Saturday, 19 December 2015

मन हे गवताळी

मन हे गवताळी

मन हे गवताळी , गवताळी  माझे गान रं
गवताची पात रं  , डोले डोलदार रं

वाऱ्यावर हूर हूर , हिरवे हिरवे राण रं
मखमाली गादीची , ही हिरवी पिवळी शाल रं

थुई मुई थुई मुई , नाचे रंगी पाखर
गवतात रांगते , कोवळ्या उन्हाचे बाळ रं

ईवली इवलीशी , नाजूक गवताची रास रं
गणला ही आवडे , दुर्वा त्याच नाव रं

खुदू खुदू बोलती , मन हे माझे गवती
शिंपडलेल्या दवांनी , ओली चिंब ही गवत रं

धूप असो वा पावसाळी , गवत माझी गोमटी रं
गवताची पात रं  , डोले डोलदार रं

सचिन कृष्णा तळे ( पुणे - भारत )

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale