एखाद्या गावाची किवा शहराची ओळख त्या
भागातून वाहणाऱ्या नदीवर असते .निर्मळ झुळझुळ करत वाहणारी नदी आणि त्या नदी सभोवताली
असणारे रम्य असे वातावरण . नदीकाठी उभे राहून
आकाशातील बदलणारे रंग , सर्वत्र पसरलेली हीरवळ
, तिच्या सहवासात धुके झटकत उगवणारी ती पहाट , पक्ष्यांची किलबिल तो नाद , काठावर खेळणारी
मुलेमुली आणि त्यांच्या आंघोळी , घरातील काम संपवून एकत्र कपडे धुणाऱ्या गृहणी आणि
त्यांच्या गप्पा गोष्टी, चरण्यासाठी बाहेर पडलेले गाय वासरू , दुरून कानी पडणारे मंदिरातले पहाट गीते ,भर उन्हात
नदीकाठी तृष्णा भागवून दमलेला श्रमिक राजा आणि त्याची काही क्षणासाठी घेतलेली विश्रांती
तसेच पाखरे परतण्याच्या वाटेवर होणारी संध्या आणि नदी काठावरच्या आजीच्या गोष्टी; हे सार काही खूप सुंदर वाटतंय नां . पण गावाचे शहरीकरण
करण्यात आपण इतके दंग झालो कि हे अनुभव घेणे आता कधीच होणे नाही . कदाचित आपल्या पुढच्या
पिढीला ला ही पुस्तकातून आणि चित्रपटातून च
अनुभव घेता येईल . खंत हीच , जीवनदान देणारी नदी आता पालिकेचे काम करू लागली आहे ,
आपल्या सुख सुविधातून निर्माण होणारे मैल/ केरकचरा
ती न बोलता दूर वाहून घेवून जाते . उगम स्थानातून स्वतःच पावित्र जपत ती कधी मैली होते
हे तिलाच कळत नसेल . हिंदू आणि भारतीय समाज परंपरे नुसार नदीला आपण देवीचे रूप मानतो
आणि पुजतो . आपले सारे सण सोहळे तिच्याच लांब अश्या
पदर किनाऱ्यावर करतो. ज्या गावातून नदी वाहत असेल त्या गावातील हर एका घरात सुख समृद्धी
असते , शेताला आणि पिण्याला मुबलक पाणी असते . नदी वरून कितीतरी पौराणिक कथा जुडलेल्या
आहे , प्रत्येक नदीवर वर्षानुवर्षाचा इतिहास रुजला अन घडला आहे . असे दैवी रूप असणारी
नदी जी मुंबई व पुण्या च्या मध्यवर्ती भागातून वाहते त्या मिठी आणि मुळा मुठा ला आपण काय म्हणार ? तिची
सध्याच परिसर पाहून तिला आपण नदी म्हणार कि नाला .
शहरातल्या
मुलांना नदी म्हंटल कि एक वेगळच आकर्षण असत . मित्रांसोबत पोहणे व मासे पकडण्यासाठी
ते सदा तयार असतात कारण सिमेंट च्या जंगलात त्यांना नदी कुठून भेटणार. शहरात दिवसांदिवस
वाढणारी लोकसंख्या , उंच उंच इमारती व अपुरी पडणारी जागा . त्यातून स्वतःच अंग चोरत
मिळेल त्या वाटेने निस्तब्ध वाहणारी नदी, अन्यथा खाऱ्या पाण्याच उसळणाऱ्या लाटेचा सागर
. मुंबई उपनगर विचार करता ,मध्यवर्ती भागातून वाहणारी मिठी नदी , ही पवई तलावातून उगम पावते व माहीम अरब सागरात जावून मिळते. विहार लेक पासून साकीनाका परिसरात
येता येता ती स्वतःच मूळ स्वरूपच विसरून जाते
. ह्याच मिठी नदी मध्ये म्हणे , इंग्रज मासे
पकडायचे , बोटी फिरायच्या आणि ह्या नदीतील पाणी हे गोड असल्याने त्याला मिठी असे नाव
पडले . असो पण खंत अशी कि पवई पर्यंत स्वच्छ वाटणारी मिठी ही वाहत वाहत माहीम खाडीत पोहचे पर्यंत ती पूर्णतः दुषित होते . कालिना ,
वाकोला, कुर्ला बांद्रा कॉम्प्लेक्स , धारावी आणि माहीम ह्या परिसरातील सारी घाण व
कंपनीचे दुषित पाणी मिठीत सोडले जाते . वाढत्या परप्रांतीय लोकसंख्यने स्वार्थ साधत मिळेल तशी मिठीत भरणी करून आप आपल्या घरे उभारली
. मुबईतील आंतरराष्ट्रीय विमान तळ बांधताना मिठीच पात्र ही बदलण्यात आल. आणि ज्यावेळी
२६ जुलै २००५ सारख्या पावसात तिने आपला टाहो फोडला त्यावेळी कुठे जावून प्रशासन(MMRDA)
व जनतेला जाग आली . तोपर्यंत ती एक नाला म्हणूनच जगत होती व वाहत होती . तरीही सध्या
पाहता तिला तीच ते जुणं अस्तित्व मिळवून देन
हे प्रशासन ला ही जमणार नाही आन किड्याप्रमाणे मिळेल त्या जागेत निसर्गाची हानी करत
मिळेल तसे झोपड्या उभारत जगणाऱ्या ह्या स्वार्थी लोकांनाही जमणार नाही . मिठीची ही व्यथा पाहता , पुण्यातून वाहणारी मुळा मुठा ही त्याच प्रवाहात
वाहताना दिसते . लहानपणी सुट्टीत मावशीकडे
पुण्यात यायचो , त्यावेळी माझे बंधू व त्यांचे मित्र परिवार सायकल वर , टायर व कपडे
घेवून ह्याच मुळा मुठात पोहायला जायचो , ज्या ठिकाणी आम्ही जात होतो त्याठिकाणी आता
राजाराम पूल आहे . जेव्हा कधी पुण्यात यायचो
तेव्हा नदीवर आणि नदी काठी असणार्या आमराई चा आनंद घेयचो . बालपण मिठी च्या पदरात गेले
आणि आता पुण्यात
स्थायिक झाल्यापासून कदाचित माझ्या
पुढच्या पिढीला ही मुळा मुठा … ही मिठी सारखीच दिसेल का ? हाच विचार सारखा रेंगाळतोय
. खडकवास धरणातून निघून पुण्य अश्या नगरीत पोहचता पोहचता आणि भिमा त विलीन होता होता
तीच मूळ स्वरूप पूर्णतः दुषित झालेलं असत . मुळा मुठा विषयी अभिमान बाळगणारे पुणेकर
सध्या च्या तिच्या प्रवहात, नदी किनारी मिळणारे आनंद घेवू शकतात का ? ज्या पाण्यात आपण क्षणा साठी ही थांबू शकत नाही
अशी अवस्था त्या मुळा मुठा ची झालीय . स्मार्ट सिटी च्या नादात तिला जर विसरलो तर येणाऱ्या
काळात ती ही एखाद्या २६ जुलै च्या पावसात टाहो फोडेल , पण ज्याप्रमेण मुंबईकरांनी मिठी
गमावली त्याप्रमाणे पुणेकरांना ही मुळा मुठा व तिच्या पदरात साबूत असलेल पुण्याचा ऐतहासिक
वारसा ही गमवावा लागेल .
सचिन कृष्णा तळे
No comments:
Post a Comment