मला राजवैभवाची इच्छा नाही, न स्वर्गाची, न पुनर्जन्माची. मला फक्त इच्छा आहे ती काहीतरी नवीन करण्याची ...कारण मी काहीतरी घडऊ शकतो हे मला माहित आहे.... जय हिंद जय महाराष्ट्र !!
Sunday, 28 April 2019
Friday, 26 April 2019
आझादी
… आणि
स्वातंत्र्य सूर्याचे तेज घेवून तळपलेले वीर
जे फासावर देशासाठी चढले
जे परकीयांच्या गोळीला हि न घाबरले
जे एकतेने देश देव धर्मासाठी लढले
त्या क्रांतिकारकांच्या रक्ताचे थेंब
ह्या मातीच्या काळजात सोडा …
आणि पहा... रे
त्या मातीतून उगवणारी पिढी
हि कोणत्या धर्माची आहे
कोणत्या जातीची आहे
कोणत्या राज्याची आहे
कोणत्या पक्षाची आहे
त्यांची जात , धर्म , राज्य व भाषा
फक्त एकचं असणार
तो म्हणजे …
माझा हिंदुस्थान …
आपलं भारत ...
माझा तिरंगा
मग
ते हि आझादी मागतील
भारतावर वारंवार ज्यांनी आक्रमणे केली त्यांच्या पासून
भारताची अफाट संपत्ती ज्यांनी लुटली त्या लोकांपासून
ज्यांनी मंदिरे व बुद्ध विहार तोडली व लुटली त्यांच्या पासून
ज्यांनी आमच्या संस्कृतीवर घात केला त्यांच्या पासून
हिंसेने धर्मांतर करायला लावले त्यांच्या पासून
राष्ट्रांचे ज्यांनी तुकडे केले त्यांच्या पासून
दंगली ज्यांनी माजवली त्यांच्या पासून
स्वार्थासाठी राजकारण ज्यांनी केले त्यांच्या पासून
देशविरोधी ज्यांनी घोषणा दिल्या त्यांच्यापासून
देशविरोधी ज्यांनी कारवाई केल्या त्यांच्यापासून
देशात आतंकी हल्ले घडवण्यात
ज्यांनी मदत केली त्यांच्यापासून
आणि हो...
ते आझादी मागतील
अखंड हिंदुराष्ट्रासाठी
भारताच्या हितासाठी
हो ते आझादी मागतील
खोट्या राजकीय नेत्यांपासून
खोट्या राजकीय भाषणापासून
खोट्या सभेपासून
खोट्या गर्दीपासून
स्वार्थासाठी सत्तेसाठी चाललेल्या
ह्या निवडणुकी पासून
त्या बिनबुडाच्या कार्यकर्त्यापासून
त्यांच्या धमक्यापासून
त्यांच्या राजकीय विचारापासून
हो ते आझादी मागतील
लोकशाहीच्या उंबरटयावर बसून
आक्रोश करत
नव्या संघटनाला जन्म देत
नव्या क्रांतीच जाळ विणत
नव्या तरुणांना साद घालत
नव्या भारतासाठी
नव्या लोकशाहीसाठी
सत्यासाठी
जग जिंकण्यासाठी
अधिकार मिळवण्यासाठी
शिक्षणासाठी
असत्या विरोधी चळवळ उभारण्यासाठी
हो ते आझादी मागतील
लेखकांच्या लेखातून
ज्वलंत काव्यातून
हजारो लोकांच्या विचारातून
घरा घरातून
वृत्तपत्रातून संपादकीय शब्दातून
वैचारिक चळवळीतून
ते आझादी मागतील
वंचितांच्या हक्कासाठी
शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी
कामगारांच्या प्रश्नासाठी
ते आझादी मागतील
बलात्काराच्या घटनेतून
गुन्हेगारीच्या जगातून
पैशाच्या काळा बाजारातून
देहाच्या विक्रीतून
हो ... ते आझादी मागतील
अखंड भारतासाठी
सिंधू नदीच्या स्वागतासाठी
गंगेच्या पूजेसाठी
स्वच्छ सुंदर भारतासाठी
भारतात जन्मलेल्या धर्मासाठी
भारताच्या एकतेसाठी
भारतीयांसाठी
हो ते आझादी मागतील
सचिन कृष्णा तळे
कात्रज पुणे
७७०९०९९६४६
Wednesday, 24 April 2019
केसरी रंग देशाचा
राम नामाचा जप करणारा
हिंदू दहशतवाद ठरतो
भगव्या कपड्यांमध्ये इथे
आतंकवाद ठरवला जातो
कट्टर हिंदूंची व्याख्या
त्यांनी आम्हास शिकवावी
ज्यांनी धर्मांतराच्या खाली
मळकी लंगोट मिरवली
अफवांच्या बाजारात म्हणे
त्यांना मिळे भाव चांगला
म्हणोनि केला हट्टहास हा
खोट्याचा बाजार बसवता
तुमचा नाही दोष हा
कळणार काय तुम्हाला
आम्ही पाहतो रोज
तो केसरी रंग देशाचा
सचिन कृष्णा तळे
Monday, 22 April 2019
Friday, 19 April 2019
माझ्या देशात
माझ्या देशात गाढवांचा कळप किती
त्या गाढवांसाठी लढणारा कळप किती
माझ्या देशात आहे सत्तेची हौस मोठी
त्या सत्तेसाठी पैशाची लालच मोठी
माझ्या देशात आहे नेत्यांची दादागिरी
त्या नेत्यांसाठी कार्यकर्त्यांची दादागिरी
माझ्या देशात फसवा बाजार मोठा
त्या बाजारात नेत्यांचा भ्रष्टाचार मोठा
माझ्या देशात घराणेशाहीचा झेंडा
त्या घराणेशाहीत कुजलेला झेंडा
माझ्या देशात जाती धर्माचा अजेंडा
त्या जाती धर्मात विकासाचा अजेंडा
माझ्या देशात नेता मिळतो विकत
त्या नेत्या सोबत कार्यकर्ता फुकट
सचिन कृष्णा तळे
पुणे

Wednesday, 17 April 2019
वाचाळवीरांवर केलेली कार्यवाही पुरेशी आहे का ?
वाचाळवीरांवर केलेली कार्यवाही पुरेशी आहे का ?
सोशल मीडिया हे इतक प्रभावी माध्यम राजकीयांच्या हाती आहे कि तिथून थेट लाखो जनतेशी सवांद साधता येतो . जर राज्यात पाहिलं तर आज अनेक राजकीय पुढारी जे निवडणूक लढतयात आणि जे लढत नाहीयत पण सक्रिय आहेत ते हि वाटेल त्या भाषेत बोलतायत. त्यामुळे निवडणूक आयोग तरी कोणाकोणावर लक्ष ठेवेल. निवडणूक आयोगाने जमलं तस कारवाई करावी. सत्तेची हौस आणि प्रचाराची धूम असताना नेते आरोप प्रत्यारोप मध्ये इतके गुंतले जातात कि त्यांना ते काय बोलतायत ह्याच हि भान नसत. राज ठाकरे , प्रकाश आंबेडकर , सुप्रिया सुळे , अजित पवार असे बरेच नेते आजच्या निवणुकीत त्यांच्या वक्तव्य मुळे चर्चेत आहेत. मतदान हे लोकशाहीत सर्वात श्रेष्ठदान आहे आणि त्याचा लेखाजोखा हा निवडणूक आयोगाकडे आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने आजून ठाम नियमावली तयार करने हे गरजेचे आहे. जे नेते देशाची आणि जनतेची दिशाभूल भर सभेतून करतात खोट पसरवतात त्यांच्यावर निवडणुकीने बंदी घालावी. साधं उदहारण आहे शाळेत जर मुलं मस्ती करत असतील तर मास्तर फक्त एक दोघांवर कारवाई करतो बाकीचे सगळे गप्प बसतात अगदी तसेच जर निवडणूक आयोगाने ठाम कारवाई केली तर बरेच नेते जीभ भाषा सांभाळूनबोलतील.
सचिन कृष्णा तळे
तिरुपती निवास , सुखसागर नगर
लेन नंबर ७ कात्रज पुणे

राहुल गांधींचे आठवावे रूप
राहुल गांधींचे आठवावे रूप ।
राहुल गांधींचा आठवावा प्रताप ।
राहुल गांधींचा आठवावे काम ।
या महाराष्ट्री ।।१।।
राहुल गांधींचे कैसें बोलणें ।
राहुल गांधींचे कैसें चालणें ।
राहुल गांधींस सलगी देणे ।
मोदी द्वेषाने ।।२।।
राहुल गांधी एकमेव आधार ।
राहुल गांधी घराणदाज ।
राहुल गांधी ज्ञानाचा भांडार ।
काँग्रेस गावी ।।३।।
राहुल गांधी कीर्तिवंत ।
राहुल गांधी बुद्धिवंत ।
राहुल गांधी एकमेव ।
परम पूज्य ।।४।।
राहुल गांधी खासदार ।
राहुल गांधी पंतप्रधान ।
राहुल गांधी अभिमान ।
स्वप्नामध्ये ।।५।।
राहुल गांधींचा करावा प्रचार ।
राहुल गांधींचा धरावा हात ।
राहुल गांधींचा भारी अंदाज ।
या भारतात ।।६।।
राहुल गांधीचे शब्द अफाट ।
राहुल गांधींचा पहावा थाट ।
राहुल गांधीं सर्वधर्मात ।
सत्तेसाठी ।।७।।
सचिन कृष्णा तळे
Subscribe to:
Posts (Atom)
“कलियुग सुरू आहे!”
“कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale