Wednesday, 22 September 2021

या दुनियेच्या उकिरड्यावर

 या दुनियेच्या उकिरड्यावर 

माणूस म्हणून जगतोय माणूस 

पण त्याला काय ठाऊक 

घाणीतच रामलाय माणूस  

गर्दी ... अशुद्ध हवा अन भेसळ 

पोटासाठी कि नोटांसाठी 

त्यालाच ठाऊक नाही 

का जगतोय माणूस 

या माणसापरी शुद्ध जनावर 

जो निसर्गाच्या नियमात 

निसर्गाच्या सानिध्यात 

पण त्यालाही भीती 

ह्या उकिरड्याची 

बंदिस्त संग्रहालयाची 


सचिन तळे 



“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale