Thursday, 6 October 2016

एक मराठा लाख मराठा


एक मराठा लाख मराठा
आवाज एकच गर्जू दे
शिवरायाच्या लेकरांची
तळमळ जगाला कळू दे

हिंद भूमीच्या रक्षणासाठी ..मराठा मराठा
मराठ मोळ्या भाषेसाठी .. मराठा मराठा
जातपातीच्या अंतासाठी .. मराठा मराठा
देश देव अन धर्मासाठी ... मराठा मराठा 

स्वयंभू शक्ती ही अखंड भक्ती
भाषा मराठी एकवटू दे
मौनातून या वाहत्या प्रवहातून
भगवा मानाचा फडकू दे
एक मराठा लाख मराठा
आवाज एकच गर्जू दे

झुंज राजकीय देण्यासाठी .. मराठा मराठा
अखंड महाराष्ट्रासाठी .. मराठा मराठा
शुरांची गाथा राखण्यासाठी .. मराठा मराठा
मशाल ही पेटवण्यासाठी .. मराठा मराठा 

कोटी कोटी लोक चले हे
ये ईतिहास क्रांती घडू दे
लहान थोर सारे च्या सारे
मावळे हे चालू दे गर्जू दे
एक मराठा लाख मराठा
आवाज एकच गर्जू दे

सचिन तळे

मी कोण


जगाच्या पाठीवरती ...
मी भारत झालो, पाक झालो,  बंगाल झालो
पण एक राष्ट्र होता ना आले 

धर्माच्या प्रचारासाठी...
मी हिंदू झालो,  बौध्द झालो, मुस्लीम झालो
पण एक रंग होता ना आले 

राजकीय सत्तेसाठी
मी पक्ष झालो,  अप‌क्ष झालो,  ल‌क्ष झालो
पण एक सत्ता होता ना आले 

कामातून पोटासाठी...
मी श्रमिक झालो,  भ्रमिक झालो,  दलित झालो
पण एक समाज होता ना आले 

जगताना शेवटी ...
मी विचार झालो  , प्रकाश झालो,  संघर्ष झालो
पण एक माणुस होता ना आले 

सचिन तळे

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale