदत केली गेली. पूरग्रस्त भागात पिण्याचे शुद्ध पाणी तातडीने पोहोचवण्यासाठी सुमारे ११ लाख लिटर पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या सिद्धिविनायक मंदिरामार्फत पूरग्रस्त भागात पोहचवले गेले. नगर जिल्ह्यातील निळवंडे  धरणाला ५०० कोटींचे बिनव्याजी कर्ज देखील साई संस्थानच्या वतीनं देण्यात आले. नाशिक त्र्यंबकेश्वर देवस्थांकडून २६ लाखाची मदत केली गेली. श्री क्षेत्र ओझर विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट कडून पूरग्रस्तांना लाख ५१ हजारांची मदत झाली. सण २०१८ मध्ये पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती कडून केरळ राज्याला २५ लाखाची मदत करण्यात आली.  इतकंच नाही तर देशाची सीमेवर लढणाऱ्या शहिदांसाठी सिद्धिविनायक मंदीर न्यासाकडून ५१ लाखांची मदत जाहीर केली गेली. असे बरेच जिवंत उदाहरण आहेत जे आपल्या मंदिरांमार्फत समाजउपयोगी कार्य केले जाते, जे  दानपेटीत पडणाऱ्या रक्कमेतून म्हणजेच तुमच्या रकमेतून पूर्ण होत असते.

थोडक्यात देवस्थान आणि त्यांची मिळकत ही सदैव सुरक्षितच असली पाहिजे ती आपल्या साठी आपल्या गरजेसाठी वाढली पाहिजे. एकप्रकारे आपल्या देणगीतून हे एक देवकार्यच आहे असे म्हणत दानधर्म जपला पाहिजे.

सचिन कृष्णा तळे
पुणे कात्रज
७७०९०९९६४६










“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale