Wednesday, 17 April 2019

वाचाळवीरांवर केलेली कार्यवाही पुरेशी आहे का ?

वाचाळवीरांवर केलेली कार्यवाही पुरेशी आहे का ?

सोशल मीडिया हे इतक प्रभावी माध्यम राजकीयांच्या हाती आहे कि तिथून थेट लाखो जनतेशी सवांद साधता येतो . जर राज्यात पाहिलं तर आज अनेक राजकीय पुढारी जे निवडणूक लढतयात आणि जे लढत नाहीयत पण सक्रिय आहेत ते हि वाटेल त्या भाषेत बोलतायत. त्यामुळे निवडणूक आयोग तरी कोणाकोणावर लक्ष ठेवेल. निवडणूक आयोगाने जमलं तस कारवाई करावी. सत्तेची हौस आणि प्रचाराची धूम असताना नेते आरोप प्रत्यारोप मध्ये इतके गुंतले जातात कि त्यांना ते काय बोलतायत ह्याच हि  भान नसत. राज ठाकरे , प्रकाश आंबेडकर , सुप्रिया सुळे , अजित पवार असे बरेच नेते आजच्या निवणुकीत त्यांच्या वक्तव्य मुळे चर्चेत आहेत. मतदान हे लोकशाहीत सर्वात श्रेष्ठदान आहे आणि त्याचा लेखाजोखा हा निवडणूक आयोगाकडे आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने आजून ठाम नियमावली तयार करने हे गरजेचे आहे. जे नेते देशाची आणि जनतेची दिशाभूल भर सभेतून करतात खोट पसरवतात त्यांच्यावर निवडणुकीने बंदी घालावी. साधं उदहारण आहे शाळेत जर मुलं मस्ती करत असतील तर मास्तर फक्त एक दोघांवर कारवाई करतो बाकीचे सगळे गप्प बसतात अगदी तसेच जर निवडणूक आयोगाने ठाम कारवाई केली तर बरेच नेते जीभ  भाषा सांभाळूनबोलतील.

सचिन कृष्णा तळे
तिरुपती निवास , सुखसागर नगर
लेन नंबर ७ कात्रज पुणे
७७०९०९९६४६

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale