Thursday, 17 August 2023

सचिन तळे लिखित "दरवळ : मराठी साहित्य संस्थांचा " या पुस्तकाचे प्रकाशन सन्मानीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि विधानपरिषेदेचे उपसभापती सन्मानीय नीलम ताई गोऱ्हे यांच्या हस्ते पार पडले.

Book Name: 'Darval: Marathi Sahitya Sansthancha'

Author: Sachin Krishna Tale

Publisher: Vallari Publications

Number of Pages : 176

Original Price: ₹250/ (Refer below link's for discounts)

 

The book 'Darval: Marathi Sahitya Sansthancha' written by Sachin Tale, It was released by Mr. Chief Minister Eknath shinde and Legislative Council Deputy Chairman Dr. Neelam Tai Gorha on 15th August at Sahyadri Guest House, Mumbai. On this occasion, Guardian Minister of Mumbai suburb Mangalprabhat Lodha and Chitratai Wagh were present.

 

What will be read in this book:

Information about 50 Marathi organizations and 100 Marathi literature conferences working all over India including Maharashtra can be read in this book. In this book you will get to read anecdotes, how organizations dedicated to Marathi language.. were established and how they are functioning. Marathi Sahitya Sammelan is a platform that everyone wants, in this book you will get brief information about 100 different Marathi Sahitya Sammelan. This is an informative book for those living in Maharashtra.

 

The book has received a greeting letter from Hon. Chief Minister Shri. Eknath Shinde, Hon. Deputy Chief Minister Shri. Devendra Fadnavis and Hon. Special Task Officer Mr. Mangesh Chivate. The Chief Minister expressed his belief that this book will be useful for Marathi people as a reference book.





 















Thursday, 10 August 2023

काळजी वाढवणारी बातमी, कोविड नंतर इरिस ची भीती

 


काळजी वाढवणारी बातमीकोविड नंतर इरिस ची भीती

कोविड महामारीत चीनच नव्हे तर जगभरात कोरोना ह्या संसर्गाने धुमाकूळ घातला होता. अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. स्माशानभूमी २४ तास जळत राहिली. चार भिंतीत माणसांनी स्वतःला कोंडून घेतलं. होत च नव्हतं झालं. डोळ्यातल्या अश्रूंना थांब म्हणावं तरी कसं, असा प्रश्नच काहींच्या समोर उभा राहिला होता. डोळ्यासमोर चालणारी बोलणारी माणसं हरवून जात होती. हॉस्पिटल मध्ये डॉक्टर कमी पडत होते. उपचारासाठी औषध नाही. काम धंदा सर्व काही ठप्प पडलं होत. लॉकडाऊन चा तो काळ आठवला कि आजही अंगावर काटे येतात. अश्या ह्या भयाण नकोसा वाटणारा हा काळ पुन्हा आपल्या अवतीभवती डोकावत असेल तर आपण आताच सावध झालं पाहिजे. कारण काळजी वाढवणारी बातमी आहे, कोविड नंतर इरिस ह्या नव्या विषाणूने बाधित काही रुग्ण आपल्या राज्यात सापडली आहेत. सध्यातरी भारतात या विषाणूने कोणतीही जीवितहानी झालेली नाही तरी हि काळजी घेणे हि आपली जवाबदारी आहे.

मार्च २०२० रोजी महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण पुण्यामध्ये आढळून आला होता. त्यानंतर याचा व्हेरिएंट इरिस राज्यात दाखल झाला आहे. युनायटेड किंगडममध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढला असून हा विषाणू मोठ्या प्रमाणात आपले हातपाय पसरवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या नव्या व्हेरिएंटचे नाव ईजी.. असे आहे, त्याला इरिस असं टोपणनाव देण्यात आलं आहे. यूकेतील सातपैकी एका रुग्णाला या व्हेरिएंटची लागण झालीये. युकेत १४ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना इरिस विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर येतीय. इरिस विषाणूचे रुग्ण केवळ यूकेमध्येच नाही तर अमेरिका आणि जपानमध्येही आढळून आले आहेत. त्यामुळे जगभरात या विषाणूची लागण झालेले रुग्ण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्रिटनमध्ये सध्या ओमायक्रॉनचा उपप्रकार ईजी.. चा संसर्ग वाढला असल्याने, जागतिक आरोग्य संघटनेने ब्रिटनला दक्षतेचा इशारा दिला आहे. डॉ. राजेश कार्यकर्ते, (समन्वयक, जनुकीय रचना तपासणी प्रयोगशाळा ) यांच्या म्हणण्यानुसार ओमायक्रॉनचा उपप्रकार एरीस हा मे महिन्यात महाराष्ट्रात सापडला होता. त्यानंतर करोना संसर्गात फारशी वाढ नोंदविण्यात आलेली नाही. याचबरोबर नंतरच्या काळात संपूर्ण देशभरात या उपप्रकाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

 

विषाणू हा एक अत्यंत सूक्ष्म असा निर्जीव घटक आहे तो इतर सजीव पेशींना संसर्ग करतो. कोरोना महामारींनंतर जगभरात संशोधन करणाऱ्या प्रयोग शांळांची सख्या झपाट्याने वाढत आहे. याच प्रयोगशाळा जगासाठी डोकेदुखी ठरु शकतात. किंग्ज कॉलेज लंडनच्या तज्ज्ञांनी जगभरातील अशा २७ प्रयोगशाळांची माहिती दिली आहे.  जगभरातील अनेक प्रयोगशाळांमध्ये घातक विषाणू, जीवाणूंवर संशोधन सुरू असल्याने, या प्रयोगशाळेतून भविष्यात कोरोनापेक्षा धोकादायक विषाणूंचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आशियामध्ये अशा २० प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी ११ चीनमध्ये आहेत. यासह भारत, कझाकस्तान, तैवान, फिलीपिन्स, सौदी अरेबिया, सिंगापूर आणि जपानमध्ये देखील या प्रयोगशाळा आहेत. उत्तर अमेरिकेत १५ बायोलॅब आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये चार हायरिस्क प्रयोगशाळा आहेत. ह्या सर्व प्रयोगशाळा जरी मानवांच्या संरक्षणासाठी असल्या तरी ह्या प्रयोगशाळेतून एखादा तरी विषाणू जनसम्पर्कात आला तर कोरोना सारखीच जीवितहानी होण्याची मोठी भीती असते.

या व्हेरिएंटची लक्षणे मागील व्हेरिएंटपेक्षा फार वेगळी नाहीत. यात ताप येणे, सर्दी होणे, घशात खरखर, अंगदुखी अशी लक्षणं आढळून येतात असं तज्ञांचं म्हणणं आहे. अशी लक्षणे आढळ्यास  उपाय आपण कोरोना काळात केले तेच उपाय आणि खबरदारी घेणे गरजेचं आहे. तुम्हाला दिसत असलेल्या वरच्या कोणत्याही लक्षणाची गंभीरता आधी पाहा. जर, अगदीच असह्य होत असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. पण, फार गंभीर लक्षणं नसतील तर विचार करून घाबरता कुटुंबीयांच्या सल्ल्याने पुढची पावलं टाका. लोकांच्या संपर्कांत राहणे टाळा. सध्या मोठ्याप्रमाणात डोळ्याची साथ पसरली आहे. कोरोना हा विषय आता आपल्यासाठी संपला असच गृहीत धरून लोक बाहेर वावरताना दिसत आहेत. ह्या दूषित वातावरणात मास्क का गरजेचं आहे? सेनिटायझर ने हात का स्वच्छ करावे  ? हे लोक विसरलीत. पण, याच विषाणू मुळे एड्स , कांजण्या येणे , कोरोना, गालफुगी ,गोवर ,  डोळे येणे, देवी , पोलिओ , रूबेला, विषमज्वर, हेपॅटायटिस अन स्वाईन फ्लू सारखे आजार होतात. त्यामुळे काळजी घ्या तुमची स्वतःची , स्वतःच्या परिवाराची अन समाजाची.

 

सचिन कृष्णा तळे

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale