Tuesday, 30 May 2023

सेंगोल - धर्म, सत्य आणि निष्ठा -एक भारतीय संस्कृतीच प्रतीक

 

सेंगोल - धर्म, सत्य आणि निष्ठा

एक भारतीय संस्कृतीच प्रतीक

 

विरोधकांच्या प्रत्येक शब्दांवर ज्यांचं नाव आहे ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी २८ मे २०२३ रोजी भारताच्या नव्या संसदेचं उदघाटन केलं त्यासोबत ह्या नवीन संसद भवनात सभापतींच्या खुर्ची जवळ सेंगोल म्हणजेच राजदंड स्थापन केले. सेंगोल हे धर्म, सत्य आणि निष्ठा ह्या तीन तत्वांवर आधारित असून जिथे न्याय अन राजकारभार चालतो तिथे हा राजदंड स्थापन करण्याची आपली प्रथा आहे. फक्त सनातन च नाही तर नव्या संसद भवनात सर्व धर्माची प्रार्थना झाली. सर्व धर्माचे संत महात्मे तिथे उपस्तिथ होते. पण सर्वात जास्त चर्चा विरोधकांनी रंगवली ती सेंगोल ची. विरोध करणे हे विरोधकांचं कामच आहे. पण व्यक्ती द्वेषातून, पक्ष द्वेषातून सत्तेसाठी आपण कोणाचा विरोध करत आहोत इतकं हि विरोधकांना कळू नये हे शोकांतिकाच म्हणावी लागेल.

 

'सेंगोल' हा शब्द तामिळ शब्द 'सेम्माई' वरून घेण्यात आला आहे. त्याचा अर्थ नीतिपरायणता असा होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सेंगोल धारण करणार्‍या व्यक्तीला न्याय्य आणि निष्पक्षपणे राज्य करण्याचा आदेश असतो. लोकांच्या सेवेसाठी आपल्याकडे काही जबाबदारी देण्यात आली आहे हे त्याने विसरू नये म्हणून हा सेंगोल आहे. लोकसभेत बसणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ने आपली जवाबदारी जाणून काम करावे हीच त्यामागचा उद्देश मोदी यांचा असावा. चोल साम्राज्य हे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचं साम्राज्य होतं. भारतीय उपखंडात चोला हे सर्वांत जास्त काळ सत्ता गाजवणाऱ्यांपैकी एक होते. तीन तामिलकम राजांपैकी मुकुटधारी एक, आणि सोबत चेरा आणि पंड्या अशा साम्राज्याची १३ व्या शतकापर्यंत विविध प्रांतावर सत्ता होती. नवव्या शतकात चोल साम्राज्याचा उदय झाला. पुढे तेराव्या शतकापर्यंत हे साम्राज्य आता अस्तित्वात असलेल्या ११ देशांमध्ये पोहोचलं होतं. दक्षिण भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलँड, मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हीएतनाम, सिंगापूर आणि मालदीव इतक्या सगळ्या देशांमध्ये चोल साम्राज्याची पताका फडकत होती. चोल साम्राज्यच प्रतीक हे महादेव म्हणून सेंगोल म्हणजे महादेवाचा आशीर्वाद अशी धारणा त्याकाळी होती. सेंगोलच्या हस्तांतरानं चोल साम्राज्यात सत्तेचं हस्तांतर व्हायचंय.

 

कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथे काही वर्षांपूर्वी सापडलेले शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या शिल्पाच्या हातात चोल राजवटीत वापरला जाणारा राजदंड पाहायला मिळाला. चक्रेश्वरवाडी येथील हे शिल्प भग्न अवस्थेत आहे. दोन हात जोडलेल्या अशा अवस्थेतील ती सूरसुंदरीची भग्न मूर्ती आहे. जोडलेल्या हातांमध्ये वरच्या बाजूला नंदी कोरलेला अशा तऱ्हेचा राजदंड आहे. नंदी विराजमान असलेल्या राजदंड घेऊन उभे असलेले काही शिल्प आजही दक्षिण भारतात सहज पाहायला मिळतात. हिच आपल्या भारतीय इतिहासाची संस्कृतीची ओळख आहे. ती जपून ठेवणे आपले कर्तव्य.

 

देशाला स्वतंत्र मिळालं तेव्हा सत्ताहस्तांतरणाची प्रक्रिया कशी असावी हा प्रश्न उपस्तिथ राहिला. त्यासाठी देशाचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र ही प्रक्रिया नेमकी करायची कशी असा प्रश्न माऊंटबॅटन यांच्यासमोर होता. फक्त हस्तांदोलन करुन ही प्रक्रिया करावी की त्यासाठी काही तरी प्रतिकात्मक प्रक्रिया असावी अशी चर्चा सुरु झाली. तेव्हा नेहरुंनी तेव्हाचे ज्येष्ठ नेते सी राजगोपालचारी यांची भेट घेतली आणि चर्चा केली. राजगोपालचारींचा भारतीय इतिहास, संस्कृतीवर प्रंचड अभ्यास होता. दक्षिणेतल्या ऐतिहासिक चोल साम्राज्यात नव्या राजाची निवड होत असताना, पदावरुन दूर जाणारा राजा आपल्या हाताने सेंगोल म्हणजेच राजदंड पुढच्या राजाच्या हातात देतो आणि अशाच पद्धतीनं चोल साम्राज्यात शतकानुशतकं सत्तेचं हस्तांतर होत होतं. राजगोपाल यांनी सांगितलेली संकल्पना पंडित नेहरुंनाही आवडली आणि त्यांनी होकार दिला. १९४७ साली वुम्मिदी बंगारु ज्वैलर्सकडून नव्या राजदंडाची निर्मिती केली. चांदीचा दांडा त्यावर सोन्याचा पत्रा अश्या या राजदंडावर नंदीची मूर्तीही स्थापित केली. ८०० ग्राम सोन्यापासून बनवलेला हा राजदंड ५ फुटाचा आहे.

नेहरूंच्या हस्ते त्यावेळी त्याची विधिवत पूजा करण्यात आली. १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी हाच राजदंड लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या हातात दिला. अशा प्रकारे देशातल्या ब्रिटिश सत्तेचे हस्तांतर भारतीयांकडे झालं. मात्र काँग्रेस च्या काही नेत्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. पण सत्य हेच आहे कि नेहरूंना हा सेंगोल भेट म्हणून मिळाला होता, नंतर तो अलाहाबाद संग्रहालयात ठेवण्यात आला.

 

धर्म, सत्य आणि निष्ठा चं प्रतीक असलेलं आणि भारतीय इतिहासाच्या पानांवर ज्याची नोंद आहे असं हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक गेल्या ७५ वर्षांपासून एका संग्रहालयात ठेवण्यात आलं. त्याचा विसर कसा पडला. आपली संस्कृती आपली शिल्प आपली मंदिरे आपल वैभव आपण नाही टिकून ठेवणार तर कोण ठेवणार हा विचार भारतीय का करत नाहीत? इंग्रज भारत खंड सोडून गेले त्यावेळचा हा साक्षीदार आहे. ह्या सेंगोलची निर्मतीच मुळात भारताच्या सुवर्ण क्षणाचा आहे. स्वतंत्र काळातील प्रत्येक वास्तू आपण जतन करून ठेवतो त्याचा इतिहास पुढच्या पिढीला सांगतो. पण ह्या सेंगोलचा इतिहास ना आपण कधी वाचला ना अनुभवाला फक्त तो पाहिला गेला ते संग्रहालयात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातून आज भारतीय संस्कृतीचं पवित्र वास्तू सेंगोल हे भारतीय लोकशाहीच्या मंदिरात स्थानबद्ध झालं. हे खरंच प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक राजकर्त्याला राजदंड हवा. राजकर्त्यांनी राज्य करताना जनतेच्या अन राज्याच्या देशाच्या विचारातून राज्य करावे ह्याचसाठी हा राजदंड भारताच्या प्राचीन काळापासून आहे.

 

 

 

 

 

Sunday, 21 May 2023

तेजस्वी शब्दप्रतिभेचे अन काव्यप्रतिभेचे धनी - साहित्यिक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर

 


तेजस्वी शब्दप्रतिभेचे अन काव्यप्रतिभेचे धनी -

साहित्यिक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर

आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका पितृभू: पुण्यभूश्चैव वै हिंदुरिति स्मृत:

 

तात्यारावांच म्हणजेचं सावरकरांचं साहित्य हे विश्वप्रसिद्ध अन लोकप्रिय साहित्यात मोडतं. कवी, नाटककार, शाहीर, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रकार, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, इतिहासकार, पत्रकार अशा विविध भूमिकांतून त्यांनी आपली साहित्यसंपदा सृजन केली लोकार्पण केली. विचारी, क्रांतिकारी, राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठा असलेले, पुरोगामी, कर्मयोगी पुरुष म्हणून आज आपल्याला सावरकर आठवत असतील तरी साहित्यिक म्हणूनही सावरकरांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. आज हि त्यांचा साहित्याचा अभ्यास केला जातो, आजही त्यांच्या काव्याना चाल लावून ती गायली जातात, आजही सावरकरांचे काव्य मंगेशकर कुटुंबियांना आणि तमाम मराठी बांधवाना ऊर्जा देते. आजही त्यांच्या शब्दांचा अर्थ शोधण्यात त्यांना समजून घेण्यात अनेक तरुण पुढे येत आहेत. त्यांच्या साहित्यावर अन त्यांच्या कार्यकाळावर आजही साहित्य लिहिले जात आहे छापले जात आहे .

 

तात्यारावांनी मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले अन भाषाशुद्धीची एक चळवळ देखील चालवली. उर्दू भाषेत सुद्धा त्यांच्या काही गझला लिहिल्या आहेत.अंदमानपूर्व कालखंडातील कविता, अंदमानमधील कविता आणि अंदमानमधून बाहेर आल्यावर स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी लिहिलेल्या कविता अश्या तीन कालखंडात त्यांच्या कवितांचा साम्राज्य विभागलेला आहे. सावरकर हे स्वतंत्रतेचे स्तोत्र गाणारे पहिले मराठी कवी. बाल सावरकर, तरुण सावरकर, वयोवृद्ध सावरकर या सर्व अवस्थांमध्ये सावरकर लिहीत राहिले.  प्राचीन संतांच्या कविता देवभक्तांच्या होत्या आणि सावरकरांची कविता देशभक्ताची होती. आपण आरती गातो, तशी ते एका राष्ट्रपुरुषाची, श्री शिवरायाची आरती गातात. श्री शिवाजी महाराजांची आरती त्यांनी रचली.  शिवरायांच्या आरतीबरोबरच त्यांच्या वीरसेवकांचा - वीर तानाजी आणि बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा, बाजी देशपांडे यांचा पोवाडा, तानाजी-संताजी, दिल्लीच्या तक्ताची छकले करणारा सदाशिवराव भाऊ अश्या अनेक नारविणाराचे पोवाडे तात्याराव यांनी लिहिले.

 

ऐकुनिया आर्यांचा धावा महीवरला

करुणामय स्वर्गी श्रीशिवनृप गहिवरला

देशास्तव शिवनेरी घेई देहांला

देशात्सव रायगडी ठेवी देहाला

देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला

 

मातृभूमीच्या चरणी आपली स्फूर्तिप्रद तेजस्वी लेखणी, आपली ओजस्वी वाणी अर्पिलेले एक असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होते . तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण, तुज सकल चराचर शरण भारताच्या मुख्य भूमीपासून १२०० किलोमीटर दूर समुद्रात एका बेटावर लिहिलेले हे काव्य ऐकताना अंगावर शहारे येतात. सहा महिने भयाण एकांतवास, १५ -१५ दिवस हातपाय जखडून ठेवणारी दंडा-बेडी, शरीराला १२ तास भिंतीशी टांगणारी खडा-बेडी, उपासमार अश्या ह्या जन्मठेपेत हातात कागद-लेखणी नसताना बंदीखान्याच्या भिंतींत एका लोखंडी खिळ्याच्या साहाय्याने प्राण फुंकत कमला हे पाच हजार पंक्तींचे महाकाव्य त्यांनी रचले. भिंतींवर काव्य लिहावे ते आठवून खोडून पुन्हा त्याच जागेवर नव्या ओळी लिहिणे आणि जन्मठेपेतून बाहेर येता जशी च्या तशी आठवून ती कागदांवर लिहून काढावे हे कोणत्याही प्रतिभावंत साहित्यिकांस शक्य नाही. अंदमानचे फाटके आभाळ, भयाण समुद्री वारा आणि तुरूंगाधिकार्‍याचे अत्याचार ११ वर्षे भोगूनही त्यांच्या विचारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे मनसुबे आजही धुळीस मिळत आहेत. त्यांनी लिहिलेले " सहा सोनेरी पाने " हे पुस्तक प्रत्येक भारतीयांनी वाचून समजून घेणे गरजेचे आहे. भारताच्या सुरवातीचा कालखंड पासून इंग्रजांच्या कालखंडाचा इतिहास म्हणजे हे पुस्तक.

 

नाटककार म्हणून उःशाप हे सावरकरांचे पहिले नाटक. या नाटकाचा गाभा आणि आशय हा अस्पृश्यता निवारण, दलित वर्गाचा उध्दार, जातीपातींचे उच्छेदन, समरस समाजाचे निर्माण हा होता. संन्यस्त खड्ग हे दुसरे नाटक सावरकरांनी भगवान गौतम बुध्दांच्या जीवनाच्या पार्श्‍वभूमीवर लिहिलेले आहे. कादंबरीकार म्हणून काळे पाणी मला काय त्याचे?’ या त्यांच्या कादंबऱ्या आत्मानुभव मांडणारी ग्रंथ. ‘गोमांतक,‘सप्तर्षी,‘रानफुले,‘सावरकरांची कविता, ‘कमला, ‘अग्निजा, ‘मूर्ती दुजी ती, ‘सावरकरांच्या अप्रसिध्द कविता, ‘अग्निनृत्य, ‘कुसुमसंचय इत्यादी काव्य सावरकरांनी लिहिले. सत्तावनचे स्वातंत्र्यसमर लिहून त्यांनी राष्ट्रवादी इतिहास लेखनात मोलाचे योगदान दिले. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेतील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्याच्या कलमामुळे आनंद होऊन सावरकरांनी जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेख हा लेख लिहिला.

 

हे फक्त साहित्यातून मांडलेलं सावरकर आहेत अश्या अनेक भूमिकेतून आपल्याला सावरकर भेटतील फक्त सावरकर वाचता आणि समजून घेता आले पाहिजे.  गांधींच्या चष्मेत्यातून तुम्हाला सावरकर नक्कीच वेगळे दिसतील पण स्वतःच्या अंतर्मनातून अभ्यासातून जर सावरकर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ज्या प्रकारे सावरकर तुम्हाला दाखवले गेले, तसे ते मुळीच नाही हेच तुम्हाला दिसून येईल. राजकीय तत्वज्ञानात उपयुक्ततावाद, तर्कवाद, मानवतावाद, वैश्विकता, पुरोगामित्व वास्तवतावाद यांचा संगम सावरकर आहेत. सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. सावरकरांचे कार्य जनेतुपुढे आणणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत.  आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. अश्या महान स्वातंत्र्यवीरांला भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे म्हणून गेली अनेक वर्ष काही सावरकर प्रेमी सरकारशी वादविवाद करताना दिसून येतात. साहित्यिक तात्यारावांना त्यांच्या जयंती निम्मित विनम्र आदरांजली.

 

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला

 

भूमातेच्या चरणतला तुज धूतां मीं नित्य पाहिला होता

मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू

तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें परि तुवां वचन तिज दिधलें

मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन त्वरित या परत आणीन

विश्वसलो या तव वचनी मी

जगदनुभव-योगे बनुनी मी

तव अधिक शक्त उद्धरणी मी

येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला सागरा, प्राण तळमळला

 

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं ही फसगत झाली तैशी

भूविरह कसा सतत साहु यापुढती दशदिशा तमोमय होती

गुण-सुमनें मी वेचियली या भावें कीं तिने सुगंधा घ्यावें

जरि उद्धरणी व्यय तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा

ती आम्रवृक्षवत्सलता रे

नवकुसुमयुता त्या सुलता रे

तो बाल गुलाबही आता रे

फुलबाग मला हाय पारखा झाला सागरा, प्राण तळमळला

 

नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा

प्रासाद इथे भव्य परि मज भारी आईची झोपडी प्यारी

तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा वनवास तिच्या जरि वनिंच्या

भुलविणें व्यर्थ हें आता रे

बहु जिवलग गमतें चित्ता रे

तुज सरित्पते ! जी सरिता रे

त्वद्विरहाची शपथ घालितो तुजला सागरा, प्राण तळमळला

 

या फेन-मिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा?

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिउनि का आंग्लभूमीतें

मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी मज विवासनातें देशी

तरि आंग्लभूमी-भयभीता रे

अबला माझिही माता रे

कथिल हें अगस्तिस आता रे

जो आचमनी एक क्षणीं तुज प्याला सागरा, प्राण तळमळला

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale