Wednesday, 23 January 2019

आठवून झाले



झेंडे हजार रंगवून झाले
नेते पालखीत बसवून झाले

लोकशाहीचे स्वप्ने पाहताना
दिस गुलामीचे आठवून झाले

मोर्चे बंद आणिक भाषणे
शंभर वेळा ऐकून झाले

दाराआड त्या बंगल्यामध्ये
कार्यकर्त्याना फसवून झाले

सत्तेसाठी जगता जगता
सत्याला पार ठेचून झाले

स्वातंत्र दिस येता जवळी
ईमान स्वतःचे राखून झाले

अनेक जाती अन धर्मातुनी
असंख्य धागे विणून झाले

त्याच धाग्यातून एक तिरंगा
अभिमानाने फडकवून झाले

- सचिन कृष्णा तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale