भरकटलेल्या पाखरांना आज आवरा ना कोणीतरी
फेसबुक वरील गप्पा नाक्यावर रंगवा ना कोणीतरी
शाळा कॉलेज चा कट्टा अन मैदानी खेळ ते सारे
दोन शब्द प्रेमाचे समोर जरा ऐकवा ना कोणीतरी
पुरे झाले दंगे पुरे झाले मोर्चे पुरे ते धार्मिक वारे
तुझ्या माझ्यातला माणूस दाखवा ना कोणीतरी
कसली भाषणे तुमची कसली ती सभा लोकांची
प्रचाराचे झेंडे कार्याने सत्याने मिरवा ना कोणीतरी
पुण्यासाठी नाही आपल्याच देश बांधवासाठी
गरिबांच्या मुखात थोडं भरवा ना कोणीतरी
देशाच्या सीमेवरती आणिक अंतर्गत वादामधी
आतंकी समाज कंठकांची जिरावा ना कोणीतरी
वासनांची भूक मिटवताना अन वारसा जपताना
हर घरा घरात आई बहिणी जगवा ना कोणीतरी
जगात सुंदर असा एकमेव देव देश धर्म आपला
त्या देशाची प्रतिमा हृदयात ठेवा ना कोणीतरी
सचिन कृष्णा तळे
कात्रज , पुणे
७७०९०९९६४६
No comments:
Post a Comment