देणाऱ्याने
देत जावे
जेव्हा
कधी माझी आई एखाद्या मंदिरात
किंवा धार्मिक स्थळाला भेट देती, दर्शनास जाती तेव्हा ती कधीच हारफुलानी
सजलेली थाळी घेत नाही. ती मंदिरात असणाऱ्या
दानपेटीत काही पैसे टाकती आणि काही पैसे हे मंदिराच्या आवारात
असणाऱ्या गरजूना देती. वाटलं तर एक फुल
जे परमेश्वराच्या चरणी वाहिले जाईल. त्यामुळे मी हि देवाच्या
चरणी फक्त एका फुलाचा मान देतो आणि दानपेटीत जितकं जमेल तेवढे पैसे देतो. अर्थातच ते आपल्या इच्छेवर
आहे. तो आपल्या श्रद्धेचा
एक भाग आहे. आपल्या विचारांवर आहे. आता तुम्ही म्हणाल त्या छोटे मोठ्या दुकानाचं काय ? त्यांचा धंदा रोजगार कसा होणार ? ते हि अगदी
खरं आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाच्या अवती भवती बरेच लोक पोटापाण्याचा प्रश्न सोडवतात त्याच स्थळावर त्यांचे घर चालते, त्यांच्या
मुलांचे शिक्षण पूर्ण होत असते. त्यामुळे हे रोजगार बंद
व्हावे अशी तरी माझी इच्छा नाही. लोक आवडीने ते हारफूलाचा मान
घेतात आणि स्वइच्छेने दानपेटीत दान हि देतात , दानधर्म
करतात. मुळात हि शिकवण सर्व
धर्मात आहे . दानशूर व्यक्तींच्या कहाणीने आपले ग्रंथ पुराण सजलेले आहेत. आता विषय हाच निघतो कि दानपेटीत दान
का करावं ? बरेच धार्मिक स्थळांकडे तर पैशाचा पाऊस
आहे त्याच काय ? देवाला कश्याला हवा पैसा ? मंदिरातली दानपेटी म्हणजे त्या पुजाऱ्यांची मलाई.
अश्या बरेच नकारात्मक विचारांची प्रश्नांची यादी आपल्याकडे
सहज मिळेल. कारण आपला आपल्या देवावर, धर्मावर असणारा विश्वास, कट्टरता आणि शिकवण.
जगात
सोशल मीडियाचं जाळ हे इतकं प्रभावशाली
झालं आहे कि तिथून प्रचार
, प्रसार , खऱ्या खोट्या अफवांचा बाजार हा लवकर पसरवला
जातो आणि त्यावर विचार न करता आपण
भाळतो विश्वास ठेवतो त्याच प्रवाहात चुकीचा निर्णय घेतो. खर सांगायचं तर
धर्म अंतर्गत एक वैचारिक
वॉर चालू आहे. ह्यात तरुणांची संख्या हि खूप मोठ्या
प्रमाणात आहे कारण आजच्या युगात त्यांना सहज उपलब्ध होणार
साधन. आजची तरुण पिढी हे उद्याचे नागरिक
आहेत धर्म वाढवणारा अन वारसा वाहणारा एक दुवा आहे.
त्यामुळे ह्या तरुणपिढीची कशी दिशाभूल करता येईल ह्यसाठी काहीजण जाणीवपूर्वक अश्या काही गोष्टी रंगवतात कि ते त्यांच्या
बुद्धीला सहज पटते. मंदिराच्या आवारात असणारी दानपेटी , त्याचा भरलेला गल्ला , त्याची रक्कम , त्यावर रंगणाऱ्या बातम्या , घडवून आणणाऱ्या चर्चा , त्याची आकडेवारी, सोशल मीडियावर त्याची खिल्ली , खोटा प्रचार , खोटी माहिती आणि काही अधार्मिक समाजकंटकाकडून होणारा अपमान आणि आपण. काहीजण त्याला अंधश्रद्धा म्हणतात पण हे विसरतात
कि प्रत्येक अंधश्रद्धेच्या पाठी एका समाजाची श्रद्धा लपलेली असते . अशी श्रद्धा कि त्यातून त्यांना
एक आनंद समाधान आणि पुण्यप्राप्तीचा भास होतो काहीतरी चांगलं कार्य केल्याची
भावना प्रकट होते . "दानेन हरते व्याधीम" आपल्या व्याधी संपण्यासाठी दानाने पुण्य कमवण्यासाठी गरजूना मदत म्हणून आपल्या मिळकती मधून काही रक्कम दान करावे असे धर्म शाश्त्रात सांगितले गेले आहे..
धर्मो
रक्षति रक्षितः । अर्थात जो
व्यक्ती धर्माची रक्षा करतो त्याला धर्म तारतो त्याची रक्षा धर्म करतो. मग हि रक्षा
अनेक स्वरूपातून आपल्याला मिळत असते. मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च विहार हे आपल्या धर्माचे
केंद्रबिंदू जिथून सात्विक ऊर्जा सतत वाहत असते जिथून सत्य सुंदर अश्या विश्वाला अध्यात्मिक आणि श्रद्धेच्या जोरावर मानवजातीचा उद्धार होण्याहेतू अनेक महत्वपूर्ण कार्य केले जाते. ते महत्वपूर्ण कार्य
म्हणजे नक्की कोणते हे जाणून घेणे
खूप गरजेचे आहे. आपली श्रद्धा आपले देवस्थान म्हणजे आपली ओळख. त्या गाभाऱ्यात जी मूर्ती स्थापन
असती ,त्या गाभाऱ्यात जी मदार
आहे , त्या गाभाऱ्यात जो बुद्ध आहे , त्या गाभाऱ्यात जो क्रॉस आहे त्याचे सेवेकरी म्हणजेच पुजारी , फादर , मौलाना , भिक्क्खू आणि काही कर्मचारी सेवेकरी. जे हे धार्मिक
स्थळ पवित्र ठेवून आपल्याला आनंद मनशांती कशी मिळेल दैवी अंश कसा लाभेल ह्यसाठी सतत कार्यरत असतात. तिथला परिसर स्वच्छ ठेवणे, तिथे वेगवेगळे संस्कारी धार्मिक कार्यक्रम घेणे, पूजाअर्चना, भक्ती गीत, आरती ,नामसमरण , त्यांचा पगार , अश्या अनेक गोष्टी आहेत जे आपल्या दानपेटीत
स्वइच्छेने टाकल्या जाणाऱ्या रक्कमेवर चालते. साई संस्थान , अक्कलकोट संस्थान , शेगाव
संस्थान , गोंदवलेकर संस्थान इ संस्थना मार्फत दिवसरात्र
अन्नदान हे मोठयाप्रमाणत चालू
आहे. तिथे धर्म जात भाषा
लिंग पहिले जात नाही. पोटाची
भूक भागवण्यासाठी रोज हजारो लोक
येतात आणि भक्तीने ते अन्न ग्रहण
करतात त्याचा आस्वाद घेऊन आत्मा तृप्त करतात. अन्नछत्रातून मिळणाऱ्या पोटभर जेवणासाठी लागणार साधन सामुग्री हि आपल्याच देणगीतून
दानपेटीतुन होत असते. असे ठिकाण जिथून आपण आपले सणवारे साजरे करतो आपण आपल्या मुलांना आपल्या देवाची ओळख करून देतो, धर्माची जाणीव करून देतो.
हे
झालं त्या धार्मिक स्थळावर चालणारे कार्यक्रम पण ह्याच देवस्थानातून
आपल्या समाजात देशात जगात जिथे गरज आहे तिथे मानव जातीसाठी वेळप्रसंगी अस्मानी संकटातुन बाहेर पाडण्यासाठी एक मदत जाहीर
होत असते ,मदत पोहचत असते . ती मदत दोन
प्रकारची असते एक पैशाची आणि
दुसरी मनुष्यबळाची. संकटात प्रत्येक धार्मिक स्थळ हे आप आपल्या
तिजोऱ्या मोकळ्या करतात. इथले प्रत्येक देवस्थान आणि देणगीतून जमा होणारी ठेवी अन संपत्ती ही
समाजाची आहे. देवस्थान आणि त्यांच्या संपत्ती वर अनेकांची वाईट
नजर असल्यामुळे त्यांचे अनेक चांगले कार्य आपल्या पर्यंत पोहचत नाही. ह्या देवस्थानामार्फत अनेक वृद्धाश्रम अनेक हॉस्पिटल दिवसरात्र कार्यरत आहे. राहण्यासाठी माफक दारात तुम्हाला भक्तनिवास मिळतो. गरजू विद्यार्थी वर्गाला स्कॉलर्सशिप दिली जाते पुस्तके दिले जातात. काही देवस्थान अंतर्गत तर ग्रंथालय सुद्धा
आहेत. काहीठिकाणी शिक्षणाचा खर्च हा पूर्णतः देवस्थांतून उचलला जातो. पर्यावरण
वाचवण्यासाठी प्रवचनातून संदेश दिला जातो. मुलांसाठी वृद्धांसाठी भक्तांसाठी मंदिराच्या भोवताली बाग तयार केली जाते त्याची राखण केली जाते.
कोल्हापूर
सांगली जिल्ह्यावर आलेल्या संकटासाठी साई संस्थानकडून पूरग्रस्तांना १० कोटींची मदत
केली गेली. पूरग्रस्त भागात पिण्याचे शुद्ध पाणी तातडीने पोहोचवण्यासाठी सुमारे ११ लाख लिटर पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या सिद्धिविनायक मंदिरामार्फत पूरग्रस्त भागात पोहचवले गेले. नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाला
५०० कोटींचे बिनव्याजी कर्ज देखील साई संस्थानच्या वतीनं देण्यात आले. नाशिक त्र्यंबकेश्वर देवस्थांकडून २६ लाखाची मदत
केली गेली. श्री क्षेत्र ओझर विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट कडून पूरग्रस्तांना २ लाख ५१
हजारांची मदत झाली. सण २०१८ मध्ये
पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती कडून केरळ राज्याला २५ लाखाची मदत
करण्यात आली. इतकंच
नाही तर देशाची सीमेवर
लढणाऱ्या शहिदांसाठी सिद्धिविनायक मंदीर न्यासाकडून ५१ लाखांची मदत
जाहीर केली गेली. असे बरेच जिवंत उदाहरण आहेत जे आपल्या मंदिरांमार्फत
समाजउपयोगी कार्य केले जाते, जे दानपेटीत
पडणाऱ्या रक्कमेतून म्हणजेच तुमच्या रकमेतून पूर्ण होत असते.
थोडक्यात
देवस्थान आणि त्यांची मिळकत ही सदैव सुरक्षितच
असली पाहिजे ती आपल्या साठी
आपल्या गरजेसाठी वाढली पाहिजे. एकप्रकारे आपल्या देणगीतून हे एक देवकार्यच
आहे असे म्हणत दानधर्म जपला पाहिजे.
सचिन
कृष्णा तळे
पुणे
कात्रज
७७०९०९९६४६
No comments:
Post a Comment