जगाच्या पाठीवरती ...
मी भारत झालो, पाक झालो, बंगाल झालो
पण एक राष्ट्र होता ना आले
धर्माच्या प्रचारासाठी...
मी हिंदू झालो, बौध्द झालो, मुस्लीम झालो
पण एक रंग होता ना आले
मी हिंदू झालो, बौध्द झालो, मुस्लीम झालो
पण एक रंग होता ना आले
राजकीय सत्तेसाठी
मी पक्ष झालो, अपक्ष झालो, लक्ष झालो
पण एक सत्ता होता ना आले
मी पक्ष झालो, अपक्ष झालो, लक्ष झालो
पण एक सत्ता होता ना आले
कामातून पोटासाठी...
मी श्रमिक झालो, भ्रमिक झालो, दलित झालो
पण एक समाज होता ना आले
मी श्रमिक झालो, भ्रमिक झालो, दलित झालो
पण एक समाज होता ना आले
जगताना शेवटी ...
मी विचार झालो , प्रकाश झालो, संघर्ष झालो
पण एक माणुस होता ना आले
मी विचार झालो , प्रकाश झालो, संघर्ष झालो
पण एक माणुस होता ना आले
No comments:
Post a Comment