Tuesday, 16 May 2023

दखलपात्र असा मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोग्य यज्ञ ( मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष )

 दखलपात्र असा मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोग्य यज्ञ 

( मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष )




हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे


भोवतालचा दाट अंधार दुःखमय असला तरी उद्याच्या जीवनात उर्जामयी आनंदी सूर्य उगवण्यासाठी प्रत्येकाला मदतीचा हात लागतो. ह्या जगात सगळ्यात अनमोल जर काही असेल तर तो माणसाचा जीव आहे. माणूस आहे. आपण अनेक जाती धर्मातून अनेक विचारांतून वेगवेगळ्या संघटनेतून एकत्र येत असतो. पण एकवेळ अशी येते कि तेव्हा आपण ह्या सगळ्या मानवनिर्मित कुंपणातून बाहेर पडतो आणि माणूस म्हणून गरजू माणसांसाठी धावून जातो. आणि जो हात तुमच्यासाठी धावून येतो तोच हात देवाचा हात असतो. देव त्याच माणसाच्या रूपात आपल्याला दिसू लागतो. 


असाच हात देवाने आपल्याला डॉ बाबा आमटे यांच्या रूपाने मिळाला होता. जिथे मनुष्य वस्ती नाही अश्या दुर्गम ठिकाणी आदिवासी भागात पद्मश्री पद्मविभूषण डॉ बाबा आमटे यांनी जनसेवेसाठी कुष्ठरोगी यांच्यासाठी आरोग्य यज्ञ पेटवला. कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले आणि अनेकांना नवजीवन मिळालं. 


असाच एक महत्वपूर्ण यज्ञ आपल्या महाराष्ट्रात राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री नामदार एकनाथ भाई शिंदे यांनी पेटवला अन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने  गेल्या १० महिन्यांत  ८ हजार १९२ रुग्णांना एकूण ६० कोटी ४८ लाख रुपयांची मदत दिली आहे. संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्‍चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुण संपन्न असलेले पत्रकार मंगेश चिवटे याना या कश्याची जवाबदारी दिली आणि त्यांनी हा यज्ञ महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात नाही तर महाराष्ट्राच्या सीमांपलीकडे जिथे मराठी बांधव आहेत त्यांच्या पर्यंत पोहचवला. आवर्जून एक उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे हेच कक्ष महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आला होता. पण जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्याच दिवशी त्यांनी पहिलं आरोग्य सेवेसाठी जनतेसाठी हा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष चालू करण्याचा आदेश दिला. 


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली होती. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२३७ रुग्णांना १० कोटी २७ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९५ लाख तर एप्रिल मध्ये विक्रमी १९८४ रुग्णांना ९ कोटी ९३ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. इतका मोठा व्यवहार पण त्यात जराही हलगर्जी पणा किंवा गैरव्यवहार दिसून हि येणार नाही. जनतेचा पैसा जनतेसाठी कसा वापरायचा , सरकारने फक्त घोषणेतून नाही तर कामातून त्यांच्या आड अडचणीत कसं पोहचायचं याच जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आहे. हॉस्पिटल मध्ये येणारी बिल हि सामान्य माणसांना भरणे इतपत नसतात आणि हि रक्कम त्या क्षणाला किती महत्वपूर्ण असते ह्याची जाणीव मनात ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विलंब न लावता गरजूंपर्यंत फंड कसा लवकरात लवकर पोहचेल ह्याची काळजी घेताना दिसून आलेत. काही गरजूंना तर २४ तासाच्या आता मदत मिळाली आहे. इथे तुमची ना जात पहिली जात , ना पक्ष , ना धर्म. इथे तुमची गरज आणि अडचण समजून घेतली जाते त्यानंतर ती निधी थेट हॉस्पिटलच्या खात्यात रुग्णाच्या नवे अदा केली जाते. योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.

माणसांच्या वेदना समजून घेण्यासाठी संवेदनशील असणे फार गरजेचं आहे. बाबा आमटे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एका वळणावर नवीन विचार मंगेश चिवटे यांच्या डोक्यात आला आणि स्व:मनाने त्यांनी नोकरीची वाट पुढे न धरता जीवनातल्या काही कडू-गोड अनुभवला सोबत घेऊन वैद्यकीय कक्षाच हे आरोग्य यज्ञ पेटवत ठेवलं. आजच्या काळात या यज्ञात राज्यातून अनेक तरुण होतकरू मुलं स्वतःहून ह्या आरोग्य सेवेत कार्य करत आहेत. या प्रत्येक आरोग्यदूतांना दरवर्षी रक्तदान सक्तीचं आहे.



मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे


१. अर्ज ( विहीत नमुन्यात)

२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)

३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.

(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)

४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक

५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)

६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.

८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.

९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.


१. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६),

२. हृदय प्रत्यारोपण

३. यकृत प्रत्यारोपण

४. किडणी प्रत्यारोपण

६. बोन मॅरो प्रत्यारोपण

५. फुफ्फुस प्रत्यारोपण

७. हाताचे प्रत्यारोपण

८. हिप रिप्लेसमेंट

९. कर्करोग शस्त्रक्रिया

१०. अपघात शस्त्रक्रिया

११. लहान बालकांचे शस्त्रक्रिया

१२. मेंदूचे आजार

१३. हृदयरोग

१४. डायलिसिस

१५. अपघात

१६. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)

१७. नवजात शिशुंचे आजार

१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण

१९. बर्न रुग्ण

२०. विद्युत अपघात रुग्ण

Monday, 8 May 2023

ऑफिस च राजकारण, त्याला नाही मरण

ऑफिस राजकारण, त्याला नाही मरण


 


भारतातली बहुतांश जनता हि नोकरदार आहेत. नोकरी करून स्वतःच उदरनिर्वाह चालवतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला ऑफिस मध्ये घडणाऱ्या राजकारण ला सामोरे जावं लागत. ऑफिस पॉलिटिक्स ने फक्त विशेष एका व्यक्तीला किंवा समूहाला फायदा होतो पण या राजकारणामुळे काही चांगले कर्मचारी गमावण्याची पाळीही कंपनीवर येऊ शकते. अश्या वेळी खास करून वरिष्ठानी असल्या चालेल्या राजकारणावर जातीने लक्ष देऊन त्यावर तोडगा काढणे गरजेचे असते. अनेकवेळा आपण सत्तेवरील राजकारणावर चर्चा करतो पण ते इतकं मनावर घेत नाही जितकं ऑफिस राजकारण घेतो. तोडणं फार सोपं असतं जोडणं फार अवघड हे निसर्गाचा नियम आहे. राजकारण हे नक्कीच फायद्याचं असत पण ते राजकारण जर कंपनी हिताचं असेल तरच अन्यथा कंपनीला आर्थिक नुकसान सहन करावं लागत. सत्ता मिळवण्यासाठी सत्तेत राहण्यासाठी राजकारण खेळलं जातं. कार्यालयात तुमचे स्थान कोणतेही असो, कॉर्पोरेट राजकारण कोणीही टाळू शकत नाही. ते जीवनाचे सत्य आहे.

 

काही माणसं जाणूनबुजून ऑफिसमध्ये नकारात्मक वातावरण तयार करण्याचं कार्य करत असतात. एकतर ती स्वतःला खूप स्मार्ट समजतात किंवा त्यांनी त्या कंपनीत स्वतःच महत्व वाढवून घेतलेलं असत. अशी मानस फक्त पगार आणि पद वाढवू शकतात पण रिस्पेक्ट किंवा आदर कमावू शकत नाही. स्वतःकडे जे ज्ञान आहे ते स्वतःपाशी जपून ठेवायचं. ते इतरांना किंवा आपल्या सहकारी मित्राला सांगायचं नाही. स्वतःच वर्चस्व निर्माण करून गरज निर्माण करायची आणि कंपनीला पेचात टाकायचं. एकदा का तुम्ही अवलंबित्व निर्माण केलं कि कंपनी कडे दुसरा पर्याय नसतो. मग तुम्ही मागाल ते पगार आणि मागाल ते पद द्यावं लागत. आणि असल्या वृत्तीची लोकचं ऑफिस राजकारणाचे पिल्लर म्हणा किंवा खांब असतात जे संपूर्ण वातावरण नकारात्मक करून वादविवाद घडून आणतात. जी व्यक्ती नकारात्मक मार्गाने यश प्राप्त करते ती व्यक्ती सदैव त्याच विचारात असते. असल्या राजकारणात सगळ्यात जास्त बळी पडतात ते नवोदित तरुण. जे नव्याने कामाला रुजू झाले आहेत ते. भर तारुण्यात जिथे मेहनत, जबाबदारी, नियमितता, कामाचे नियोजन शिकायचं असत तिथे हि मुलं झटपट पगार कसे वाढवू ह्याचा विचार करू लागतात आणि नकळत बालिश राजकारण चे बळी पडून चुका करून बसतात. आळशी होतात.  लॉबीस्ट ही अशी व्यक्ती आहे जी सत्तेच्या उच्च पदांवर असलेल्या लोकांचे मन वळवण्यासाठी संघटित प्रयत्न करते. लॉबिस्टचा नेहमीच एक अजेंडा असतो. ते त्यांच्या प्रभावाचा वापर करून इतरांना त्याच्या बाजूने आकर्षित करतात.

 

कोणत्याही कंपनीत कमी-अधिक प्रमाणात राजकारण हे होतच असतं. अश्या राजकारण ला आळा घालणं अनेकदा कंपनीलाही अशक्य असतं. वेगवेगळ्या स्तरावरील कर्मचाऱ्यांकडून वेगवेगळ्या उद्देशाने काही कटकारस्थान खेळली जातात. याचा परिणाम अर्थातच कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर होतो आणि उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम झाला तर कुठेतरी त्याचे साईड इफेक्ट तुमच्यावर देखील होतात. कधीकधी कामापेक्षा जास्त मानसिक त्रास हा ऑफिस च्या राजकारणातून दिसून येतो. त्याचे पडसाद तुमच्या स्वतःच्या पर्सनल लाईफ वर होतात आणि तुम्ही थोडे अस्वस्थ होऊन नकारात्मक विचार करू लागतात.

 

कामाच्या ठिकाणी हे नक्की करा -

 

·       ·         कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठ यांच्याबरोबर सुसंवाद साधून वरिष्ठ आणि सहकाऱ्यांबद्दल आदर बाळगून त्यांचा विश्वास जपा.

·         ·       एखाद्या ग्रुपबद्दल विशेष आस्था किंवा अनास्था दाखवू नका. तुम्ही जसे वागाल, तसेच लोक वागतील, हे लक्षात ठेवा.

·       ·         एखाद्या सहकाऱ्याशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध असतील, तर काम आणि मैत्रीची गल्लत करू नका; तसंच एखाद्या सहकाऱ्याशी तुमचं अगदीच पटत नसेल, तर कामापुरता संवाद साधण्याचा प्रयत्न करा.

·        ·       कामाच्या ठिकाणी स्वतःचा तोल ढासळू देता चतुराईने वागा.

·        ·       नाकारात्कमक विचारातून सकारात्मक विचार कसा मांडता येऊ शकतो ह्याचा विचार करा.

·         ·       टीम वर्क करताना सर्वांना सामावून घेऊन एकजुटीने टीम वर्क कसं करता येईल ह्याचा विचार करा.

·         ·       एखाद्या व्यक्तीला जाणूनबुजून टार्गेट करण्यापेक्षा एक मताने टीम वर्क कसं करता येईल ते पहा.

·         ·       तुम्ही केलेल्या कामाची पूर्ण कल्पना आपल्या सहकारी मित्राला द्या.

·         ·       चार माणसं एकत्र आली, की गॉसिप हे होणारच. अशा गॉसिपपासून दूर राहा.

·         ·       संवाद थांबवू नका त्यातून गैरसमज निर्माण होतात.

·        ·       आपला सहकारी चुकत असेल तर त्याला मदत करा, उलट त्याची बदनामी करू नका.

·         ·       श्रेय लाटण्याच्या नादात सहकारी ला विसरू नका.

·         ·       तुमच्या कामाचं प्रत्येक तपशील आपल्या वरिष्ठाना द्या.

·         ·       तुम्हाला मानसिक त्रास व्हावा आणि त्यातून तुम्ही चुका कराव्या ह्यासाठी काही मानस धडपड नक्की करतात त्यांना ओळखा.


अश्या व्यक्ती पासून दूर राहा

·         सहकाऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्ती पासून 

·        ·       इतर सहकाऱ्यांविरुद्ध दुर्भावनापूर्ण युती तयार करणाऱ्या व्यक्ती पासून

·         ·       इतरांबद्दल गप्पा मारणे किंवा अफवा पसरविणाऱ्या व्यक्ती पासून

·         ·       महत्त्वाची माहिती जाणूनबुजून रोखून ठेवणाऱ्या व्यक्ती पासून

·        ·       क्रेडिट चोर, असे लोक आहेत जे दुसर्या व्यक्तीच्या कामाची ओळख किंवा प्रशंसा चोरतात अश्या माणसांपासून.

·         ·       डेटा किंवा संबंधित माहिती टीममध्ये लपवून ठेवणाऱ्या व्यक्ती पासून

·        ·       स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेणाऱ्या लोकांपासुन.

·        ·       कॉर्पोरेट दादागिरी करून तुम्हाला धमकावणाऱ्या व्यक्ती पासून

·         ·       एक गटातून माहिती चोरून दुसऱ्या गटाला सांगणाऱ्या व्यक्तीपासून

तुमच्या वरिष्ठांना आणि सहकाऱ्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांची विचारसरणी, त्यांची संगत; तसंच कंपनीव्यतिरिक्त त्यांचे इतर व्यवहार जाणून घ्या. याचा उपयोग तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्त्व समजून घ्यायला होईल. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या नव्या सुधारणांना खुलेपणाने सामोरे जात आले पाहिजे. कारण जो नव्या सुधारणांची कास धरणार नाही, तो नव्या संकटांना आमंत्रण देतो. जेव्हा तुमचे तुमच्या सभोवतालच्या लोकांशी मजबूत, सकारात्मक संबंध असतात तेव्हा कॉर्पोरेट राजकारणाचा सामना करणे खूप सोपे असते .

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

 

 


“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale