Sunday, 1 July 2018

प्रेमाची गोडी

थोडी गोरी गोरी, हवी पोरगी तशी 
मनाने मोकळी, हवी थोडी थोडी 

शब्दाशब्दाची ती, पानाफुलांची ती 
तिच्या माझ्यात , हवी गोडी थोडी 

गावाकडची ती, नको फॉरेन ची
सुंदर देखणी , हवी भोळी थोडी 

तिच्या पायामधी, झुले पैंजण खुळे 
डोळ्यात काजळी, हवी काळी थोडी 

हिरव्या गवंतावरी, केस सावरूनी 
वाट पाहणारी , हवी भेट थोडी 

क्षणभर तिच्यामध्ये, क्षणभर माझ्यामध्ये 
प्रेमाची गोडी हवी थोडी थोडी 

सचिन कृष्णा तळे 
7709099646

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale