Thursday, 26 November 2015

जन्मलो गर्दीत आपण



जन्मलो गर्दीत आपण माणसांमध्ये जनावरांमध्ये
बांधली जंगले आपण माणसांमध्ये जनावरांमध्ये

वस्ती जराशी दाट झाली वाढली हो घरांवर घरे
आभाळ ही घेशील सामावून रे तुझ्या घरांमध्ये

चोहीकडे पाहतोस काय ! काय आहे त्या तिथे
मोकळ्या जागेची हौस सोडून दे  तू मनामध्ये

हे बरे जाहले आता राहिली ना मोकळी जागा
उंच ईमारती ही दिसतील डोलताना शेतांमध्ये

उच्च शिक्षित समाजाने बंद केले कधीच दरवाजे
काय देणे काय घेणे राहू मजेमधे अन पैशांमध्ये

सोडून चालली पाखरे ह्या देशास ठेवून नावे
थांबवू कोणा कोणास इथे सारेच रस्त्यांमध्ये

सचिन कृष्णा तळे 

Wednesday, 25 November 2015

देश माझा

देश माझा

सोडून भारताशी जावू दूरदेशी
भुंकली चार कु्त्री माझ्यापाशी

चर्चा करा आता भेटून गांधीशी
गोडसेनी का स्वीकारली फाशी

देशात वाढलेली असहिष्णुता कळवा
परततील सैन्य आपल्या घराशी

अशिक्षितानी सत्ता घेतली हाती
शिक्षित बेरोजगार राहतो उपाशी

महागड्या योजना परदेश वारी
बातम्या घेवून रोज शिंकते माशी

कसाही असला हा देश माझा
पदर तिचा सदा राहो उसाशी

सचिन कृष्णा तळे

गांधी तुमचा देश असहिष्णू झाला …



        असहिष्णुता आणि सहिष्णुता ह्या दोन शब्दांचा अर्थ भारतीयांनी फक्त पुस्तकात वाचला असावा त्यानंतर सोशल मिडीयावर . कारण काबाड कष्ट करून , सोशल मिडीयावर जास्त विश्वास ठेवणाऱ्या बऱ्याच भारतीय बंधूना असहिष्णुता आणि सहिष्णुता म्हणजे नक्की काय हे माहित ही  नसेल .  पण गेल्या काही महिन्यापासून हे दोन शब्दांनी चांगलाच रंग घेतलाय . भारताचे पंतप्रधान मोदी ह्यांचा विरोध करणारा तसेच एका वयस्कर सुरक्षा रक्षकाला धक्का बुक्की करणारे शारुख खान पी के ह्या चित्रपटातून फक्त आणि फक्त हिंदू दोष दाखून देणारे आमिर खान ह्यांना तुमचा देश असहिष्णु  असुरक्षित वाटू लागला आहे . म्हणून तर दोघांनी ही हा देश सोडून जाऊ अशी इच्छा तमाम भारतीयान समोर मांडलीय ( आमिर खान पत्नीच्या सांगण्यावरून ). मत मांडण हे चुकीच नाहीय घटनेत हा अधिकार सर्वाना दिलाय . सर्वाना आपल मत मांडून व्यक्ती स्वातंत्र चा हक्क आहे मग जर शारुख आणि आमिर ला देश सोडून जायच असेल तर त्याने  नक्की जावे . कारण ईतर देशापेक्षा , भारत हा  कितीतरी पटीने सहिष्णु आहे . सर्वधर्म समभाव हा ह्याच देशात मिळेल ईतर देशात धार्मिक कट्टरता ची बातम्या आपण पाहतच असतो . बघा ना सीमेवरील  शहीद कर्नल संतोष महाडिक पेक्ष्या आमिर आणि शारुख महत्वाचा झालाय , कारण त्याने भारताला ,, हिंसेचा विरोध करणाऱ्या महात्मा गांधींच्या देशाला असहिष्णू ठरवलंय . राग तर येणारच .. स्वतंत्र पूर्व स्वतंत्र मिळाल्यानंतर ही आम्ही किती लढे दिले किती सहन केल पण भारताच्या अस्मितेला धक्का लावून दिला नाही . अफगाणिस्तान पासून कितीतरी परकीयांनी आमच्या वर आक्रमणे केलीत पण आम्ही लढलो पण देश सोडला नाही  , पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या देशांना जन्म दिला इथल्या हिंदुना वार्यावर सोडून तिथल्या लोकांना आश्रय दिला पण देश सोडला नाही . साहेबाच्या देशात जावून उच्च शिक्षण घेवून इथे लढा देणाऱ्या आमचे महात्मा गांधी बाबसाहेब आंबेडकर ह्यांना कळणार तर कसे . त्या काळात असहिष्णू ता जितकी होती तितकी आता आहे का ह्याचा वैचारिक विचार कार्याला शुटींग मधून वेळ तरी मिळाल पाहिजे .
        १९९३ पासून ते २०११ पर्यंतच्या सर्व बॉम्बस्फोटात एक तरी सिलेब्रेटी ला आपला प्राण गमवाव लागल आहे का ? ह्या देशाला  कोणी ही विरोध करू शकतो पण त्यावर कारवाई झालीय का ? इतका सहिष्णू व सुरक्षा  इतर देशात असेल तर नक्क्की च हा देश सोडून त्या देशात  जाण्यातच शहाणपण आहे . ह्या देशावर भाईजान दाउद कडून व पाकिस्तान कडून  जे हल्ले झालेत त्यावेळी आमिर ला भीती नाही वाटली त्यावेळी परिवाराची चिंता नव्हती का ?त्यावेळी  आवाज का नाही उठवला . कदाचित छोटा शकील हा आता भारताच्या हाती आलाय आणि दाउद व इतर दहशतवादी संघटना ना आपल्या काही भारतीय कलाकार खुलेआम मदत करतायत हे विधानाने तर आमिर असुरक्षित तर झाला नसेल ना . आतंकवादी हाफिज सईद चे सहयोगी जमील च्या सोबत चे तुमचे छाया चित्र पाहिले ,  पी के चित्रपटातून गालावर कानाखाली न मिळो ह्यासाठी गालावर देवांचे फोटो लावलेत  , रॉंग नंबर कसा असतो ते दाखून दिलेत , शंकराच्या पिंडीवरील दुधापासून ते सर्वच बाबा हे भोंदू दाखवलेत पण मुसलीम आणि मस्जिद मधील जिहाद का नाही दाखवला , देशात आज ही मुस्लिम घरात दोन ते तीन लग्न करून महिलांवर अत्याचार केला जातोय हे नाही दिसत , आमिर चे ही तीन लग्न झालीत . आज ही मुस्लिम घरात  ५ ते १० मुलांना जन्म दिला जातो ह्याने देशाची लोक्संखेत स्फोट होतोय हे का नाही दर्शवले . मंदिरात जाणारे भित्रे असतात , का ? मस्जिद मध्ये ५ वेळा नमाज पडणारे मग कोण असतात . मक्का मध्ये जावून एका हातात छोटासा दगड घेवून त्या शैतान ला मारताना अंधश्रधा नाही वाटली . ह्या असल्या प्रत्येक गोष्टी मुळें मला च आता हा देश असुरक्षित वाटू लागला आहे . मी कोणाचे चित्रपट पाहतोय , कोणाला हृदयाशी घेतोय , कोणाला सुपर स्टार करतोय . उद्या जावून गैर मुस्लिम राष्ट्र म्हणून इसीस ने आमच्या वर हल्ला केला तर , त्यावेळी तुम्ही कुठे असाल , आमच्या सोबत कि दुसर्या देशात हा विचार ही मनात थोडा रेंगाळत आहे . काश्मीर मध्ये जेव्हा पाकिस्तानी झेंडे फडकावले व भारता विरुद्ध घोषणा दिल्या त्यावेळी प्रिय आमीर खान तुम्हाला असहिष्णू  ता नाही वाटली का ? दिल्ली मध्ये शहीद जवानांचे स्मारक तोडले तेव्हा असहिष्णू ता नाही वाटली का ? आणि आज माननीय मोदी ह्यांची बढती व पसंती तुम्हाला कुठतरी खटकतीय पण बोलू नाही शकत म्हणून ह्या सरकार ला कस लक्ष्य करता येईल आणि आपल्या आगामी चित्रपटाला ( दंगल ला ) कसं पब्लिकसिटी मिळेल ह्याच विचारात तुम्ही जाणून बुजून केलल हे तुमच वक्तव्य फार चुकीचे आहे . माझ्या घरा समोर पूल तयार केला तर मी हा देश सोडेल अस भारतरत्न लता दीदी नि म्हंटल होत पण त्यांनी त्याची देश वासियांना जाहीर माफी मागितली . तुमच्या दंगल चित्रपट पूर्वी असहिष्णू तेच दंगल निर्माण करून तुम्ही चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे पण ह्यातून राजकीय पोळी शिजताना कित्येक असहिष्णू आणि सहिष्णू ता अर्थ न समजणारे माझ्या भारतीय सामान्य नागरिक भरडले जातील हीच चिंता . 

गांधी तुमचा देश असहिष्णू झाला I
इस्लाम राष्ट्र मात्र सहिष्णू राहिला II

सचिन कृष्णा तळे

Sunday, 22 November 2015

एक प्रवास - मिठी ते मुळा मुठा



       एखाद्या गावाची किवा शहराची ओळख त्या भागातून वाहणाऱ्या नदीवर असते .निर्मळ झुळझुळ करत वाहणारी नदी आणि त्या नदी सभोवताली असणारे रम्य असे वातावरण . नदीकाठी  उभे राहून आकाशातील बदलणारे रंग , सर्वत्र पसरलेली  हीरवळ , तिच्या सहवासात धुके झटकत उगवणारी ती पहाट , पक्ष्यांची किलबिल तो नाद , काठावर खेळणारी मुलेमुली आणि त्यांच्या आंघोळी , घरातील काम संपवून एकत्र कपडे धुणाऱ्या गृहणी आणि त्यांच्या गप्पा गोष्टी, चरण्यासाठी बाहेर पडलेले गाय वासरू ,  दुरून कानी पडणारे मंदिरातले पहाट गीते ,भर उन्हात नदीकाठी तृष्णा भागवून दमलेला श्रमिक राजा आणि त्याची काही क्षणासाठी घेतलेली विश्रांती तसेच पाखरे परतण्याच्या वाटेवर होणारी संध्या  आणि नदी काठावरच्या आजीच्या गोष्टी;  हे सार काही खूप सुंदर वाटतंय नां . पण गावाचे शहरीकरण करण्यात आपण इतके दंग झालो कि हे अनुभव घेणे आता कधीच होणे नाही . कदाचित आपल्या पुढच्या पिढीला ला ही  पुस्तकातून आणि चित्रपटातून च अनुभव घेता येईल . खंत हीच , जीवनदान देणारी नदी आता पालिकेचे काम करू लागली आहे , आपल्या सुख सुविधातून निर्माण होणारे मैल/ केरकचरा ती न बोलता दूर वाहून घेवून जाते . उगम स्थानातून स्वतःच पावित्र जपत ती कधी मैली होते हे तिलाच कळत नसेल . हिंदू आणि भारतीय समाज परंपरे नुसार नदीला आपण देवीचे रूप मानतो आणि पुजतो . आपले सारे सण सोहळे तिच्याच लांब अश्या पदर किनाऱ्यावर करतो. ज्या गावातून नदी वाहत असेल त्या गावातील हर एका घरात सुख समृद्धी असते , शेताला आणि पिण्याला मुबलक पाणी असते . नदी वरून कितीतरी पौराणिक कथा जुडलेल्या आहे , प्रत्येक नदीवर वर्षानुवर्षाचा इतिहास रुजला अन घडला आहे . असे दैवी रूप असणारी नदी जी मुंबई व पुण्या च्या मध्यवर्ती भागातून वाहते  त्या मिठी आणि मुळा मुठा ला आपण काय म्हणार ? तिची सध्याच परिसर पाहून तिला आपण नदी म्हणार कि नाला . 

      शहरातल्या मुलांना नदी म्हंटल कि एक वेगळच आकर्षण असत . मित्रांसोबत पोहणे व मासे पकडण्यासाठी ते सदा तयार असतात कारण सिमेंट च्या जंगलात त्यांना नदी कुठून भेटणार. शहरात दिवसांदिवस वाढणारी लोकसंख्या , उंच उंच इमारती व अपुरी पडणारी जागा . त्यातून स्वतःच अंग चोरत मिळेल त्या वाटेने निस्तब्ध वाहणारी नदी, अन्यथा खाऱ्या पाण्याच उसळणाऱ्या लाटेचा सागर . मुंबई उपनगर विचार करता ,मध्यवर्ती भागातून वाहणारी मिठी नदी , ही पवई तलावातून उगम पावते व माहीम अरब सागरात  जावून मिळते. विहार लेक पासून साकीनाका परिसरात येता येता ती स्वतःच मूळ  स्वरूपच विसरून जाते .  ह्याच मिठी नदी मध्ये म्हणे , इंग्रज मासे पकडायचे , बोटी फिरायच्या आणि ह्या नदीतील पाणी हे गोड असल्याने त्याला मिठी असे नाव पडले . असो पण खंत अशी कि पवई पर्यंत स्वच्छ वाटणारी मिठी ही वाहत वाहत माहीम खाडीत  पोहचे पर्यंत ती पूर्णतः दुषित होते . कालिना , वाकोला, कुर्ला बांद्रा कॉम्प्लेक्स , धारावी आणि माहीम ह्या परिसरातील सारी घाण व कंपनीचे दुषित पाणी मिठीत सोडले जाते . वाढत्या परप्रांतीय लोकसंख्यने  स्वार्थ  साधत मिळेल तशी मिठीत भरणी करून आप आपल्या घरे उभारली . मुबईतील आंतरराष्ट्रीय विमान तळ बांधताना मिठीच पात्र ही बदलण्यात आल. आणि ज्यावेळी २६ जुलै २००५ सारख्या पावसात तिने आपला टाहो फोडला त्यावेळी कुठे जावून प्रशासन(MMRDA) व जनतेला जाग आली . तोपर्यंत ती एक नाला म्हणूनच जगत होती व वाहत होती . तरीही सध्या पाहता तिला तीच ते  जुणं अस्तित्व मिळवून देन हे प्रशासन ला ही जमणार नाही आन किड्याप्रमाणे मिळेल त्या जागेत निसर्गाची हानी करत मिळेल तसे झोपड्या उभारत जगणाऱ्या ह्या स्वार्थी लोकांनाही जमणार नाही . मिठीची ही व्यथा पाहता , पुण्यातून वाहणारी मुळा मुठा ही त्याच प्रवाहात वाहताना दिसते . लहानपणी  सुट्टीत मावशीकडे पुण्यात यायचो , त्यावेळी माझे  बंधू  व त्यांचे मित्र परिवार सायकल वर , टायर व कपडे घेवून ह्याच मुळा मुठात पोहायला जायचो , ज्या ठिकाणी आम्ही जात होतो त्याठिकाणी आता राजाराम पूल आहे .  जेव्हा कधी पुण्यात यायचो तेव्हा नदीवर आणि नदी काठी असणार्या आमराई चा आनंद घेयचो . बालपण मिठी च्या पदरात गेले आणि आता पुण्यात
स्थायिक झाल्यापासून कदाचित माझ्या पुढच्या पिढीला ही मुळा मुठा … ही मिठी सारखीच दिसेल का ? हाच विचार सारखा रेंगाळतोय . खडकवास धरणातून निघून पुण्य अश्या नगरीत पोहचता पोहचता आणि भिमा त विलीन होता होता तीच मूळ स्वरूप पूर्णतः दुषित झालेलं असत . मुळा मुठा विषयी अभिमान बाळगणारे पुणेकर सध्या च्या तिच्या प्रवहात, नदी किनारी मिळणारे आनंद घेवू शकतात का ?  ज्या पाण्यात आपण क्षणा साठी ही थांबू शकत नाही अशी अवस्था त्या मुळा मुठा ची झालीय . स्मार्ट सिटी च्या नादात तिला जर विसरलो तर येणाऱ्या काळात ती ही एखाद्या २६ जुलै च्या पावसात टाहो फोडेल , पण ज्याप्रमेण मुंबईकरांनी मिठी गमावली त्याप्रमाणे पुणेकरांना ही मुळा मुठा व तिच्या पदरात साबूत असलेल पुण्याचा ऐतहासिक वारसा ही गमवावा लागेल .

सचिन कृष्णा तळे

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale