" विक्या
… संमेलन लैच्या लैचं … राजकारणी
झालं रं "
" साहित्यिक
, लेखक , नामवंत कवी आणिक
कथाकार कमी दिसले
व राजकीय रुसवा
फुगवी जास्त दिसली
"
" हो रे , दाद्या
… "
" सर्व
काही सबनीसांचा आशीर्वाद
… "
" सबनीस अध्यक्ष झाले
आन वादाला तोंडच
फुटलं "
" पण
.. यंदाच्या साहित्य संमेलनाला काळ
फासलं … अध्यक्षांनी "
" ते कसं
रे …. दाद्या "
"पुण्यातून प्रकाशित
होणाऱ्या ' साहित्य चपराक ' चे
अंक जप्त केले
गेले "
" बाबो
… पण का रे
दाद्या "
" आरे
त्यांनी सबनीसांचा खरा मुखवटा
जनतेसमोर आणला म्हणून
"
" हो का … "
" म्हणून
पवार साहेबांनी … निवडणूक
प्रक्रिया बदली पाहिजे
आस सांगितलं . "
" म्हंजी
साहेबानाही माहित होत , की
समेलन अध्यक्ष निवड
ही चुकली करून
… "
" विक्या
… संमेलन अध्यक्ष नि २००
पाणी पुस्तकी भाषण
लिहिलं होत …"
" म्हणून
लय लोकांनी अध्यक्ष
भाषण च्या वेळी
निघून गेले , आपल्या
मुख्यमंत्री नी ही
कल्टी हाणली . "
" दाद्या
… आता अध्यक्ष दोनशे पाणी
भाषण वाचणार म्हणजे
किती टाईमं लागेल
रे … व्यतागतील की
लोकं "
" हा हा हा
… "
" विक्या
पण मला एक
सांग … तू संमेलनात
गेल्ता ना … कविता
सादर करायला "
" हो रे … गेल्तो
की दाद्या "
" आरे
मग तिथे , मराठीत
कविता किवा गझल
सादर झाली नाही
का "
" झाली
की … बरेच कवी
आलते … छान झाला
कार्यक्रम "
" आरे
विक्या … त्या मिडिया
वाल्यांनी ते दाखवलंच
नाही रे "
" फक्त
आणि फक्त गुलजार
एके गुलजार चाच
पाढा दाखवलं … "
" जाऊ
दे ना … दाद्या
"
" ह्या
मिडिया वाल्यांना … मराठीचं कधी
कौतुक होत कां
… आणि ह्यांच्या कडून
अपेक्षा तरी का
ठेवावी "
"ते खर हाय
रं … आता मोठ्या
साहेबांच्या सैनिकांनी ही संमेलनाला
पाठ फिरवली म्हणे
"
" हो रे विक्या
… उद्धव साहेबाना आमत्रण पत्रिका
मिळाली नाही म्हणून
सर्व शिव सैनिक
रागावलेत "
" कमळाबाई
तर आधीच रागात
होती "
"त्यात
आपल्या आशा ताई
ही … संमेलनात जावून
फसल्या "
"त्यांना
संमेलनाची चातुराई कळताच … कार्यक्रम
मधेच थांबवला . "
"दाद्या
… म्हंजी लैच गोंधळ
की … "
" साहित्य
संमेलन म्हणजे …. सरस्वतीचा हा
गोंधळचं की … विक्या
… अध्यक्ष स्थानी दैत्य बसले
तर गोंधळ हा
होणारच की "
" त्यात… टोले
बाजी चांगलीच झाली
… "
" पण काहीही म्हण विक्या
… आपल्या मराठी जनतेने संमेलनाला
पाठ नाही फिरवली
"
" मानपान
न बघत त्यांनी
… खूप छान प्रतिसाद
दिला … घुमान पेक्ष्या हि
जास्त … काय ती
अफाट गर्दी होती
संमेलनात … पुस्तकांची विक्री ही
चांगली झाली . प्रकाशकांना नक्कीच
आवडलं असेल . "
" हो रे दाद्या
… त्यात मान्यवरांचे संवाद व
मुलाखती प्रेरणा दाई ठरलं
"
"विक्या
… फक्त
राजकीय लोक सोडली
तर एकंदरीत कार्यक्रम
छान झाला … "
" हो ते तर
खर आहे … दाद्या… ही
शोकांतिका म्हणावी लागेल साहित्याची
"
" म्हणजे
माझ्या सारख्या नवोदित मंडळी
जे साहित्य कडे
करियर म्हणून पाहतायत
… ते …हे असले दरोडेशाई
राजकारण पाहिलं तर कोण
येणार रे पुढे
"
“ पत्रकार राजू परोळीकर
सरांचं … फेसबुक अकौंट ही
ब्लॉक केलं … अध्यक्षांच्या
पिलानी "
"खर हाय विक्या
… मुळात मला ही
हाच प्रश्न पडतो
… "
" आज साहित्य राजकारणात आहे
की राजकीय साहित्यात "
सचिन कृष्णा तळे ( पुणे
)

No comments:
Post a Comment