ग्रंथालय
संचालनालय
ग्रंथालयाचा
मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण
आहे. आधुनिक काळात ग्रंथालयांची संकल्पना बदलून ते माहितीचे देवाण
- घेवाण करणारी संस्था अशी झाली आहे. आज शासकीय स्तरावर
देखील ग्रंथालयाची चळवळ उभारली जात आहे. आज वैयक्तिक स्तरावर
देखील ग्रंथालय तयार केली जातात. व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत
ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्त्व
अनन्यसाधारण असे आहे. माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासा पूर्तीचे उत्कृष्ट साधन म्हणून ग्रंथांची उपयोगितता सर्वश्रुत आहे. म्हणूनच बौद्धीक विकासाचे शक्तीकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जा केंद्र म्हणून सार्वजनिक ग्रंथालयांची नितांत आवश्यकता आहे. ह्याच उद्दिष्टेवर महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967ची अंमलबजावणी करण्याकरिता
या अधिनियमातील तरतुदीनुसार "ग्रंथालय संचालनालय" या स्वतंत्र विभागाची
स्थापना करण्यात आली.
राज्य
शासनाने जनतेच्या उपयोगासाठी स्थापन केलेले व स्वतः चालविलेले
शासकीय राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, तसेच शासकीय विभागीय ग्रंथालये, शासकीय जिल्हा ग्रंथालये यांच्या माध्यमातून राज्यातील ग्रंथांचा संग्रह करून कायमस्वरूपी एक सांस्कृतिक ठेवा
वा राष्ट्रीय संपत्ती म्हणून जतन करणे आणि ते आवश्यकतेनुसार वेळोवेळी
जनतेला उपलब्ध करून देण्याचे कार्य केले जाते. सर्व सार्वजनिक ग्रंथालयांमधील दुर्मिळ ग्रंथ, नियतकालिके, हस्तलिखितांचा संग्रह व संवर्धन करण्यासाठी
संचालनालया अंतर्गत हस्तलिखित विभागाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रंथालयात काम करणार्या किंवा काम
करू इच्छिणार्यासाठी ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण ग्रंथालय संघामार्फत आयोजित करून ग्रंथालय सेवांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची जबाबदारी ग्रंथालय संचालनालया तर्फे पार पाडण्यात येते. राज्यात प्रसिद्ध झालेल्या सर्व ग्रंथांची सूची प्रतिवर्षी प्रसिद्ध करणे, सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथखरेदीस उपयुक्त व्हावी यासाठी ग्रंथनिवड समितीने शिफारस केलेल्या ग्रंथांच्या याद्या प्रसिद्ध करणे, हे कार्यही ग्रंथालय
संचालनालयातर्फे केले जाते.
'गाव
तेथे ग्रंथालय' , "वाचनसेवा विस्तार" , "डिजिटल उपकेंद्रांची स्थापना" , "ई-प्रशासन" आणि "संगणकीकरण"
हे संचालनालयाचे भविष्यातील संकल्प आहेत. महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना, परिरक्षण, संघटन व विकास करणे
हे ग्रंथालय संचालनालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी ग्रंथालय सेवेच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून शासन अंमलात आणत आहे. वाचनाची अभिरूची निर्माण करण्यास ग्रंथालय वाढीस प्रोत्साहन देणे , प्रचलित ग्रंथालयांचा सर्वांगिण विकास साधणे, ग्रंथालयाच्या वाचक वृध्दीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे , "गाव
तेथे ग्रंथालय" संकल्पना जलद गतीने अंमलात आणणे इ . हे मुख्य उद्दिष्टे
डोळ्यसमोर ठेऊन उच्च व तंत्र शिक्षण
विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य काम करत आहे.
सचिन
तळे
No comments:
Post a Comment