Wednesday, 30 October 2019

बापासमोर बाप होऊन बघा




ज्या वेळी आपण वयात येतो तेव्हा आपले आई वडील आणि वडीलधारे माणसं आपल्याला जे सांगत असतात ते आपण कधीच ऐकत नाही ,लक्ष देत नाही किंवा त्यावर विचार करत नाही . कारण ते वयचं तस असतं. त्या वयात जवाबदारी म्हणजे नक्की काय हे समजण थोडस अवघड जात,कारण आपल्या पाठीशी बाप नावाचा एक वटवृक्ष खंबीर उभा असतो. जेव्हा ते छत्र हरवरून जात तेव्हा आणि जेव्हा परिवार सांभाळण्याची जवाबदारी अंगावर येते तेव्हा येणारे आव्हान हे खूप शिकण्यासारखे आणि स्वतःला सिद्ध करण्यासारखे आणि विसरणारे अनुभव असतात

ह्या नोव्हेंबर मध्ये माझ्या वडिलांना जाऊन वर्ष होतील तरीही त्यांची कमी आज हि भासतीय. माझ्या वडिलांचा हा अचानक निरोप आणि त्याच महिन्यात बहिणीचं लग्न आणि माझी पुण्यातील नोकरी सांभाळणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होत. माझं संपूर्ण परिवार मुंबईत आणि मी पुण्यात होतो . लग्नाचे घर म्हणजे आनंदी वातावरण त्यात हे आभाळ कोसळलं. मंदीचा काळ सुरु होता. नोकरी टिकवणे गरजेचं होत. माझ्या आणि माझ्या आईसमोर खूप प्रश्न उभे राहिले. घर सावरून बहिणीचं लग्न पार पाडण्यासाठी नोकरी सोडावी लागली. हातावर पोट भरणार आमचं घर ,कोणाचा हि आर्थिक हात पाठीशी नव्हता. जेव्हा हातपाय चालवू तेव्हा भाकरी. फक्त प्रयत्न आणि धडपड होतीघरातलं ते पहिलं लग्न, ना मला ना माझ्या आईला अनुभव फक्त पाठीशी देव होता असं म्हणावं लागेल. लग्नाचे दिवस जवळ येत होते , पत्रिकेवर वडिलांच्या नावापुढे श्री हे नाव खोडून कै लावताण काळीज रडत होत. पत्रिका वाटली जमेल तस नाती जपली. लग्न कसबस पार पडलं थोड्या चुका झाल्या कारण माझ आभाळ माझ्या मदतीस नव्हता. बाहिनेने उंबरटा ओलांडला आणि सासरी गेली , पाहुणे आपापल्या घरी गेले , राहिले होतो फक्त मी माझी आई आणि तो काळ आणि काही आठवणी. त्या प्रत्येक क्षणाक्षणाला बाप नावाची कमतरता आणि बापाच्या जागेवर स्वतःला उभा करत होतो.

पुढे तिथून नोकरी चा शोध सुरु झाला , सहा सात महिने नोकरीच्या शोधात होतो . जवाबदारी वाढली होती. घरात पैश्याची कमतरता  भासू लागली. मुंबई हुन पुण्यात सगळं घर उचलून आणलं होत. त्यातच पुन्हा मुंबईत नोकरी मिळाली . पुन्हा मुंबईत भाड्यावर घर पाहिलं आणि घर शिफ्ट करणार तेवढ्यात पुण्यात नोकरी मिळाली.  मुंबईतून पुण्यात स्थलांतर झालो. दिवस गेले आणि त्याच दिवसात मी पुन्हा उभा राहिलो एक बाप म्हणून

आज बाप आणि त्याची भूमिका पार पडताना जवाबदारी कळू लागली. वडिलांचे ते शब्द आठवू लागले. त्यांची भूमिका समजू लागली. घरात कर्ता कमवता पुरुष जातो तेव्हा त्या घरात काय दिवस असतात हे समजू लागलं

ह्याच संकटांमुळे आणि स्थलांतर मुळे राजकीय आणि सामाजिक कार्य  थांबवावे लागले. जिथे आपण लहानाचे मोठे होतो कार्य करतो स्थानिक होतो तिथे कार्य करणे, स्वतःची ओळख निर्माण करणे फार सोपं जात. पण जेव्हा आपण दुसऱ्या ठिकाणी जातो तिथे राहतो वास्तव करतो तेव्हा तिथे स्थानिक होऊन पुन्हा कार्यास प्रारंभ करणे फार अवघड जात.
वृत्तपत्रात माझ्या प्रत्येक कार्याची दाखल घेतली जात होती, कारण माझा एक परिवार तयार होता आणि तसाच एक परिवार इथे तयार करणे तिथे घेतलेली मेहनत पुन्हा इथे नव्याने करणे हे माझ्या साठी पुन्हा एक मोठं आव्हान आहे. शून्यातून पुन्हा सुरुवात. खरतर वडिलांचे ते राजकीय आणि सामाजिक विचारांवर मी पुन्हा स्वतःची ओळख निर्माण करतोय आणि धडपडतोय. घर सांभाळत स्वतःची लेखणी चालू ठेवत भोवताली असणार राजकीय सामाजिक वातावरणचा अभ्यास करत आणि नाती मैत्री धरून नोकरी च्या मदतीने घडण्याचा प्रयन्त करतोय शिकतोय. हे आव्हान आणि त्यावर मात करण्यासाठी माझी आई आणि एक मावस भाऊ आणि काही माणसं मला सोबती मिळालीत्यानंतर हि बरीच छोटी मोठी आव्हाने आली . खुप वेळा एकटा पडलो .

आज समाजात सामाजिक कार्यरता म्हणून , लेखक म्हणून , कवी गीतकार म्हणून तर एक राजकीय व्यक्ती म्हणून माझी ओळख असली तरी त्यासोबत मी एक बाप म्हणून माझी भूमिका पार पडण्याचा पर्यंत करतोय. वेळ काळ कधीच सांगून येत नाही त्यासाठी स्वतःहून खंबीर उभं राहणे खूप गरजेचं आहे. आणि त्याहून जास्त गरजेचं आहे ते तरुण वयात मित्रांमध्ये वेळ घालवता बापासमोर बाप होऊन बघा तुमच्यात खूप मोठा फरक जाणवले

सचिन कृष्णा तळे 
कात्रज पुणे 
७७०९०९९६४६


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale