मतदार राजा..
मी थाबंलीय..
तुझी वाट पाहत
न्याया साठी
माझ्या अस्तित्वासाठी
तू येशील ..
हो तु येणार ..
तुझ्या विचाराने ..
सर्वांच्या एकजुटीने
तुझ्या एका मताने ..
मला स्वतंत्र करण्यासाठी
मला पिजंर्यातून सोडवण्यासाठी
बघ माझ्याकडे..
माझी ओळख पटतीय का?
चिखलात माखलीय रे ...मी ...
पैशात विकली गेलीय रे ...मी...
खोट्या आश्वासनात अडकलीय मी..
भ्रष्टाचारात पाय अडकलाय माझा
गुंडाच्या खिशात तर ...
तर ..कधी..
राजकीयांच्या तिजोरीत ..
जीव गुदमरतोय रे माझा..
रंगीबेरंगी चिंध्यात लटकवल जातय मला
जातीधर्मात बाटगी झालीय मी
अशुध्द झालीय मी...
फक्त आणि फक्त...
बंदिस्त आहे ते तुझ्या मतांच्या पेटीत...
पण ...
कदाचित आता माझ्यावर
तुझा विश्वास सुध्दा नसेल...
आरे ओळख मला ..
कधी वादळाचे रूप होते मी
कधी अनेकतेतून एकतेची मिसाल होते मी
तर कधी...
शाहू, फुले, आंबेडकरी चळवळ ही मीच
संसद पासून ते विधानभवनचा ...
आवाज ही मीच
लोकतंत्र व सविंधान ही मीच..
सर्व जातीधर्माला सामावुन घेणारी...
हक्कासाठी भांडणारी ..
जिच्यासाठी तू वर्षानूवर्ष लढला
जिच्यासाठी तू तूझ रक्त सांडलस
आंदोलने केलीस ...
सुर्यासारखा तळपलास...
आणि ..आरे आज मी ...
कोणत्या अवस्थेत आहे
पाहतोयस ना ...मला
अनुभवतोयस ना .. मला
रस्त्यावरील खड्डे..
सुविधाच्या नावावर असुविधा
ईट येउ लागलाय मला
चिड चिड होतीय माझी
फुकट नाही मिळाली रे मी तुला
आज कितेक देश माझ्या पदरसाठी लढतायत
तरी ही आज माझी किमंत ठरवली जाते
पाचशे हजारात विकत घेतल जात मला
या देशात...राज्यात ...गावात ...शहरात...
यात्रेच्या नावावर ...
पार्टीच्या नावावर ...
पोस्टरबाजीत ...
सडवल जातय रे मला ...
मला विकासात कोणी गीणतीच करत नाही
माझी भुक व माझ जन्म ...फक्त
तुझ्या विकासासाठी झालाय
या देशातल्या गोरगरीबांसाठी झालाय...
श्रीमंत व श्रमिक ह्यातला दुरावा
नाहीसा करण्यासाठी झालाय ...
खुप कष्ट सहन केलेत तुझ्या पिढीने..
या देशाने ...
आता तरी तूला माझी आेळख पटली असेल
मी कोण?
मी ... लोकशाही
"लोकशाही "हेच नाव दिलंस तू मला
ह्याच नावाने ओळखतात मला
माझी यातना ऐकून घे
चूकू नकोस ...
वेळ आलीय ... संधी आलीय..पन्हा
सच्चा हो ...
ह्या लढवय्या ,अखंड व विशाल भारताचा
खरा नागरिक हो...
उठ ... तोड ती राजकीय जंझीर
मुक्त हो ..
व उघड्या डोऴ्याने बघ ...
मी तुझा अधिकार आहे...
तुझा विकास आहे...
हिच संधी आहे ...
तुझ्या हक्कासाठी
तुझ्या विकासाला प्रगतीच्या दिशेने सुसाट सुटण्याची
ते भुरळ घालत आहे...
तुला चकवा देत आहे ...
तुला खोटे आमिष दाखवुन
वर्षानुवर्ष फसवत आहे...
लोकशाही चे ते स्तंभ हि आज मोडकळीस आलेत रे
आज माझ्यासाठी
कितेक तरून निवडणुकीत उभे राहू ईच्छूक आहेत
त्यांच्या कडे जरा नजर टाक
नजर टाक जे खरे कार्यकर्ते आहेत माझे
व खरा मतदार हो
ह्या लोकशाहीचा...
ह्या भारताचा ...
सचिन कृष्णा तळे, पुणे
शिवणे
7709099646
No comments:
Post a Comment