राहुल गांधींचे आठवावे रूप ।
राहुल गांधींचा आठवावा प्रताप ।
राहुल गांधींचा आठवावे काम ।
या महाराष्ट्री ।।१।।
राहुल गांधींचे कैसें बोलणें ।
राहुल गांधींचे कैसें चालणें ।
राहुल गांधींस सलगी देणे ।
मोदी द्वेषाने ।।२।।
राहुल गांधी एकमेव आधार ।
राहुल गांधी घराणदाज ।
राहुल गांधी ज्ञानाचा भांडार ।
काँग्रेस गावी ।।३।।
राहुल गांधी कीर्तिवंत ।
राहुल गांधी बुद्धिवंत ।
राहुल गांधी एकमेव ।
परम पूज्य ।।४।।
राहुल गांधी खासदार ।
राहुल गांधी पंतप्रधान ।
राहुल गांधी अभिमान ।
स्वप्नामध्ये ।।५।।
राहुल गांधींचा करावा प्रचार ।
राहुल गांधींचा धरावा हात ।
राहुल गांधींचा भारी अंदाज ।
या भारतात ।।६।।
राहुल गांधीचे शब्द अफाट ।
राहुल गांधींचा पहावा थाट ।
राहुल गांधीं सर्वधर्मात ।
सत्तेसाठी ।।७।।
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment