Monday, 22 November 2021

जाणून घ्या भारतातली सर्वात स्वस्त इलेकट्रीक कार कोणत्या ?

 

जाणून घ्या भारतातली सर्वात स्वस्त इलेकट्रीक कार कोणत्या ?

पेट्रोल डीझेल महाग झालंय अन CNG सुद्धा १०० च्या दिशने वाटचाल करत आहे अश्या अवस्थेत पर्यायी मार्ग हवाच. जो आपल्या खिश्याला परवडेल. इंधन चा तुडवडा अन हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पेट्रोल डीझेल ला पर्याय म्हणून आपल्याला CNG हा पर्याय उपलब्ध झाला अन लोकांनी मनसोक्त प्रवास केला ते हि कमी खर्चात. जर CNG पेक्ष्या कमी खर्चात तुम्हाला प्रवास करायचा असेल तर ते आता शक्य आहे. ज्यात तुम्हाला  १ किलोमीटर च्या प्रवासासाठी फक्त १ रुपये मोजावे लागणार आहे.  मग हा पर्याय कोणता चला ते पाहूया..

भारता बाहेर अनेक देशात पेट्रोल अन डिझेल चे पंप बंद होत आहे. विद्यमान कॅबिनेट मंत्री गडकरी ह्यांनी सुद्धा एका सभेत हीच ईच्छा व्यक्त केली कि देशातली पंप बंद व्हावे पण ते इतक्यात शक्य नाही. कारण सर्वात मोठा फ़ंड हा ह्याच माध्यमातून सरकार ला मिळत असतो. तर हा पर्याय म्हणजे इलेक्ट्रिक वाहन आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेकट्रीक वाहने रस्त्यावर धावताना दिसतील आणि ती धावत देखील आहेत.  इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक विचारात होते काळजीत होते, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत. सध्या ह्या मार्केट मध्ये टाटा , एमजी, ह्युंडई , महिंद्रा ह्याची वाहने आहेत आणि लवकरच मारुती सुद्धा ह्या मार्केट मध्ये उतरण्याच्या तयारीत आहे.

सर्वात स्वस्त इलेकट्रीक वाहन चा विचार केला तर टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक , टाटा टिगॉर अन महिंद्रा ची ई-व्हेरिटो आहे. चांगल्या सेफ्टी सहित कमी खर्चात हि कार आपल्याला उपलब्द होते .  भारतीय बाजारात महिंद्रा ई-व्हेरिटो हि 9.13 लाख ते 11.6 लाख रुपयांदरम्यान आहे जी सिंगल चार्जवर कार 181 किलोमीटरपर्यंत धावते. या कारमध्ये 21.2 kWh लिथियम ऑयन बॅटरी देण्यात आली आहे. टाटा Tigor EV ची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते  टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 13.99 लाख रुपये ते 16.25 लाख रुपयांपर्यंत आहे. फुल चार्ज झाल्यानंतर टाटा नेक्सॉन 312km पर्यंत धावू शकते. तर टाटा Tigor EV ही कार सिंगल चार्जवर 250 किमीपर्यंतची रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.

मग वाट कसली पाहताय आजच आपली EV बुक करा अन पर्यावरण वाचावा. चांगले भविष्य आपल्या हातात आहे.

 

सचिन तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale