प्रत्येक भारतीयांच्या मनातला खरा "भारत रत्न " रतनजी टाटा
"सरकार जेव्हा भारतरत्न म्हणून एखाद्या व्यक्तीला सन्मानित करते तेव्हा पासून त्या व्यक्तीच्या नावापुढे भारतरत्न म्हणून लावले जाते. पण ज्येष्ठ उद्योगपती आणि अत्यंत उदार व्यक्तीमत्व असणाऱ्या रतनजी टाटा यांनी ज्याप्रमाणे देशातल्या तळागाळातल्या लोकांसाठी स्वतःला समर्पित केलं आणि प्रत्येक संकटात ते ज्या प्रमाणे धावून आले ते पाहून सोशल मीडियावर सगळ्यांनी श्रद्धांजली वाहताना त्यांना 'भारतरत्न' हीच उपमा दिली. हे पाहून राज्यसरकार आणि अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी सुद्धा केंद्रात रतनजी टाटा यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित करावे हि विनंती केली आहे."
देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. रतन टाटा हे फक्त देशातच नव्हे तर जगभर त्यानी त्यांच्या कार्यातून भारताच नाव उद्योग क्षेत्रात पुढे घेऊन आले आहेत. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले अन भारताने काय गमावलं हे फक्त या देशातला कामगार वर्गच सांगू शकतो. " मी गेलो तर कंपनी बंद करू नका , कामगारांचं नुकसान करू नका " अश्या शब्दात त्यांनी त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांना संदेश दिला होता. कोरोनाच्या महामारीत जेव्हा देश संकटात होता तेव्हा कामगारांच्या आणि देशवासीयांच्या मागे सर्वात प्रथम रतनजी टाटा उभे राहिले. जेव्हा जेव्हा संकटाची चाहूल लागली तेव्हा तेव्हा स्वतःहून रतनजी धावून आलेत. अश्या व्यक्तीच्या जाण्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली. त्यांचे आदर्श, विचार आणि तत्त्वे नेहमी युवकांना मार्गदर्शक ठरली आहेत. रतन टाटा यांना २००० मध्ये पद्मभूषण आणि २००८ मध्ये पद्मविभूषण, भारत सरकारचा तिसरा आणि दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला होता. टाटा यांना २००६ मध्ये महाराष्ट्रातील सार्वजनिक प्रशासनातील त्यांच्या कामासाठी ' महाराष्ट्र भूषण ' आणि आसाममध्ये कर्करोगाच्या उपचारात योगदान दिल्याबद्दल २०२१ मध्ये ' आसाम वैभव ' असे विविध राज्य नागरी सन्मानही मिळाले आहेत. रतन टाटा हे केवळ उद्योगपती नव्हते तर ते सामाजिक जबाबदारी, आरोग्यसेवा आणि शिक्षणाचे खंबीर पुरस्कर्ते होते.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टाटा स्टीलच्या ब्लास्ट फर्नेसची देखरेख करणारी रतन टाटा यांची पहिली नोकरी होती. वास्तविक अमेरिकेत असताना रतन टाटा यांना ‘आयबीएम’ या बलाढ्य कंपनीचे बोलावणे होते. त्यांनी ते नाकारले आणि त्याऐवजी भारतात परत येऊन टाटा समूहाच्या पोलाद कारखान्यात एखाद्या अन्य कुशल कामगाराप्रमाणे नोकरी पत्करली. सन १९९२ मध्ये इंडियन एअरलाइन्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांना विचारण्यात आले, दिल्ली ते मुंबई दरम्यान कोणता प्रवाशी आहे, ज्यांनी तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला. त्यात सर्वाधिक कर्मचाऱ्यांनी रतन टाटा यांचे नाव सांगितले. जेव्हा त्याचे कारण शोधले तेव्हा समजले, ते एकमेव असे व्हिआयपी होते, जे नेहमी एकटे जात होते. त्यांच्यासोबत त्यांची बॅग आणि फाईल उचलण्यासाठीसुद्धा असिस्टेंट नव्हता. विमानाचे उड्डान होताच ते आपले काम सुरु करत होते. देशात सात्त्विकतेने संपत्ती निर्मिती होऊ शकते आणि सभ्य, सुसंस्कृत, सालस, सोज्वळतेने राहता येते हे रतन टाटा यांनी दाखवून दिले. ते अत्यंत शिस्तबद्ध आणि संतुलित वर्तन असलेले टाटा हे पहिले उद्योगपती होते ज्यांनी एक लाखात कार देण्याचा संकल्प पूर्ण केला. रतन टाटा त्यांच्या साधेपणाने त्यांना इंडस्ट्रीत विशेष स्थान मिळवून दिले होते. टाटा समूहाचे जागतिक समूहात रूपांतर करण्यात, ऑटोमोटिव्ह, पोलाद, तंत्रज्ञान आणि आदरातिथ्य यासारख्या क्षेत्रांमध्ये त्याचा प्रभाव वाढवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने जग्वार लँड रोव्हर आणि कोरस स्टीलसह ऐतिहासिक अधिग्रहण केले आणि जागतिक स्तरावर आपले स्थान मजबूत केले.
त्यांची अफाट संपत्ती आणि अफाट प्रभाव लोकांवर असूनही, रतन टाटा त्यांच्या नम्रता आणि साधेपणासाठी प्रशंसनीय ठरलेत. नैतिक नेतृत्वाबद्दलचे त्यांचे समर्पण आणि व्यवसायाचा चांगल्यासाठी शक्ती म्हणून वापर करण्याचा त्यांचा विश्वास यामुळे ते सर्वांसाठी एक आदर्श ठरले. रतन टाटा यांचा वारसा केवळ त्यांच्या व्यावसायिक कामगिरीनेच नव्हे तर त्यांच्या नैतिक नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारीनेही दिसून आले. त्यांनी नेहमीच सामाजिक कल्याणाला प्राधान्य दिले, शिक्षण, आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकासासाठी संसाधने समर्पित केली. रतन टाटा हे केवळ व्यापारी नेते नव्हते; त्यांची दृष्टी, सचोटी आणि नम्रता यांनी भारताच्या कॉर्पोरेट लँडस्केपवर अमिट छाप सोडली होती. त्यांच्या परोपकारी हितसंबंधांसाठी त्यांची खूप प्रशंसा झाली, ज्यात शिक्षण, औषध आणि ग्रामीण विकासामध्ये संशोधन आणि सुधारणांचा समावेश आहे. त्यांनी रुग्णालये आणि संशोधन केंद्रे स्थापन केली आणि वर्धित केली ज्यांनी कर्करोगाची काळजी घेण्यास मदत केली. टाटा समूह आणि टाटा ट्रस्ट नावाच्या संबंधित परोपकारी समूहाने दिलेल्या देणग्यांमुळे यूएस विद्यापीठांमध्ये विविध संस्था आणि शिष्यवृत्तींची स्थापना झाली आहे. यामध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ , सॅन दिएगो येथे जैविक आणि भौतिक विज्ञान संशोधन सुविधा आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधील एक कार्यकारी केंद्र यांचा समावेश आहे.
टाटा त्यांच्या प्राण्यांवर, विशेषतः कुत्र्यांवरच्या प्रेमासाठी ओळखले जात होते. टाटांनी आयुष्यभर प्राणी कल्याणाचा पुरस्कार केला. बॉम्बे हाऊस, टाटा समूहाच्या मुख्यालयात, टाटा यांनी हे सुनिश्चित केले की भटक्या लोकांना सुसज्ज कुत्र्यासाठी प्रवेश मिळेल आणि त्यांना आवारात मुक्तपणे फिरण्याची परवानगी आहे. प्राण्यांच्या हक्कांचे उत्कट समर्थक म्हणून ओळखले जाणारे, त्यांनी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील एक शाही कार्यक्रम देखील वगळला होता. कॉर्पोरेट टायटनने मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात टाटा ट्रस्ट्स स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल सुरू केले. त्यांनी १६५ कोटी रुपयांचा पाळीव प्राणी रुग्णालय प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली तेव्हा ज्येष्ठ उद्योगपती रतनजी टाटा म्हणाले, "पाळीव प्राणी हे आमचे कुटुंब आहे आणि त्यांचे जीवन प्रत्येक पाळीव पालकांसाठी महत्त्वाचे आहे. मी आजूबाजूला पाहिले आणि पायाभूत सुविधांचा अभाव पाहिला. भारतातील पाळीव प्राणी, यामुळे मला आश्चर्य वाटले की, एवढ्या मोठ्या पाळीव प्राण्यांच्या लोकसंख्येच्या मोठ्या देशात, जीव वाचवणारी आणि पाळीव प्राण्यांचे जीवन चांगले बनवणारी सुविधा आपल्याकडे का नाही?"
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रतनजी बदल "श्रीमंत योगी" हा शब्द वापरला तो खऱ्या अर्थाने सार्थक ठरतो. त्यांनी त्याच संपूर्ण आयुष्य एका योगी तपस्वी सारखे लोककल्याणकारी विचाराने जगले. अश्या महानायकाला "भारतरत्न " देऊन सन्मानित करावे हि संपूर्ण भारतीयांनी इच्छा.
सचिन कृष्णा तळे
