भारताची राजधानी
दिल्ली आज पुन्हा लॉक डाऊन च्या पायरीवर उभी आहे ती कॉवीड १९ मुळे नाही तर आपल्याच
आरामाच्या स्टेटसला शोभणाऱ्या चार चाकी वाहनांमुळे, इंधनाचे अतिप्रमाणात जळण्यामुळे
, वाढते बांधकामामुळे.. हो दिल्लीत वायू प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात वाढलंय. दिल्लीने
४७१ सह सर्वात वाईट वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) पातळी नोंदवली आहे. सेंटर फॉर सायन्स
अँड एनव्हायर्नमेंट (सीएसई) संस्थेच्या अहवाला नुसार वायू प्रदूषणामुळे दरवर्षी १० ते ३० हजार लोकांचा मृत्यू होतो. खरतर वायू प्रदूषण
मुळे आपल्या आयुष्यातील १० ते २० वर्ष कमी होतात. वायू प्रदूषणाने श्वासाचे रोग, हृदयरोग,
ब्राँकायटिस, फुफ्फुसाचा कर्करोग अश्या आजारांना आपण निमंत्रित करत असतो. वाढत्या लोकसंख्या
सॊबत रोज वाढणारे वायू प्रदूषण येत्या काही दिवसात भारताला डोकेदुखी ठरणार ह्यात शंका नसावी. नित्कृष्ट दर्जाच्या हवेमुळे
अनेक लोक शहर सोडून थोडं शहरापासून लांब जाण्याचा
प्रयत्न करत आहेत परत्नू हा त्यावर उपाय नाही
त्यासाठी क्रांती अन कडक धोरणे राबवणे गरजेचे आहेत. वायू प्रदूषण ही केवळ शहरी भागातील
समस्या नाही ती आता गावात हि पोहचली आहे .
चिंताजनक
बाब म्हणजे आपल्या राज्याची राजधानी मुंबई आणि काही शहरे हि सुद्धा ह्याच मार्गावर
आहेत. मुंबई अन मुंबईच्या उपनगर भागात सुद्धा सर्वात वाईट वायु गुणवत्ता निर्देशांक
(AQI) पातळी नोंदवली गेली आहे. जास्त लोकवस्ती, अशुद्ध हवा आणि ऑक्सिजन ची कमतरता भविष्यात
मोठा स्फोट घडवू शकतो. ज्याची आपण आता कल्पना करू शकत नाही. फक्त वाहनच नाही तर वायू
प्रदूषण ला अजूनही काही घटक कारणीभूत आहेत आणि त्यावर मात करायची असेल अन आपली भावी
पिढी जर चांगल्या वातावरणात राहावी अशी ईच्छा असेल तर सरकारची वाट न पाहता आपल्यालाच
पुढाकार घ्यावा लागेल. शहरीकरणाच्या नादात आपण आजवर अनेक जंगल नष्ट केली. फक्त झाडे
लावली कि वायू प्रदूषण रोखता येईल हा गैरसमज आहे. हा गैरसमज खोडून आपण वायू प्रदूषण
रोखण्यासाठी अजून काय करू शकतो ह्याचा विचार झाला पाहिजे. तज्ञांनी विचारवंतांनी आपले
विचार मांडत जनजगृती करावी अन सरकारने सहकार्य करावं हि अपेक्षा. वायू प्रदूषण कोणकोणत्या
घटकामुळ निर्माण होतात ह्याची माहिती त्याबाबतची
जाहिराती येणे गरजेचे आहे .
आपल्या डोळ्यसमोरच
एक छोटंसं उदाहरण म्हणजे कोविड १९ मुळे गेल्या वर्षी राबवण्यात आलेले कडक लॉक डाऊन.
जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर लॉक डाऊन च्या काळात रस्त्यावर वाहने नव्हती , कारखाने
बंद होती त्या काळात वायू प्रदूषण खूप कमी झालं होत. वायू ची गुणवत्ता हि सुधारलेली
होती. ह्याचा अर्थ असा नाही कि वाहन वापरू नये , कारखाने बंद ठेवावी. वायू प्रदूषण
च्या या संकटात आपण फक्त वाहनामार्फत निर्माण होणार प्रदूषण रोखू शकलो नियंत्रित करू
शकलो तरी आपण चांगल्या वातावरणात राहू. पेट्रोल आणि डिझेल च्या उपयोग ने आपल्या आसपास
किती वायू प्रदूषण होतंय हे सगळ्यांना माहित आहे पण आपल्याकडे पर्याय नाही. CNG हा
पर्याय आहे आणि आता इलेक्ट्रिक हा पर्याय आपल्या समोर उभा राहतोय. सध्या हवे त्या प्रमाणात
इलेक्ट्रिक स्टेशन नाहीत . CNG चा पुरवठा सुद्धा कमी आहे . पण CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांची
डिमांड आपण वाढवू शकतो . जर डिमांड वाढवली तर सप्लाय वाढतो आणि सप्लाय सोबत सर्विस
सुद्धा मिळू लागते.
वायू प्रदूषण
ला आपण नियंत्रित करू शकतो. आपण शुद्ध हवेत चांगल्या अन निरोगी आयुष्य जगू शकतो फक्त
बदल घडवण्याची तयारी हवी.
सचिन कृष्णा
तळे
No comments:
Post a Comment