Thursday, 2 March 2017

साधका

साधका .. 

मीच आहे येथला कर्ता सवरता 
दे खुशाली उद्याची चालता चालता 

थांबून जा ,वाट जरा पाहून जा !
चर्चेला ह्या रंग थोडा चढता चढता 

कालची बातमी ती होती जुनी 
कळाले आज सहज वाचता वाचता 

झाकली मुठ त्यांनी घेवून सत्ता 
रोज नवी योजना राबवता राबवता 

ज्ञानेशाची भिंत आता कोण चालवेल 
एका समाजाला हिंसेने छळता छळता

तुकोबाच्या मृतूचा चा शोध लावा 
अभंगाला इंद्रायणीत बुडवता बुडवता 

शिक्षक आता ऑनलाईन भेटू लागले 
"धडे इंटरनेटचे..  गिरवता गिरवता "

साधका, वाचका ह्या देशा साठी रे 
देवून जा योगदान मरता मरता  

- सचिन कृष्णा तळे , पुणे 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale