Thursday, 31 January 2019

राजकारण तापू लागलय

(राजकारण तापू लागलय)
आता जो तो छापू लागलाय

प्रचार पार्टी आणिक पैसा
खोटी भाषणे ठोकू लागलाय

धर्म आणि जातीपाती मधुनी
मतांची बेरीज मापू लागलाय

मीच खरा बाकी चोर सारे
हर एक नेता सांगू लागलाय

ज्यांची झाली दुकाने बंद
आरे तोच खरा नाचू लागलाय

सचिन तळे 

Wednesday, 30 January 2019

देशाअंतर्गत लढा आठवू



फाळणीच्या जखमा आठवू
देशाअंतर्गत लढा आठवू

बापू तुमचे स्मरण होता
नथूरामची अस्थी आठवू

छिन्न छिन्न तुझ्या भूमीवर
हिंद तुला कुठे कुठे आठवू

देशा तुझ्या अंगणात का?
शहिदांची किंकाळी आठवू

तुझ्या चरणावरी हे भारता
स्वतंत्र गीत गाऊन आठवू

तू एकतेची मशाल भूवरी
तुझी आरती स्वर्गात आठवू

तुझ्या पदरी जन्म आमचा
देवा आधी तुला आठवू

- सचिन तळे , पुणे








Monday, 28 January 2019

तरुण भारता

लोक हो जरासा हळू वाद घाला
देश माझा वाटे कोहिनुर जगाला

इथे संस्कृती इथे शांतीचा पहारा
इथे एकतेचा संदेश प्रत्येकाला

खऱ्या लोकशाहीचा सोहळा इथे
देवा आधी मानतो आम्ही देशाला

पश्चिमेची भुरळ आता सोडा
सूर्य तेजाने फक्त येतो पूर्वेला

इथल्या वादळाला अन नभाला
अभिमान वाटावे स्वताचे स्वताला 

आले हजार लुटण्यास आम्हा
देशासमोर ना भ्यालो मरणाला

तरुण भारता उंच कर तुझ्या माना
कसली लाज खऱ्या इतिहासाला

 - सचिन तळे 

Thursday, 24 January 2019

पुन्हा..


पुन्हा मी स्वतःला फसवू कसा
पुन्हा मी स्वतःला हसवू कसा

पुन्हा तीच चर्चा देशात माझ्या
पुन्हा देश माझा सजवू कसा

पुन्हा त्याच निवडणूका येतात
पुन्हा त्या नेत्यांना तुडवू कसा

पुन्हा लोकशाहीचा खून होतो
पुन्हा तेच डोळे भिडवू कसा

पुन्हा शेतकरी कर्जात बुडतो
पुन्हा खबर हि रंगवू कसा

पुन्हा सीमेवर शहिदांच्या रांगा
पुन्हा आतंक हा दाखवू कसा

पुन्हा आझादी पुन्हा तीच गर्दी
पुन्हा झेंडा तो फडकवू कसा

पुन्हा देशाची गीते गाण्यास
पुन्हा ताेे वीर मागवू कसा

- सचिन तळे , 7709099646









Wednesday, 23 January 2019

आठवून झाले



झेंडे हजार रंगवून झाले
नेते पालखीत बसवून झाले

लोकशाहीचे स्वप्ने पाहताना
दिस गुलामीचे आठवून झाले

मोर्चे बंद आणिक भाषणे
शंभर वेळा ऐकून झाले

दाराआड त्या बंगल्यामध्ये
कार्यकर्त्याना फसवून झाले

सत्तेसाठी जगता जगता
सत्याला पार ठेचून झाले

स्वातंत्र दिस येता जवळी
ईमान स्वतःचे राखून झाले

अनेक जाती अन धर्मातुनी
असंख्य धागे विणून झाले

त्याच धाग्यातून एक तिरंगा
अभिमानाने फडकवून झाले

- सचिन कृष्णा तळे

Tuesday, 15 January 2019

राजकीय मैदानात

ह्या राजकीय मैदानात
पिसाळलेली माणस
झाटभर सत्तेसाठी
रक्ताचा साेहळा करत
भांडत बसतात...
त्यात ती माजलेली
विकलेली मिडीया ...
आणिक साेशल मिडीयावर
सांडलेली
बिघडलेली दूनिया ..
ईतिहासाच्या पानावर
चिखल फेकत
मजेत ताव मारत
मेल्यागत जगतात..
आणि
जिवंतपणी लाचारीने मरतात ..

#आहेतेआहे
#सचिन_तळे

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale