Friday, 12 April 2024

नमस्कार पुणेकर हो ...

 


नमस्कार पुणेकर हो ...

 

कदाचित तुम्ही मला ओळखलं नसावं. मी तुमच्या आसपास च राहतो. अगदी शेजारीच. तसा मी अनोळखीच तुमच्यासाठी. पण तुमच्या सारखाच एक सर्वसाधारण मतदार आहे मी. ह्या पुण्याचा नागरिक आहे मी. खूप दिवसांपासून तुमच्याशी सवांद साधायचा होता. अखेर आज ती संधी मिळाली. देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. लोकशाहीचा हा उस्तव आपल्या हक्काचा उस्तव. अश्या आनंदाच्या प्रसंगी आपल्याला शुभेच्छा रुपी पत्र लिहिण्याचा छोटासा प्रयत्न.

 

तसं पाहिलं तर पुण्याचा अभिमान फक्त पुणेकरांना नाही तर पुण्यात स्थायिक झालेल्या सगळ्यांना आहे. पुणे आता सदाशिव पेठे पुरत राहिला नाही. पुण्यात काय नाही असा प्रश्नच येत नाही. निसर्ग आहे, स्वराज्याचे किल्ले आहेत, संस्कृती अन सभ्यता आहे, देवाची आळंदी आहे, डोंगर अन धरणे आहेत, शिक्षण अन उद्योग अन नोकरी आहे अन राजकारण देखील आहे. पुण्यात एकदा वास्तव करणारा कायमचा पुण्याचा होतो कारण पुण्यात शांतता आहे. अशी ओळख देशभर असणाऱ्या या पुण्याचं नेतृत्व करणारी मंडळी देखील त्याच ताकदीचे हवेत असं मला वाटत.

 

गेल्या काही वर्षात पुण्यात अमूलाग्र बदल झाला आहे. पुणेकरांच्या सेवेत मेट्रो आली, चांदणी चौक चा नकाशा पूर्ण पणे बदलला गेला. पुणे अंतर्गत रस्ते कोंडी दूर करण्यासाठी जोरदार पर्यंत चालू आहेत. पुणे महानगरपालिकेत अनेक गावांचा समावेश देखील झाला. पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी प्रशाशन अन स्थानिक अधिकारी प्रयत्नशील दिसत आहेत. सगळीकडे आनंदीआनंद आहे ? खरचं सगळीकडे आनंदी आनंद आहे का हो ? पुण्याचं रुपडं बदलून गेलं यात शंका नाही. पुणे शहर हात पाय पसरत चालाय. शेतजमीनीवर मोठमोठाली इमारती उभी राहत आहेत. गर्दीत मुंबई जशी गुदमरली तसं पुण्याची हालत होऊ नये बस इतकचं. मुंबईची मिठी नदी सारखी पुण्याची मुळा मुठा तीच अस्तित्व पार विसरून डबक्यात रूपांतरित झाली हो. पुण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला तर काय होऊ शकत याचा अनुभव देखील पुणेकरांनी घेतला आहे. पाणी जाण्यासाठी हवं तसं मार्ग मिळत नाहीय हेच खरं आहे. शनिवार वाडा इतिहासाची साक्ष न राहता पर्यटन स्थळ झालय आणि पाण्यातला आपला सारसबाग गणपती प्रेम युगलांना गप्पा मारण्याचे ठिकाण.

 

छोटे रस्ते अन वाहनांची वाढलेली संख्या. त्यातून वायू अन ध्वनी प्रदूषण. हि सुद्धा पुण्याची नवीन ओळख होत चाली आहे. पर्वती च्या पायथ्याशी अनधिकृत झोपडपट्ट्या सहज पोहचल्या. या झोपड्याना पाणी, वीज अन सर्व सुविधा देखील मिळत आहे. का, कारण या प्रत्येक घरातून मतदान मिळणार आहे. पर्वतीचा डोंगर या झोपडपट्ट्यानी वेढला गेला त्याला कोण जवाबदार ?

 

धारणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यात धरणातील पाणी कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा होऊ लागला आहे. अनेक टँकर लॉबी ही बोरवेलचे पाणी उपसून तळ्यात जमा करून ते पाणी टँकरच्या मध्यमान्यतून सोसायट्यांना विकले जात आहे. काही नागरिकांनी नो वॉटर, नो वोट असे पोस्टर्स लावून मतदानावर बहिष्कार टाकला आहे. असो ...

 

ह्या सारखे अनेक प्रश्न सध्या पुणेकरांना पडला असेलच. यासाठी पुण्याचे नेतृत्व करणारी मंडळी हि पुण्यावर प्रेम करणारी असायला हवं. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला अश्याच खासदाराची निवड करायची आहे जो ह्या प्रश्नांना उत्तर शोधून पुण्याच्या विकासात भर घालेल. त्यामुळे मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा. खडकवासला, चास-कमान, भामा-आसखेड, पवना, निरा डावा आणि उजवा कालवा, कुकडी, घोड प्रकल्प येथील पाणी वाटपाचे नियोजन करणार नेतृत्व आपल्याला हवं. तुमचं एक मत पुण्याचा नकाशा बदलू शकतो. पुन्हा एकदा तुम्हाला या लोकशाहीच्या उस्तवाला शुभेच्छा.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale